सोलापुरात दोडका, घेवडा, गवारीला पुन्हा उठाव

Dodaka, Ghevda and Guar rise again in Solapur
Dodaka, Ghevda and Guar rise again in Solapur

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दोडका, घेवडा, गवारीला या सप्ताहात पुन्हा उठाव मिळाला. त्यामुळे त्यांच्या दरातील सुधारणा या सप्ताहातही कायम राहिली, असे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. 

बाजार समितीच्या आवारात गतसप्ताहात दोडका आणि घेवड्याची आवक १० ते १५ क्विंटल, तर गवारीची आवक २ ते ५ क्विंटलपर्यंत राहिली. या फळभाज्यांची सर्व आवक स्थानिक भागातून झाली.

दोडक्‍याला प्रतिक्विंटलला किमान ८०० रुपये, सरासरी १५०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, गवारीला किमान १५०० रुपये, सरासरी ३००० रुपये आणि सर्वाधिक ५००० रुपये, तर घेवड्याला किमान १५०० रुपये, सरासरी २००० रुपये आणि सर्वाधिक ३०००  रुपये असा दर मिळाला. 

याशिवाय वांगी, ढोबळी मिरची यांचे दरही काहिसे स्थिर राहिले. वांग्याला प्रतिक्विंटलला किमान ४०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, तर ढोबळ्या मिरचीला किमान ७०० रुपये, १५०० रुपये आणि सर्वाधिक २५०० रुपये असा दर मिळाला. त्यांची आवक प्रतिदिन १० ते ३० क्विंटलपर्यंत राहिली. 

भाजीपाल्यांच्या दरातील चढ-उतार या सप्ताहातही कायम राहिला. त्यातही चुका आणि पालकाला काहीसा उठाव मिळाला. पण मेथी, शेपू, कोथिंबिरीचे दर कमी-अधिक होत राहिले. भाज्यांची आवक ही प्रामुख्याने स्थानिक भागातूनच झाली. प्रतिदिन १० ते १५ हजार पेंढ्यांपर्यंत ही आवक होती. मेथी, शेपू आणि कोथिंबिरीला २०० ते ३०० रुपये असा दर मिळाला. चुका आणि पालकाला मात्र ४०० रुपयांपर्यंत दर मिळाला.

कांद्याचे दर टिकून

कांद्याच्या दरात फारसा चढ-उतार राहिला नाही. पण, मागणी असल्याने दर टिकून राहिले. कांद्याची आवक प्रतिदिन १०० ते २०० गाड्यापर्यंत राहिली. त्यांना प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ३६०० रुपये आणि सर्वाधिक १० हजार रुपये असा दर मिळाला. त्यांच्या दरामध्ये ४०० ते ६०० रुपयांचा चढ-उतार वगळता दर टिकून राहिल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com