परभणीत दोडका १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

परभणीत दोडका १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल
परभणीत दोडका १५०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल

परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला मार्केटमध्ये शुक्रवारी (ता. २६) दोडक्याची ३५ क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १५०० ते २५०० रुपये दर मिळाले, अशी माहिती मार्केटमधील सूत्रांनी दिली.

पालेभाज्यांमध्ये पालकाची १० क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. शेपूची २५ क्विंटल आवक झाली.  त्यास प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये दर मिळाले. चुक्याची १० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ८०० ते १५०० रुपये दर मिळाले. कोथिंबिरीची ८० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपये दर मिळाले.

शेंगवर्गीय भाज्यांमध्ये शेवग्याची ६ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ३५०० ते ५००० रुपये,  गवारीची ३० क्विंटल आवक, तर दर १२०० ते २००० रुपये, चवळीची ६ क्विंटल आवक, तर दर २००० ते ३००० रुपये मिळाले. वेलवर्गीय भाज्यांमध्ये कारल्याची २० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. दुधी भोपळ्याची २० क्विंटल आवक होऊन त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १२०० रुपयांचे दर मिळाले.

काकडीची ३० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ७०० ते १२०० रुपये दर मिळाले. वांग्याची ६० क्विंटल आवक होऊन  प्रतिक्विंटल ६०० ते १२०० रुपये दर मिळाले. टोमॅटोची ५५० क्रेट आवक झाली. त्यांना प्रतिक्रेट ४०० ते ८०० रुपये रुपये दर मिळाले. हिरव्या मिरचीची ६० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल  २५०० ते ३००० रुपये दर मिळाले. ढोबळ्या मिरचीची ८  क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल ३००० ते ३५०० रुपये दर  मिळाले.

भेंडीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. फ्लॅावरची ८ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल ४००० ते ५००० रुपये मिळाले. कोबीची २० क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल १२०० ते २००० रुपये दर मिळाले. मधुमक्याची १० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल १२०० ते १८०० रुपये दर मिळाले. कंदवर्गीय भाज्यांमध्ये बीट रूटची २ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये, पातीच्या कांद्याची ४ क्विंटल आवक, तर दर प्रतिक्विंटल १५०० ते २००० रुपये मिळाले.

फळांमध्ये लिंबांची १५ क्विंटल आवक झाली. त्यास प्रतिक्विंटल २५०० ते ४००० रुपयांचे दर मिळाले. कैरीची २५ क्विंटल आवक झाली. तिला प्रतिक्विंटल ३००० ते ५००० रुपयांचा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com