agriculture news in Marathi do not sell Cashew nuts below 120 rupees Maharashtra | Agrowon

काजुची  १२० रूपयेपेक्षा कमी दराने विक्री करू नयेः सतिश सांवत

टीम अॅग्रोवन
रविवार, 19 एप्रिल 2020

बागायतदारांनी शेतपीक कर्ज घेऊन काजू उत्पादन केले आहे. तर कारखानदारांनी देखील बँकेतुन कर्ज घेऊनच उद्योग सुरू केले आहेत.

सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)ः बागायतदारांनी शेतपीक कर्ज घेऊन काजू उत्पादन केले आहे. तर कारखानदारांनी देखील बँकेतुन कर्ज घेऊनच उद्योग सुरू केले आहेत. सध्या कोरोनामुळे काजू व्यवसाय संकटात सापडला आहे. त्यामुळे ना नफा ना तोटा या तत्वावर हा व्यवसाय सुरू ठेवणे आवश्‍यक आहे. जिल्हा बँक हा प्रश्‍न सोडविण्यास सकारात्मक आहे. त्यामुळे  बागायतदारांनी १२० रूपयेपेक्षा कमी दराने काजुची विक्रीच करू नये, असे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सांवत यांनी केले.

पालकमंत्री उदय सांमत यांच्या सुचनेनुसार दोडामार्ग तहसिलदारांनी तहसिल कार्यालयात बागायतदार आणि कारखानदारांची सयुंक्त बैठक बोलविली होती. या बैठकीला तहसिलदार मोरेश्‍वर हाडके, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, बँकेचे संचालक प्रकाश गवस, कृषी अधिकारी अतुल कांबळे, प्रेमानंद देसाई, आदी उपस्थित होते.

श्री. सांवत म्हणाले, कोरोनामुळे जर कुणी काजु बीयांची ६० किंवा ७० रूपयाने खरेदी करीत असेल तर ती शेतकऱ्यांची पिळवणूक आहे. कुणीही १२० रूपयेपेक्षा कमी दराने खरेदी करू नये. जर तशा प्रकारे खरेदी करण्याचा प्रयत्न करीत असेल तर योग्य तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. 

काजु बी हा नाशवंत घटक नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी हतबल होऊ नये. पीककर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी जिल्हा बँकेकडे परिपुर्ण प्रस्ताव सादर केल्यानतंर त्यांना सवलत दिली जाईल आणि सध्याची पैशाची गरजही भागविली जाईल. कोरोनामुळे काजुचे दर अजिबात कमी होणार नाहीत. शेतकऱ्यांनी लॉकडाऊन संपेपर्यंत काजुचा साठा करून ठेवावा, असे आवाहन देखील श्री. सांवत यांनी केले. याशिवाय आर्थीक गरज असलेल्या शेतकऱ्यांनी सोसायटीमार्फत मागणी करावी असेही त्यांनी सुचित केले.


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...