agriculture news in Marathi do not obstruct to vegetable vehicles Maharashtra | Agrowon

शेतमालाच्या गाड्यांची अडवणूक न करण्याच्या पोलिसांना सूचना 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 11 मे 2020

शहरातील नागरिकांना भाजीपाला पुरवठा करण्यासाठी अनेक गट, शेतकरी कंपन्या शेतमालाची विक्री करत आहेत.

पुणे: शहरातील नागरिकांना भाजीपाला पुरवठा करण्यासाठी अनेक गट, शेतकरी कंपन्या शेतमालाची विक्री करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना शेतमालाची टंचाई भासू नये, म्हणून शहरात व ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतमाल व इतर वाहनांची पोलिसांनी अडवणूक करू नये, अशा सूचना पुणे शहर, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त आणि पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांना निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी दिल्या आहेत. 

‘अॅग्रोवन’ने रविवारी (ता.१०) पोलिसांच्या अडणुकीमुळे शेतकरी कंपन्या आणि गट शेतमाल विक्री बंद करत असल्याचे वृत्त प्रकाशितत केले होते. याची दखल निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांनी घेतली आहे. तसेच जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल यांनीही पोलिसांकडून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अडवणूकीची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला दिल्याने जयश्री कटारे यांनी कोविड-१९ टॉप मोस्ट प्रायोरिटीचे परिपत्रक काढून सुचना दिल्या आहेत. 

परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, शासनाने अत्यावश्यक सेवा म्हणून शेतमालाच्या वाहतूकीसाठी सवलत दिली आहे. तसेच कृषी विषयक शेतमाल उत्पादन व विक्री, कृषी निविष्ठांचे वितरण, कृषी यंत्रे व अवजारांची विक्री -दुरूस्ती दुकाने, खरीप हंगामपूर्व मशागतीचे कामे, मजूर व वाहतूकदार यांच्या हालचाली, कृषी अवजारे, वाहतूक, शेतमाल काढणी पश्च्यात कामे, शेतमाल प्रक्रिया, कृषी सेवा केंद्रे, खते व बी बियाणे खरेदी विक्री केंद्रे, शेतमजूर, कृषी निविष्ठा उद्योगातील कर्मचारी, कृषी व संलग्न विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांना सवलत देण्यात आली आहे.

त्यामुळे खरीप हंगामपूर्व कामाकरिता शेतमजूर, कृषी निविष्ठा उद्योगातील कर्मचारी, कृषी संलग्न विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची वाहने यांना सवलत देण्यात आली असल्यामुळे कृषी विभागाकडून सर्व संबधिताना देण्यात आलेले ओळखपत्र, पास ग्राह्य धरण्यात यावे. 

कृषी विभागाच्या सर्व आस्थापनाशी संबधित सर्व प्रकारच्या वाहनाना कोणत्याही प्रकारचे पासेसची मागणी न करण्याबाबबत सर्व पोलिस अधिकारी, कर्मचारी यांना सुचना देण्यात याव्यात, असेही म्हटले आहे. 


इतर अॅग्रो विशेष
ऊस गाळप यंदा वाढणार कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे...
चिकन, अंड्यांची मागणी वाढली, दरात...नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत साखर...पुणे: राज्यातील ऊस तोडणी व वाहतूक कामगारांच्या...
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाणार लालपरी सोलापूर : एक लाखांहून अधिक कर्मचारी, साडेसतरा...
राज्यात सर्वदूर हलक्या पावासाची शक्यतापुणे ः राज्यातील अनेक भागांत कमी अधिक स्वरूपात...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पाऊस पुणे ः उत्तर भारतात परतीच्या पावसासाठी पोषक...
सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : कृषिमंत्री...कन्नड, जि. औरंगाबाद: अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक...
तीनशे टन हळद बांगलादेशाला निर्यात नांदेड : शेतीमालास अधिकचा दर मिळावा, यासाठी...
मुहूर्ताचा कापूसच कवडीयुक्त अकोला: यंदा दसऱ्याआधीच कापूस वेचणीचा मुहूर्त अनेक...
कृषी उपसंचालकानेच घातली कृषी उपक्रमांना...यवतमाळ: आत्महत्याग्रस्त अशी जागतिक स्तरावर ओळख...
महिला गट बनवितो ३० प्रकारचे मसालेइटकरे (ता.वाळवा,जि.सांगली) येथील उपक्रमशील महिला...
मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : राज्यातील बहुतांशी भागातील पावसाचे...
राज्यात हलक्या पावसाची शक्यतापुणे : काही दिवस राज्यात मुसळधार पाऊस...
एक हजार प्राध्यापकांनी वयाची साठी...पुणे: राज्यातील कृषी विद्यापीठांमधील...
सूक्ष्म अन्न उद्योगांना मिळणार आता दहा...पुणे: राज्यात लवकरच पंतप्रधान सूक्ष्म अन्न उद्योग...
कृषी, कामगार विधेयकांची राज्यात...पुणे : केंद्र सरकारने घाईघाईत मंजूर करुन घेतलेली...
शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसादचंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध...
सोयाबीन बियाणे प्लॉटना फटकाऔरंगाबाद: सध्याचे पावसाचे प्रमाण व त्यामुळे...
केळी विमा निकषांबाबत उत्सुकताजळगाव ः राज्य सरकारच्या चुकांमुळे हवामानावर...
अडीच हजार हेक्टर भातशेती सततच्या...सिंधुदुर्ग ः हळवी आणि भिजवणीची लागवड केलेली...