Agriculture news in Marathi Document of Prosperous Crop Resources of Maharashtra: Revenue Minister Thorat | Page 3 ||| Agrowon

महाराष्ट्राच्या समृद्ध पीकसंपदेचा दस्तऐवज ः महसूलमंत्री थोरात

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 ऑक्टोबर 2021

पुण्यातील इंद्रायणी तांदूळ, नागपूरची संत्री अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण पिके राज्यात आहेत.  महाराष्ट्राच्या या समृद्ध पीकसंपदेचा दस्तऐवज ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकामुळे उपलब्ध झाला आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

संगमनेर, जि. नगर ः ‘‘महाराष्‍ट्रात पिकांची मोठी विविधता आहे. कोकणातील हापूस, जळगावचे भरीत वांगे, मराठवाड्यातील केसर आंबा, पुण्यातील इंद्रायणी तांदूळ, नागपूरची संत्री अशी अनेक वैशिष्ट्यपूर्ण पिके राज्यात आहेत.  महाराष्ट्राच्या या समृद्ध पीकसंपदेचा दस्तऐवज ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकामुळे उपलब्ध झाला आहे,’’ असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले.

ॲग्रोवनच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मंत्री थोरात यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २२) झाले. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी ॲग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, एपी ग्लोबालेचे कार्यकारी उपाध्यक्ष बॉबी निंबाळकर, ॲग्रोवन डिजिटलचे कन्टेन्ट चीफ रमेश जाधव, ज्येष्ठ नेते बाजीराव पाटील खेमनर, सहकारमहर्षी कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहळ, उपाध्यक्ष संतोष हासे, संगमनेर तालुका दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाख, डॉ. प्रतापराव उबाळे, ॲग्रोवनचे मुख्य वितरण व्यवस्थापक चंद्रशेखर जोशी प्रमुख उपस्थित होते. 

कृषी क्षेत्रामध्ये जगात नवीन काय चालू आहे हे पाहण्यासाठी शेतकरी ॲग्रोवन वाचतात, असे थोरात म्हणाले. शेती क्षेत्रातील नवीन प्रवाहांची माहिती देण्याबरोबरच महाराष्ट्राच्या शेतीच्या समृद्ध वारशाची नोंद ॲग्रोवनच्या माध्यमातून होत आहे, असे त्यांनी सांगितले. शेती क्षेत्रातील सकारात्मक घटना-घडामोडींना ॲग्रोवन प्राधान्याने स्थान देते, असे निरीक्षण त्यांनी नोंदवले. 

‘‘ॲग्रोवनच्या दिवाळी अंकात महाराष्ट्रातील पारंपरिक व वैशिष्ट्यपूर्ण पिकांचा धांडोळा घेतला आहे. ॲग्रोवनचा प्रत्येक दिवाळी अंक एका विशिष्ट थीमवर केंद्रित असतो. तीच परंपरा कायम ठेवून यंदाच्या अंकात वैशिष्ट्यपूर्ण पीकसंपदेचा वेध घेतला आहे,’’ असे आदिनाथ चव्हाण म्हणाले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी केले. तर बाबा ओहळ यांनी आभार मानले. कार्यक्रमाला लक्ष्मण कुटे, आर, बी. रहाणे, मोहनराव करंजकर, संतोष मांडेकर, विलास कवडे, ॲड. बाबासाहेब गायकर, माणिक यादव, विलास वरपे, डॉ. गंगाधर चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध
सकस आणि दर्जेदार आशयासाठी ॲग्रोवनचा दिवाळी अंक ओळखला जातो. यंदाचा दिवाळी अंक महाराष्ट्रातील चविष्ट, पौष्टिक अन् पर्यावरणपूरक अशा वैशिष्ट्यपूर्ण पीकसंपदेचा रंजक धांडोळा घेणारा आहे. हा दिवाळी अंक सर्वत्र उपलब्ध झाला आहे.


इतर बातम्या
मेंढ्यांच्या संरक्षणासाठी लवकरच योजना ...सुपे, जि. पुणे ः पावसाची संततधार, अतिवृष्टी व...
शेतकऱ्यांनी करून दाखवलं : डॉ. गौहर रझा नाशिक : नव्या भारताचे स्वप्न साकारण्यासाठी शेतकरी...
द्राक्ष पीकविमा योजना  विभागनिहाय...नाशिक : दोन दिवसांपासून राज्यात झालेल्या...
सोयाबीन दरातील सुधारणा  आठवड्याच्या...पुणे ः चालू आठवड्यात बुधवारनंतर सोयाबीन दरात...
‘जवाद’ चक्रीवादळाची  तीव्रता कमी होणारपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘जवाद’ चक्रीवादळ...
दर्जेदार कृषी विद्यापीठांत  राज्याला...पुणे ः देशातील पहिल्या २० दर्जेदार कृषी...
पुणे जिल्ह्यात १,२४५ ‘विकेल ते पिकेल’...पुणे : शेतीमालाला केवळ हमीभाव नाही तर हमखास भाव...
पुणे जिल्ह्यात धरणांत एक टीएमसी...पुणे : जिल्ह्यात दोन दिवसांपासून धुमाकूळ...
कोल्हापूर जिल्हा बँकेसाठी ३६८...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या...
सांगली जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांचे...सांगली : जिल्ह्यामध्ये दोन दिवसांपूर्वी मुसळधार...
सांगली जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष पदाची...सांगली ः जिल्हा बँकेत अध्यक्षपदी आमदार मानसिंगराव...
नंदुरबार : पशुसंवर्धन विभागाच्या...नंदुरबार : पशुसंवर्धन विभागामार्फत सन २०२१-२२ या...
नंदुरबार : रब्बीचे अनुदानित बियाणे...नंदुरबार : कृषी विभागाच्या राष्ट्रीय अन्नसुरक्षा...
खानदेशात मका लागवड घटणार  गहू, बाजरीची...जळगाव ः खानदेशात मका लागवड घटेल, असे संकेत आहेत....
नांदेड जिल्ह्यात नुकसानीच्या मदतीचे...नांदेड : अतिवृष्टिग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी...
नगर जिल्ह्यात रब्बी पेरणी पोहोचली ३१...नगर ः रब्बी हंगामातील बहुतांश पिकांच्या पेरणीचा...
सातारा जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३) पावसाचा जोर...
रब्बी, उन्हाळी हंगामांत पिकांखालील...वर्धा : या वर्षी पाऊस लांबल्याने प्रकल्पांमध्ये...
सोलापूर :शेतकऱ्यांना दुधाळ गाई,...सोलापूर : पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ गाई-...
वीज प्रश्‍नांवर सकारात्मक तोडगा काढणार...वाशीम : जिल्ह्यात विजेची समस्या दिवसेंदिवस गंभीर...