शेतीचा शाश्वत विकास करा : डॉ. डी. एल जाधव

औरंगाबाद : ‘‘शेतीतील उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करुन शास्त्रोक्त पद्धतीने शेती करण्यासाठी विविध सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. शेतीचा शाश्वत विकास करावा,’’ असे मत औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी व्यक्त केले.
 Do the Sustainable development of agriculture: Dr. D. L. Jadhav
Do the Sustainable development of agriculture: Dr. D. L. Jadhav

औरंगाबाद : ‘‘शेतीतील उत्पन्न वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी उत्पादन खर्च कमी करुन शास्त्रोक्त पद्धतीने शेती करण्यासाठी विविध सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करावा. शेतीचा शाश्वत विकास करावा,’’ असे मत औरंगाबादचे विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव यांनी व्यक्त केले. 

कृषी विभाग औरंगाबाद, येथील जिल्हा परिषद व कृषी विज्ञान केंद्रातर्फे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे बुधवारी (ता.१) आयोजन हसनाबादवाडी येथे करण्यात आले. 

जिल्ह्यात १ ते ७ जुलै या दरम्यान कृषी संजीवनी सप्ताह राबविण्यात येईल. त्याचा प्रारंभही यावेळी करण्यात आला. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, रामुकाका शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कवडे, पंचायत समिती सभापती छाया घारगे, राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पचे प्रमुख डॉ. सूर्यकांत पवार, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार , केव्हीके औरंगाबादचे प्रमुख डॉ. किशोर झाडे आदी उपस्थित होते. 

गायकवाड म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांनी अतिरिक्त कार्यक्रम व कामांसाठी होणारा खर्च कमी करून तो खर्च शेतीवर करावा. जेणेकरून शेती आपणाला त्याचा मोठ्या प्रमाणात परतावा देईल.’’ 

‘‘निंबोळी अर्क हे जवळपास सर्व किडींसाठी परिणामकारक आहे. इतर कीटकनाशकंपेक्षा खूप स्वस्त व प्रभावी असल्यामुळे सर्वांनी त्याचा वापर करावा, असे आवाहन डॉ. झाडे यांनी केले. गावातील पशुधनाच्या लसीकरणाचा कार्यक्रमाद्वारे पशुधनाचे लसीकरण करण्यात आले. धर्मशिला बेडेकर यांनी आभार मानले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com