पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाच्या सुमारे ७० ट्रक आवक झाली होती.
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत  Dodka, flowers, peas are booming in Pune
पुण्यात  दोडका, फ्लॉवर, मटार तेजीत  Dodka, flowers, peas are booming in Pune

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. १२) राज्यासह परराज्यांतून विविध शेतमालाच्या सुमारे ७० ट्रक आवक झाली होती. राज्याच्या विविध भागांतील पावसाची परिस्थिती, विविध भाजीपाल्याचा खरिपातील संपत आलेला हंगाम यामुळे गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक कमी झाली होती. तर गौरीच्या प्रतिष्ठापनेनंतर सोमवारी (ता.१३) विविध भाजीपाल्यांची मागणी वाढल्याने गवार, दोडका, कारली फ्लॉवर, सिमला मिरची, मटार यांच्या दरात १० ते २० टक्क्यांनी वाढ झाली होती. तर इतर बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिर होते.  परराज्यांतून होणाऱ्या आवकेमध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटन आणि गुजरात येथून सुमारे १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात आणि कर्नाटक येथून कोबी ४ टेम्पो, तमिळनाडू येथून ५ टेम्पो शेवगा, इंदौर येथून गाजर ७ टेम्पो, कर्नाटक आणि गुजरात येथुन भुईमुगाच्या शेंगांची ३ टेम्पो, कर्नाटकातून घेवडा २ टेम्पो तर मध्य प्रदेशातून लसणाची १० ट्रक आवक झाली होती.  स्थानिक आवकेमध्ये सातारी आले सुमारे १ हजार पोती तर गवार ५ टेम्पो, भेंडी, फ्लॉवर, कोबी आणि तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे ७ , सिमला मिरची १० टेम्पो, हिरवी मिरची ४ टेम्पो, स्थानिक मटार १५० गोणी, टोमॅटो ७ हजार क्रेट, तर कांदा ६० ट्रक आवक झाली होती. तर आग्रा, इंदौर आणि गुजरात व स्थानिक भागांतून बटाट्याची ४० ट्रक आवक झाली होती. 

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव  कांदा : १४०-१८०, बटाटा : ८०-१३०, लसूण : ३००-९००, आले : सातारी १५०-२५०, भेंडी : १५०-२००, गवार : ३००-४००, टोमॅटो : ५०-१००, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : १५०-२५०, दुधी भोपळा : ८०-१२०, चवळी : २००-२२०, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी १२०-१५०, पांढरी ८०-१००, पापडी : २००-२५०, पडवळ : १६०-१८०, फ्लॉवर : २००-२५०, कोबी : ४०-८०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२२०, नवलकोल : ७०-८०, ढोबळी मिरची : १८०-२५०, तोंडली : कळी ३००-३२०, जाड : १४०-१५०, शेवगा : ३५०-४००, गाजर : २२०- २५० वालवर : २००-२५०, बीट : ८०-१००, घेवडा : ४००-४५०, कोहळा : १००-१२०, आर्वी : २००-२५०, घोसावळे : २००-२२०, ढेमसे : २५०-३००, पावटा : १५०-२००, भुईमूग शेंग : ३२०-३५०, मटार - १०००-११००, तांबडा भोपळा : ६०-१००, सुरण :१८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.  पालेभाज्याचे शेकड्याचे दर  पालेभाज्यांमध्ये कोथिंबीरीच्या सुमारे एक लाख तर मेथीच्या ७० हजार जुड्या आवक झाली होती.  कोथिंबीर - १०००-१५००, मेथी -१०००-१४००, शेपू ३००-६००, कांदापात ६००-१०००, चाकवत -५००-६००, करडई ५००-६००, पुदिना १००-४००, अंबाडी - ५००-७००, मुळे - ८००-१२००, राजगिरा - ३००-४००, चुका ५००-८००, चवळई - ३००-५००, पालक ८००-१०००.  फळबाजारात रविवारी (ता.१२) लिंबाची सुमारे अडीच हजार गोणी, डाळिंबाची सुमारे ४० टन, मोसंबी ६० टन, संत्रा २५ टन, पपई १० टेम्पो, चिक्कू २ हजार गोणी, पेरूची सुमारे ८०० क्रेट, सीताफळ १० टन, कलिंगड १० तर खरबूज २ टेम्पो आवक झाली होती. 

फळांचे भाव पुढीलप्रमाणे लिंबे (प्रति गोणी) : २००-५००, मोसंबी : (३ डझन) : १००-२५०, (४ डझन) : ८० -१६०, संत्रा : (१०किलो) : १००-६५०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : ४०-१५०, गणेश : ५-२५, आरक्ता १०-५०. कलिंगड : ५-१० खरबूज : १५-२० पपई : १०-२०, चिक्कू (१० किलो) १००-५५०, पेरू (२० किलो): २५०-४००  फुलबाजार  गौरी गणपतीमुळे फुलांच्या आवकेसह मागणीत वाढ झाल्याने दर वाढले होते.  फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ३०-७०, गुलछडी : ३००-६००, अष्टर : जुडी १०-२५, सुट्टा ५०-१००, कापरी : ३०-६०, शेवंती : ४०- ८०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-५०, गुलछडी काडी : ३०-६०, डच गुलाब (२० नग) : ६०-१५०, जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन : ८०- १२०, शेवंती काडी १००-१५०, लिलियम (१० काड्या) ८००-१२००, ऑर्चिड ३००-६००, ग्लडिओ (१० काड्या) : ६०-१२०. जुई -८००-१२००.  मटण मासळी  गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी ( ता. १२) खोल समुद्रातील मासळीची सुमारे ५ टन, खाडीच्या मासळीची सुमारे २०० किलो, नदीतील मासळीची सुमारे दीड टन. तर आंध्र प्रदेशातून रहू, कतला, सीलनची सुमारे ८ टन आवक झाल्याची माहिती व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. गणेशोत्सव तसेच गौरी आगमनामुळे उपाहारगृह चालक वगळता मासळीला किरकोळ ग्राहक वगळता फारशी मागणी नव्हती. मटण आणि चिकनला मागणी नसल्याने दर स्थिर होते. असे मटण विक्रेते प्रभाकर कांबळे तसेच चिकन विक्रेते रुपेश परदेशी यांनी सांगितले. 

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १३००-१५०० मोठे -१२००, मध्यम : ८००-८५०, लहान ६००-७५०, भिला : ५५०-६००, हलवा : ४००-४५०, सुरमई : ३५०-६५०, रावस : लहान ५००-६००, मोठा : ७००-८०० घोळ : ६००-७००, करली : २००-३००, पाला : ६००-७००, वाम : पिवळी : ७००-७५०, करंदी (सोललेली)-४४०-४८० ओले बोंबील : १००-१६०, 

कोळंबी : लहान १८०-३२०, मोठी-३६०-४८०, जंबो प्रॉन्स : १२००-१३०० किंग प्रॉन्स : ७००-८०० लॉबस्टर : १३००, मोरी : २००-२८०, खेकडे : २४०-२८० चिंबोऱ्या : ४००-४८०, मांदेली-१२०-१६०, राणीमासा-१६०-१८० 

खाडीची मासळी : सौंदाळे-२४०, खापी-२२०-२८०, नगली : ३००-४००, तांबोशी : ४००-४८०, पालू- २००, बांगडा : २२०-३२०, शेवटे १६०-२८०. तिसºया: २००- २४०, खुबे : १००-१४०, लेपा-१००-१६०, शेवटे-२००-२४०, पेडवी-१००, वेळुंजी-१२०-१६०, खुबे-१००, तारली-१४०-१६० 

नदीची मासळी : रहू : १००-१६० कतला : १००-१६०, मरळ : २८०-३६०, शिवडा : २००-२४० खवली : २००-२४० आम्ळी : १००-१६० खेकडे : २००, वाम : ४८ 

चिकन : चिकन : २००, लेगपीस : २५०, जिवंत कोंबडी : १५०, बोनलेस : ३००. 

अंडी : गावरान : शेकडा : ८४० डझन : १०८ प्रति नग : ९, इंग्लिश : शेकडा : ४४० डझन : ६० प्रतिनग : ५. 

मटण : बोकडाचे : ६६० बोल्हाईचे : ६६० खिमा : ६६०, कलेजी : ७००.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com