महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा दस्तऐवज ः महसूलमंत्री थोरात

पुण्यातील इंद्रायणी तांदूळ, नागपूरची संत्री अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण पिके राज्यात आहेत. महाराष्ट्राच्या या समृद्ध पीकसंपदेचा दस्तऐवज ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकामुळे उपलब्ध झाला आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.
Document of Prosperous Crop Resources of Maharashtra: Revenue Minister Thorat
Document of Prosperous Crop Resources of Maharashtra: Revenue Minister Thorat

संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी विविधता आहे. कोकणातील हापूस, जळगावचे भरीत वांगे, मराठवाड्यातील केसर आंबा, पुण्यातील इंद्रायणी तांदूळ, नागपूरची संत्री अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण पिके राज्यात आहेत.  महाराष्ट्राच्या या समृद्ध पीकसंपदेचा दस्तऐवज ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकामुळे उपलब्ध झाला आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

ॲग्रोवनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मंत्री थोरात यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २२) झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, एपी ग्लोबालेचे कार्यकारी उपाध्यक्ष बॉबी निंबाळकर, ॲग्रोवन डिजिटलचे कन्टेन्ट चीफ रमेश जाधव, ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, सहकारमहर्षी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहळ, उपाध्यक्ष संतोष हासे, संगमनेर तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, डॉ. प्रतापराव उबाळे, ॲग्रोवनचे मुख्य वितरण व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी प्रमुख उपस्थित होते.  कृषी क्षेत्रामध्ये जगात नवीन काय चालू आहे हे पाहण्यासाठी शेतकरी ॲग्रोवन वाचतात, असे थोरात म्हणाले. शेती क्षेत्रातील नवीन प्रवाहांची माहिती देण्याबरोबरच महाराष्ट्राच्या शेतीच्या समृद्ध वारशाची नोंद ॲग्रोवनच्या माध्यमातून होत आहे, असे त्यांनी सांगितले. शेती क्षेत्रातील सकारात्मक घटना-घडामोडींना ॲग्रोवन प्राधान्याने स्थान देते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

‘‘ॲग्रोवनच्या दिवाळी अंकात महाराष्ट्रातील पारंपरिक व वैशिष्ट्यपूर्ण पिकांचा धांडोळा घेतला आहे. ॲग्रोवनचा प्रत्येक दिवाळी अंक एका विशिष्ट थीमवर केंद्रित असतो. तीच परंपरा कायम ठेवून यंदाच्या अंकात वैशिष्ट्यपूर्ण पीकसंपदेचा वेध घेतला आहे,’’ असे आदिनाथ चव्हाण म्हणाले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर बाबा ओहळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला लक्ष्मण कुटे, आर, बी. रहाणे, मोहनराव करंजकर, संतोष मांडेकर, विलास कवडे, ॲड. बाबासाहेब गायकर, माणिक यादव, विलास वरपे, डॉ. गंगाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध सकस आणि दर्जेदार आशयासाठी ॲग्रोवनचा दिवाळी अंक ओळखला जातो. यंदाचा दिवाळी अंक महाराष्ट्रातील चविष्ट, पौष्टिक अन् पर्यावरणपूरक अशा वैशिष्ट्यपूर्ण पीकसंपदेचा रंजक धांडोळा घेणारा आहे. हा दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com