agriculture news in marathi doctors retirement at 58 age : highcourt | Agrowon

डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; औरंगाबाद खंडपीठाचा निकाल ; शासनाचे आदेश रद्द

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 एप्रिल 2020

औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे वैद्यकीय अधिकारी, शल्यचिकित्सकांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याच्या संदर्भाने शासनाने २०१५ मध्ये काढलेले तीन आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायधीश संजय गंगापूरवाला आणि न्यायधीश अनिल किलोर यांनी रद्द केले

औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे वैद्यकीय अधिकारी, शल्यचिकित्सकांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० करण्याच्या संदर्भाने शासनाने २०१५ मध्ये काढलेले तीन आदेश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायधीश संजय गंगापूरवाला आणि न्यायधीश अनिल किलोर यांनी रद्द केले; मात्र सध्याच्या कोरोना विषाणूचा फैलाव होण्यासारख्या परिस्थितीत निवृत्तीकाल वाढवून मिळालेल्या डॉक्टरांना सेवेतून कमी करू नये, असे स्पष्ट करीत भविष्यात कोणालाही मुदतवाढ देऊ नये, असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे.

राज्यातील सामान्य रुगणालय, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुगणालयात वैद्यकीय अधिकारी उपलबध होत नसल्याचे कारण देत शासनाने ३० मे, ३० जून व ३ सप्टेंबर २०१५ मध्ये तीन परिपत्रक काढून वैद्यकीय अधिकारी, शल्यचिकित्सकांसह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचे वय ५८ वरून ६० करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला बीड येथील संजय कदम आणि इतरांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून आव्हान दिले होते. याचिकाकर्त्यांसारखे इतरांनाही भविष्यात प्रगतीचे कायदेशीर हक्क डावलले जातील. नजीकच्या काही अधिकाऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी निवृत्ती वय वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. रिक्त पदांचे कारण दिले जात असले तरी ते भरण्यासाठी कोणतीही पावले उचलण्यात आली नाहीत. महाराष्ट्र नागरी सेवा नियमात निवृत्तीचे वय ५८ वर्षे दर्शवले असून, अशा कायद्यात बदल करणे योग्य नाही, असे याचिकेत म्हटले होते.

शल्यचिकित्सकांची ३७७ पदे रिक्त
या प्रकरणात शासनाकडून युक्तिवाद करताना सरकारी वकील व्ही. एम. कागणे यांनी निवेदन केले, की राज्यातील विविध रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध होत नसल्यामुळे १९८२ च्या नियमातील कलम १२ चे अधिकार वापरून शासनाने निवृत्तीचे वय वाढविले आहे. सध्या राज्यात शल्यचिकित्सकांची ६४३ पदे मंजूर असली तरी त्यातील ३७७ पदे रिक्त आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या २८२ मंजूर पदांपैकी १४१ पदे रिक्त आहेत. स्पेशल कॅडरमधील ६२७ मंजूर पदांपैकी ४६६ पदे रिक्त आहेत. याचिकाकर्ते सरकारी नोकरदार असल्याने त्यांना प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे दाद मागता येईल. 


इतर ताज्या घडामोडी
जी.  आर. चिंताला यांनी ‘नाबार्ड’च्या...मुंबई : डॉ. हर्षकुमार भानवाला यांचा कार्यकाळ...
जळगाव जिल्ह्यात मका, ज्वारी खरेदीसाठी...जळगाव : जिल्ह्यात शासकीय केंद्रात हमीभावात मका व...
कापूस खरेदीसाठी केंद्रांची संख्या वाढवा...जळगाव : शासकीय कापूस खरेदीला गती देण्यासाठी...
शेतकऱ्यांनो पीक कर्जाबाबत निश्चित राहा...नाशिक : ‘‘महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात १७ लाख...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नांदेडमध्ये पीककर्जाच्या ऑनलाइन...नांदेड : यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील...
इंदापुरात मका खरेदीसाठी ऑनलाइन नोंदणी...पुणे ः इंदापूर तालुका कृषी उत्पत्र बाजार...
थकीत एफआरपी द्या ः बळीराजा शेतकरी संघटनासातारा : कोरोनामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले...
जालन्यातील ७६२ तूर उत्पादकांना...जालना : जिल्ह्यातील सहा हमी दर खरेदी केंद्रांवरून...
अमरावतीत २५ जिनींगव्दारे कापूस खरेदीअमरावती ः खरिपाच्या पार्श्‍वभूमीवर कापूस खरेदीला...
सोलापुरात खते, बियाणे थेट शेतकऱ्यांच्या...सोलापूर : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना थेट...
पुणे बाजार समिती उद्यापासून सुरू होणारपुणे ः कोरोना टाळेबंदीमुळे गेली सुमारे दीड...
चांदोरीत शॉर्टसर्किटमुळे १० एकर ऊस खाक चांदोरी, जि. नाशिक : निफाड तालुक्यातील चांदोरी...
बाजार समित्यांनी सीसीआयला मनुष्यबळ...वर्धा ः सीसीआयकडे आवश्‍यक ग्रेडर कमी आहेत....
औरंगाबादमध्ये खरिपातील बियाणे विक्री...औरंगाबाद : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
मुख्यमंत्री अन्नप्रक्रिया योजना सुरूच...पुणे : गटशेती तसेच फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या...
कृषी निविष्ठा बांधावर उपलब्ध करुन द्या...पुणे ः खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे व खते...
माॅन्सूनपूर्वी करा कापसाची खरेदी ः...अमरावती ः वरुड तालुक्‍यात लॉकडाऊनमुळे सीसीआय तसेच...
टोळधाडबाधीत क्षेत्रातील मदतीचे प्रस्ताव...अमरावती ः जिल्ह्यात टोळधाडीच्या झुंडीने केलेल्या...
ताकारी योजनेचे पाणी चिखलगोठणला पोहोचलेसांगली ः ताकारी उपसा जलसिंचन योजनेच्या सुरू...