Agriculture news in marathi, Dodka to the Nagar, improvement in the price of okra | Page 2 ||| Agrowon

नगरला दोडका, भेंडीच्या दरात सुधारणा

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 ऑक्टोबर 2021

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्‍पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दरदिवस नेहमीच्या तुलनेत २०० क्विंटलने घट झाली. दोडका, भेंडी, वालच्या दरात मात्र सुधारणा झाली आहे. भुसारमालाची आवक स्थिर आहे. 

नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्‍पन्न बाजार समितीत गेल्या आठवडाभरात दरदिवस नेहमीच्या तुलनेत २०० क्विंटलने घट झाली. दोडका, भेंडी, वालच्या दरात मात्र सुधारणा झाली आहे. भुसारमालाची आवक स्थिर आहे. सोयाबीनची आवक वाढत आहे. सोयाबीनला पाच हजार शंभर रुपयावर दर मिळत आहे. 

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत टोमॅटोची दर दिवसाला ११५ ते १२५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ४ हजार, वांग्यांची ३ ते ५ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५००, फ्लॉवरची ३० ते ३५ क्विंटलची आवक होऊन ३ हजार ५ हजार ५००, कोबीची ७५ ते ८० क्विंटलची आवक होऊन २ ते १ हजार, काकडीची १९ ते २२ क्विंटलची १ हजार ते २ हजार, गवारीची १ ते ३ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते ९ हजार ५०० रुपये, घोसाळेची १ ते २ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ३ हजार ५००, दोडक्याची ११ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार रुपये दर मिळाला.

कारल्याची ११ ते १३ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते ४ हजार, भेंडीची २९ क्विंटलची आवक होऊन २ हजार ते चार हजार, बटाट्याची १९५ क्विंटलची आवक होऊन ६०० ते १२००, हिरव्या मिरचीची ९० ते ९५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ते ३ हजार २००, शेवग्याच्या शेंगांची १ ते २ क्विंटलची आवक होऊन ४ हजार ते १० हजार, शिमला मिरचीची २१ ते २५ क्विंटलची आवक होऊन १ हजार ५०० ते ४ हजार रुपयांचा दर मिळाला.

गावरान ज्वारीचे दर स्थिर 

नगर बाजार समितीत गेल्या आठवडाभरात गावरान ज्वारीचे दर स्थिर राहिले. ज्वारीला १४०० ते १८०० रुपयाचा दर मिळाला. बाजरीला १४०० ते १५५७ तर, तुरीला ५१०० ते ५५०० रुपयांचा दर मिळाला. हरभऱ्याला ४२०० ते ४९००, मुगाला ५ हजार ते ७ हजार, उडदाला ४ हजार ते ६ हजार ५००, मिरचीला ४२००, सोयाबीनला ४१०० ते ५१११, मक्याला १४०० ते १८०० रुपये व गूळ डागाला ३२०० ते ३९०० रुपयाचा दर मिळाला,..


इतर बाजारभाव बातम्या
मकर संक्रांतीसाठी सांगलीत गुळाची आवक...सांगली : संक्रांतीनिमित्त सांगली बाजार समितीत...
अकोट बाजार समितीत कापूस दहा हजारांवरअकोला ः जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार...
येल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार...जळगाव  ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील...
नगरला वांगी, फ्लॉवरच्या दरात सुधारणा...नगर, ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
जालन्यात तुरीची सर्वाधिक आवकजालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
नाशिकमध्ये डाळिंबाची आवक घटली; दर स्थिरनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...
कळमनामध्ये सोयाबीनची आवक मंदावलीनागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने कळमना...
पुण्यात बहुतांश भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
Tur Farming : देशातील तूर उत्पादनात २०...राज्यात किड-रोगामुळे उत्पादकता आणि गुणवत्तेवर...
राज्यात तूर ४८०१ ते ६१५० रुपये क्विंटलसोलापुरात प्रतिक्विंटलला ५५०० ते ५८०० रुपये...
नगरमध्ये वांगी, फ्लॉवर, डिंगरीच्या दरात...नगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...
हिरवी मिरची, शिमला मिरची, फ्लॉवर, वांगी...पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये...
राज्यात वांगी १८०० ते १२००० रुपये...औरंगाबादमध्ये क्विंटलला ३५०० ते ४००० रुपये...
Tur Market Updtate I तूर आली बाजारी...पुणे : राज्यात हमीभावाने तूर खरेदी करण्याचे...
मोदी सरकारचा शेतकऱ्यांवर वायदेबंदीचा वारनवी दिल्ली : अखेर केंद्र सरकारने डाव साधलाच...
नागपुरात तेजीच्या अपेक्षेने सोयाबीनची...नागपूर ः दरातील तेजीच्या अपेक्षेने शेतकऱ्यांकडून...
भेंडी, गवार, मिरची, प्लॉवर, वांगी...पुणे ः पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी...
राज्यात संत्रा ५०० ते ६००० रुपये क्विंटलनागपुरात क्विंटलला २३०० ते २५०० रुपये नागपूर...
इजिप्त, इराण, तुर्कस्तान अन पाकच्या...नाशिक  : लाल कांद्याची (Red Onion) आवक...
नगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा;...नगर ः येथील दादा पाटील शेळके बाजार समितीत गेल्या...