Agriculture news in marathi do the Punchnama of damaged crops in Aurangabad: Desai | Agrowon

औरंगाबादमधील नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करा ः देसाई

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020

औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करुन त्वरित पंचनामे करा’’, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधितांना दिले. 

औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करुन त्वरित पंचनामे करा’’, असे निर्देश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी संबंधितांना दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील, तसेच महानगर पालिकेअंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा बुधवारी (ता. १६) देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महानगर पालिका आयुक्त अस्तिक कुमार पाण्डेय, पोलिस आयुक्त निखिल गुप्ता, पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले उपस्थित होते. 

देसाई म्हणाले, ‘‘अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात जवळपास ४० ते ५० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतचे त्वरित सर्वेक्षण करुन पंचनामे करावे, जिल्हा कौशल्य विकास प्रशिक्षण आराखड्यात मुख्यमंत्री यांची संकल्पना असलेले ‘विकेल ते पिकेल'' या धर्तीवर कृषी मालावर आधारित प्रक्रिया उद्योग प्रशिक्षणाचा समावेश करावा. रेशीम, कापूस, मका इत्यादी पिकांवर प्रक्रिया करुन उत्पादनाचा समावेश केल्यास रोजगार निर्मिती होऊन युवा शेतकऱ्यांना या प्रशिक्षणाचा लाभ मिळेल.’’

जिल्ह्यातील विभागीय क्रीडा संकुल, तालुका पातळीवरील संकुलाची कामे आणि क्रीडा संदर्भातील प्रगतीपथावरील विविध कामे आणि पुढील नियोजनाचे प्रस्ताव पुढील बैठकीत सादर करण्याच्या सूचना देसाई यांनी दिल्या. 


इतर ताज्या घडामोडी
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...
सातारा जिल्ह्याला पावसाने झोडपलेसातारा ः दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी...
नुकसानग्रस्तांना अधिकाधिक लाभ द्या :...भंडारा : ‘‘अतिवृष्टी व अवेळी आलेल्या...
नगर जिल्ह्यात शेतकऱ्यांची डाळिंब...नगर : दुष्काळ आणि यंदा अतीवृष्टी, तेल्या आणि...
पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधारपुणे : जिल्ह्यात पावसाच्या कमी अधिक स्वरूपात पाऊस...
मराठवाड्यात पीकविमा, नुकसानभरपाई मान्य...नांदेड : ‘‘जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात...