...अन्यथा ‘आरटीओ’च्या मागे आमचे पथक लावू : स्वाभिमानी शेतकरी संघटना

शेतमाल बाजारात घेऊन येत असताना ‘आरटीओ’च्या पथकाकडून होत असलेल्या कारवाई संदर्भात ‘ॲग्रोवन’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
farm produce transport
farm produce transport

लातूर ः शेतमाल बाजारात घेऊन येत असताना ‘आरटीओ’च्या पथकाकडून होत असलेल्या कारवाई संदर्भात ‘ॲग्रोवन’ने प्रकाशित केलेल्या वृत्तानंतर आक्रमक होत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. ‘‘आरटोओ’च्या पथकाकडून वाळू माफियांना मुजरा करत शेतकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारत जात आहे. हे प्रकार थांबले नाही तर ‘आरटोओ’ पथकाच्या मागे आमचे पथक लागेल, तसेच संघटनेच्या स्टाईलने आंदोलन करण्यात येईल,`` असा इशारा ‘स्वाभिमानी’चे प्रदेश उपाध्यक्ष सत्तार पटेल यांनी दिला आहे.   सध्या शेतमालाचा हंगाम सुरु आहे. मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमाल अडत बाजारात आणत आहेत. पण त्यांच्या वाहनावर ‘आरटीओ’च्या पथकाकडून कारवाई केली जात आहे. या संदर्भात `ॲग्रोवन`ने सोमवारी (ता. ७) सविस्तर वृत्त प्रकाशित केले. याची दखल स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दखल घेतली. या ‘स्वाभिमानी’ने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. ‘‘सध्या शेतकरी प्रचंड कष्टामधून जात आहे. कधी अस्मानी संकट तर कधी सुलतानी संकट असा सतत सामना त्याला करावा लागत आहे. यातून जो काही शेतीमाल त्याच्या हाती लागला तो माल घेऊन बाजारामध्ये येत असताना शहराच्या चारही बाजूंनी अगदी नाकेबंदी करून ‘आरटीओ’चे पथक शेतकऱ्यांची वाहने अडवून त्यांना पंचवीस हजारांपासून ते अगदी लाख रुपयापर्यंत दंड ठोठावत आहे. परंतु त्याच वेळेस लातूरच्या चारही बाजूला वाळूचे टिप्पर या पथकाच्या समोर राजरोसपणे जातात. शेतकऱ्यांचा माल घेऊन आलेल्या वाहनाला दंड तर वाळू घेऊन आलेल्या टिप्पर चालकांना हे पथक मुजरा करते. वाळू चालकांना सन्मानपूर्वक वागणूक देतात अन् शेतकऱ्यांवर बडगा उगारत आहेत,’’ असे निवेदनात म्हटले आहे.

शेतकऱ्यांवरील कारवाई तत्काळ थांबवा जिल्हाधिकारी शेतकऱ्यांचे प्रश्न समजू शकता. शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अंत या पथकाने पाहू नये.शेतकऱ्यांची होत असलेली लूट आपण तत्काळ थांबवण्याचे आदेश द्यावेत, अन्यथा या पथकाच्या मागेमागे त्यांच्या पाळतीवर राहून स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मालावर दंड बसू देणार नाही. हे प्रकार तत्काळ थांबवावे, तशा सूचना आरटीओंना द्याव्यात, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना आपल्या स्टाईलने ‘ऑन दी स्पॉट’ धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही,  असा इशारा श्री. पटेल यांनी दिला आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com