agriculture news in marathi Do not refuse pre-season cotton cultivation | Agrowon

हंगामपूर्व कपाशीची लागवड नकोच 

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 मे 2021

औरंगाबाद ः गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी हंगामपूर्व कपाशी लागवड नकोच, यासाठी क्षेत्रीय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची सूचना कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. 

औरंगाबाद ः गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी हंगामपूर्व कपाशी लागवड नकोच, यासाठी क्षेत्रीय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्याची सूचना कृषी विभागाच्या वतीने करण्यात आली आहे. 

राज्यात २०१७ च्या हंगामात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला होता. या हंगामातील अनुभव लक्षात घेऊन खरीप २०१७, २०१८, २०१९ व २०२० मध्ये राबविण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे गुलाबी बोंड आळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यास मदत झाली होती. आता खरीप २०२१ च्या हंगामामध्ये गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी क्षेत्रीय पातळीवर आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. 

गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येते. हंगामपूर्व कापूस लागवड झाल्यामुळे गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित न झाल्याने पुनरुत्पत्तीसाठी पोषक वातावरण निर्माण होऊन प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खरीप २०२१ मध्ये गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी गुलाबी बोंड अळीचा जीवनक्रम खंडित करणे आवश्यक आहे. यासाठीच्या अनेक उपाय योजनापैकी हंगामपूर्व कपाशीची लागवड होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी हंगामपूर्व बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून न दिल्यास हंगामपूर्व कापूस लागवड टाळता येऊ शकते. बियाणे पुरवठा करण्यासाठी उत्पादक कंपनी ते वितरक, वितरक ते किरकोळ विक्रेता असे कपाशी बियाणे पुरवठा करण्याचा कालावधी कृषी विभागाने निश्‍चित केला आहे. 

या संदर्भातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कंपनी वितरक किरकोळ विक्रेता महाराष्ट्र कापूस बियाणे अधिनियम २००९ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही कृषी आयुक्तालयाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 

बियाणे पुरवठा निश्‍चित कालावधी

 

उत्पादक कंपनी ते वितरक १० मे २०२१ पासून पुढे
वितरक ते किरकोळ विक्रेता १५ मे २०२१ पासून पुढे
किरकोळ विक्रेता ते शेतकरी १ जून २०२१ पासून पुढे

 

 


इतर बातम्या
वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा पुणे : अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘तौत्के’...
पावसासाठी पोषक वातावरण पुणे : चक्रीवादळामुळे पश्‍चिम महाराष्ट्रात वेगाने...
पश्‍चिम महाराष्ट्रातही पाऊस पुणे ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका पुणे, कोल्हापूर...
विदर्भ, मराठवाड्यात पाऊसअमरावती/औरंगाबाद : ‘तौक्ते’ चक्रीवादळामुळे विदर्भ...
कापूस बियाणे विक्री २० मेपासून करा : ‘...नागपूर : विदर्भ, खानदेश विभागांत शेजारच्या...
कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे ...येवला, जि. नाशिक : कृषी बियाणे रासायनिक खते,...
कोकण किनारपट्टीला चक्रीवादळाचा दणका रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी ः ‘तौत्के’ चक्रीवादळाचा...
तूर, मूग, उडदाची आयात खुली नागपूर : केंद्र सरकारने हंगामापूर्वी तूर, उडीद...
धूळवाफ पेरणीत लॉकडाउनचा खोडा सांगली ः शिराळा तालुक्यात वारंवार झालेल्या...
आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन करा ः...नागपूर : गेल्या वर्षीचा महापूर लक्षात घेऊन...
कुकडीच्या पाण्यासाठी  पारनेरकर एकवटले निघोज, ता. पारनेर : कुकडीच्या पाण्याबाबत पुणे...
पेट्रोल, खतांच्या दरवाढीविरोधात ...मुंबई : पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने...
गडहिंग्लजमध्ये शेतकऱ्यांकडे नऊ टन...गडहिंग्लज, जि. कोल्हापूर : यंदाच्या खरीप हंगामात...
कीटकनाशके विक्रीबाबत तरतुदींचे पालन करा अकोला ः या खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके...
परभणीत पीककर्जाच्या उद्दिष्टात ४८६...परभणी ः जिल्ह्यात चालू आर्थिक वर्षात (२०२१-२२)...
कोरोना रुग्णालयांचा वीज,  ऑक्सिजन...मुंबई : अरबी समुद्रातील तौक्ते चक्रीवादळामुळे...
मॉन्सूनपूर्व कामांना प्राधान्य द्यावे ः...भंडारा : मॉन्सून कालावधीत अचानक उद्‌भवणाऱ्या...
कोरोनाचे नियम पाळून  बाजार समित्या सुरू...नाशिक : जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादूर्भाव...
नगर जिल्ह्यात खरीपपूर्व मशागतीच्या...नगर : एकीकडे कोरोनाचे सावट असताना ग्रामीण भागातील...
लोहा, माहूर तालुक्यांना विम्याची रक्कम...नांदेड : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत खरीप...