शाखीय वाढ झाल्याशिवाय मोसंबीचा बहर धरू नका : डॉ. संजय पाटील - सोयगावकर

Do not succumb to cataracts unless there is branch growth: Sanjay Patil - Soygaonkar
Do not succumb to cataracts unless there is branch growth: Sanjay Patil - Soygaonkar

बदनापूर, जि. जालना : ‘‘मोसंबी बागांचे व्यवस्थापन करताना शाखीय वाढ चांगली झाल्याशिवाय बहर धरू नये,’’ असा सल्ला मोसंबी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. संजय पाटील सोयगावकर यांनी दिला.

जालन्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आणि विभागीय कृषी विस्तार शिक्षण केंद्र, औरंगाबाद यांच्या माध्यमातून नियमित साजरे होणारे जिल्हा मासिक चर्चासत्र बुधवारी (ता. ११) कृषी विज्ञान केंद बदनापूर येथे झाले. अंबडचे तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी, वनस्पती रोग शास्रज्ञ डॉ. दिलीप हिंगोले, ‘केव्हीके’ प्रमुख डॉ. सचिन सोमवंशी, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. डी. बी. कच्छवे, डॉ. राहुल कदम, डॉ. साधना उमरीकर आदी उपस्थित होते.  

डॉ. पाटील म्हणाले, ‘‘मोसंबी लागवड करण्यापूर्वी या पिकाची शास्त्रीय माहिती अगोदर असणे आवश्यक आहे. जमिनीची निवड, माती परीक्षण, लागवडीचे अंतर, खड्डे खोदणे, भरणे, रोपांची निवड आणि सर्वांत महत्त्वाचे जोपर्यंत झाडाची कायिक वाढ चांगली होणार नाही, तोपर्यंत बहर न धरणे आवश्यक आहे. लवकर फळ धारणेकडे वळल्यास बागेचे आयुष्यमान कमी होते. त्यामुळे लागवडीनंतर पाच वर्षांनी एकच बहर धरणे शास्त्रीयदृष्ट्या योग्य असते.’’

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिंदे म्हणाले,‘‘उशिराने का होईना चांगला पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली. याचा उपयोग खरीप कापूस पिकानंतर रब्बी गहू, हरभरा, आणि मका  या पिकांना झाला. शिवाय कापूस पीक फरदड मुक्त ठेवा, या अभियानास शेतकऱ्यांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यामुळे या रब्बीत सरासरी असलेले पेरणीक्षेत्र १ लक्ष ७४ हजार आहे, त्या बदल्यात हे क्षेत्र २ लक्ष ९३ हजार क्षेत्रावर गेले.’’ डॉ. एस. बी. पवार म्हणाले, ‘‘तालुक्यातील पीक पद्धती आणि समस्या कळवा. त्या वेळेवर सोडविण्यासाठी निश्चितच प्रयत्न केले जातील.’’ 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com