प्रकल्पग्रस्तांचे अर्ज प्रलंबित ठेवू नकाः बच्चू कडू

सिंचन प्रकल्पांची निर्मिती होत असताना अनेकांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शेतकरी, गावकरी बांधवांनी जमिनी दिल्या म्हणूनच प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत.
प्रकल्पग्रस्तांचे अर्ज प्रलंबित ठेवू नका Do not keep project affected applications pending
प्रकल्पग्रस्तांचे अर्ज प्रलंबित ठेवू नका Do not keep project affected applications pending

अमरावती : सिंचन प्रकल्पांची निर्मिती होत असताना अनेकांच्या जमिनी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. शेतकरी, गावकरी बांधवांनी जमिनी दिल्या म्हणूनच प्रकल्प पूर्णत्वास आले आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला व त्यांच्या तक्रारींचे समन्वयाने निराकरण करून त्यांचा एकही अर्ज प्रलंबित राहता कामा नये, असे सुस्पष्ट आदेश जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी दिले. सिंचन भवन येथे विविध सिंचन प्रकल्पांसंदर्भात राज्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती, त्या वेळी ते बोलत होते. आमदार प्रताप अडसड, जलसंपदा विभागाचे मुख्‍य अभियंता अभय पाठक, अनिल बहादुरे, अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख, आशिष देवघडे, पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सु. गो. राठी यांच्यासह प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता, अधिकारी या वेळी उपस्थित होते. राज्यमंत्री कडू म्हणाले, ‘‘प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसित गावांत नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम जलसंपदा विभागाचे आहे. सामडा सौंदडी प्रकल्पातील संपादित करावयाच्या जमिनीची मोजणी बाकी आहे. ती पूर्ण करावी. सध्या जलाशयात जलसाठा असल्यामुळे पाण्याच्या तरंग लहरीमुळे बुडित क्षेत्राशेजारील काही क्षेत्रात पाणी साचल्याच्या तक्रारी या वेळी प्राप्त झाल्यात. यावर तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना त्यांनी संबंधितांना दिली. तसेच शहानूर धरणातून  त्यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने सन २००४ पूर्वीचा रहिवासी पुरावे तपासून वाढीव मोबदला व अतिक्रमण नियमानुकूलच्या प्रकरणांचा निपटारा लवकरात लवकर करण्यात यावा.’’  पावसाळ्यात प्रकल्पातून विसर्ग होणाऱ्या पाण्यामुळे प्रकल्पालगतच्या शेतीचे नुकसान झाल्याने नुकसान भरपाई मिळण्यासाठीचे निवेदन शेतकऱ्यांनी सादर केले. त्यावर त्यांना योग्य मोबदला मिळावा, यासाठी बाधित क्षेत्राची महसूल व कृषी विभागाद्वारे संयुक्त तपासणी करून योग्य नुकसान भरपाईची कार्यवाही गतीने पूर्ण करण्यात यावी, असेही सांगितले. प्रकल्पग्रस्तांच्या समस्यांचा आढावा घेऊन पुढील कार्यवाहीचे आदेशही त्यांनी दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com