डॉक्टर, कर्मचारी युद्धातील आघाडीचे सैनिक : आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : ‘कोरोना’च्या रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदनकेले.
Doctor, Staff Soldier in the War: Health Minister Rajesh Tope
Doctor, Staff Soldier in the War: Health Minister Rajesh Tope

मुंबई : ‘कोरोना’च्या रुग्णांची सेवा करणाऱ्या राज्यातील डॉक्टर्स, नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्राद्वारे आभार मानत त्यांचे अभिनंदन केले. ‘कोरोना’शी लढणारे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना आरोग्यमंत्र्यांनी ‘युद्धातील आघाडीवरचे सैनिक’ अशी उपमा दिली. जीवाची बाजी लावून समाजसेवेसाठी हे अतुलनीय शोर्य दाखवित असलेल्या या सर्वांना मानाचा मुजरा करीत असल्याचे त्यांनी या पत्रात म्हटले आहे. 

आरोग्य क्षेत्रातील सहकाऱ्यांना उद्देशून आरोग्यमंत्र्यांनी लिहलेल्या पत्रात म्हटलंय की, ‘कोरोना’चे जगभरात थैमान सुरू असताना मार्चच्या पहिल्या आठवड्यात या विषाणूचा आपल्या राज्यात शिरकाव झाला. तेव्हापासून आपण जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करताय. तुमच्या या कार्याला सलाम. तुमच्या तत्पर सेवेमुळे आणि अविरत मेहनतीमुळे आतापर्यंत राज्यातील ३९ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यात तुमचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आपणा सर्वांचे अभिनंदन व आभार! 

‘कोरोना’चा शिरकाव सुरू झाल्यापासून आपण सर्वप्रथम त्याला सामोरे गेला आहात. सर्वात आधी तुम्ही या युद्धाला सामोरे जाण्यासाठी नेतृत्व केले. त्याचप्रमाणे एखाद्या लढाईत आघाडीवरचा सैनिक झोकून देऊन नेटाने बाजी लढवत असतो, तसे तुम्ही आतापर्यंत धीराने ‘कोरोना’विरुद्ध लढता आहात. समाजाच्या सेवेसाठी हे अतुलनीय शौर्य तुम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून न थकता दाखवत आहात. हे अभिनंदनीय आहे. 

तुम्ही दाखवत असलेल्या धीरामुळे रुग्णांना तर मानसिक बळ मिळतेच, परंतु आम्हालाही त्यामुळे काम करण्याचे पाठबळ व प्रोत्साहन मिळत आहे. समस्त देशवासीय आपापल्या घरात कुटुंबियांसमवेत असताना आपण मात्र कर्तव्य भावनेतून कुटुंबापासून, आप्तस्वकीयांपासून दूर जात, सेवाभाव जपत आहात. खरे तर आपले कौतुक करायला माझ्याकडे शब्द अपुरे पडत आहेत. 

पुन्हा आपणा सर्वांना त्रिवार मानाचा मुजरा करतो. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी आपली लढाई अशीच सुरू ठेवू या. ‘मीच माझा रक्षक’ हा संदेश आपण सर्वसामान्यांना दिला आहे.

आपणही आपल्या प्रकृतीची काळजी घ्या, काही सूचना असतील तर माझ्यापर्यंत जरूर पोहोचवा, असे आवाहनही शेवटी आरोग्यमंत्र्यांनी या पत्राद्वारे केले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com