Agriculture news in Marathi Do not sell prohibited drugs | Agrowon

प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री करू नका

टीम अॅग्रोवन
बुधवार, 5 ऑगस्ट 2020

पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या विषबाधा रोखण्यासाठी प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री केली जाऊ नये, असे कृषी केंद्र विक्रेत्यांना सूचित करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेला केले आहे.

अकोला ः पिकांवर कीटकनाशक फवारणी करताना होणाऱ्या विषबाधा रोखण्यासाठी प्रतिबंधित कीटकनाशकांची विक्री केली जाऊ नये, असे कृषी केंद्र विक्रेत्यांना सूचित करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी व्यावसायिक संघटनेला केले आहे. याबाबत संघटनेचे अध्यक्ष प्रभाकरराव मानकर यांच्या माध्यमातून व्यावसायिकांना आवाहन करण्यात आले.

आॅगस्ट-सप्टेंबरमध्ये अकोला जिल्ह्यात शेतकरी, शेतमजुरांकडून पिकांवरील कीड व रोग नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी केली जाते. विषबाधेच्या घटनांचे प्रमाण वाढल्याचे गेल्या वर्षी निदर्शनास आले होते. सुदैवाने जीवितहानी झाली नव्हती. त्या अनुषंगाने विषबाधेच्या घटना कमी करण्यासाठी शासनाने पाच कीटकनाशकावर ६० दिवसासाठी अमरावती विभागात बंदी घातली होती.

कृषी विभागाने व जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेते, वितरक व उत्पादक कंपनी यांनी कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती केली. त्याचा परिणाम चांगला मिळाला. जिल्ह्यात विषबाधा व विषबाधेमुळे घडणाऱ्या मृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली. जिल्ह्यात २०२० मध्ये कापूस, सोयाबीन इतर पिकांची पेरणी झालेली असून पिकांवर कीड व रोगाचा प्रादुर्भाव नुकसान पातळीच्या खाली दिसून येत आहे.

सध्या शेतकरी पीक संरक्षणासाठी अतिविषारी कीटकनाशकाची फवारणी करीत असल्याने जिल्ह्यात विषबाधेची प्रकरणे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याअनुषंगाने विक्री, वितरण व वापरास मनाई केलेल्या पाच कीटकनाशकांची विक्री होऊ नये. यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी निविष्ठा विक्रेते व वितरकांना अवगत करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक अधिकारी मोहन वाघ यांनी केले आहे.


इतर बातम्या
कोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी...कोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने...
बार्शी तालुक्‍यात सोयाबीनचे मोठे नुकसानवैराग, जि. सोलापूर : बार्शी तालुक्‍यात...
`पांगरी परिसरातील पीक नुकसानीचा अहवाल...पांगरी : पांगरी (ता.बार्शी) भागात गेल्या दहा,...
परभणी जिल्ह्यात दीड लाख हेक्टर कपाशी...परभणी : यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात ५ लाख १९...
खानदेशात सव्वालाख क्विंटल हरभरा...जळगाव : खानदेशात रब्बी हंगामाची तयारी लवकरच सुरू...
खानदेशात केळीची उधारीने खरेदीजळगाव : खानदेशात कांदेबाग केळीची पुन्हा कमी दरात...
साखर कारखान्यांनी कामगारांची जबाबदारी...कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची...
नाशिक जिल्ह्यात पिकांचे ३७ हजार...नाशिक : चालू महिन्याच्या मध्यापासून जिल्ह्यात...
मराठवाड्यात पाऊस खरीप पिकांची पाठ सोडेनाऔरंगाबाद : जिल्ह्यात बहुतांश भागात हलका ते जोरदार...
मराठवाड्यात औरंगाबाद जिल्ह्याची पीक...औरंगाबाद ः मराठवाड्यात खरीप पीक कर्जवाटपात...
कांदा निर्यातबंदी उठवा; नगर जिल्हा...नगर : केंद्राने कांदा निर्यातबंदीचा निर्णय...
लातूर विभागात १५ लाख हेक्टरवर रब्बीचे...लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
नांदेडमध्ये पावसाने ८३ हजार हेक्टर...नांदेड : अतिवृष्टी, पूरामुळे जिल्ह्यातील...
वऱ्हाडात पावसाचा पुन्हा धुमाकूळअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा व वाशीम या...
शेतकरी विधवांकडून कंगना राणावतच्या...यवतमाळ : केंद्र सरकारच्या कृषी संबंधित नव्या...
सिंधुदुर्गाच्या काही भागात मुसळधार सुरूचसिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर...
सांगलीत रब्बीसाठी ३३ हजार क्विंटल बियाणेसांगली ः सांगली जिल्ह्यात रब्बी हंगामात युरियासह...
निळवंडे धरण तुडुंबअकोले, जि. नगर : उत्तर नगर जिल्ह्याला वरदान...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
आदिवासी बेरोजगारांसाठी औषधी वनस्पतीवरील...कर्जत, जि. रायगड : आदिवासींच्या उत्कर्षासाठी...