नाशिकमध्ये दोडका २९१० ते ७०८० रूपये प्रतिक्विंटल

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडक्याची आवक ३२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २९१० ते ७०८० दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रुपये राहिला.
  Dodka in Nashik at Rs. 2910 to 7080 per quintal
Dodka in Nashik at Rs. 2910 to 7080 per quintal

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दोडक्याची आवक ३२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २९१० ते ७०८० दर मिळाला. सर्वसाधारण दर ५००० रुपये राहिला. आवक घटल्याने दरात तेजी असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. बाजारात शेतमालाची आवक सर्वसाधारण असून सध्या दरांत सुधारणा झाली आहे. 

वांग्यांची आवक १८०क्विंटल झाली. त्यांना प्रति क्विंटल २००० ते ३६०० असा दर मिळाला. त्यास सरासरी दर २९०० रूपये राहिला. फ्लॉवरची आवक ३२३ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ७१५ ते १६४० रूपये दर मिळाला. त्यास सरासरी दर १२५० रूपये राहिला. कोबीची आवक ९७८ क्विंटल झाली. तिला ५०० ते ९१५ रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० रूपये राहिले. ढोबळी मिरचीची आवक १०५ क्विंटल झाली. तिला ३७५० ते ८१२५ रूपये, तर सर्वसाधारण दर ६२५० रूपये राहिला. 

भोपळ्याची आवक ५२५ क्विंटल होती. त्यास ७३० ते १८००, तर सर्वसाधारण दर १६०० रूपये राहिला. कारल्याची आवक ४४५ क्विंटल झाली. त्यांना १२५० ते २७०० रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर २५०० रूपये राहिला. गिलक्यांची आवक ३० क्विंटल झाली. त्यांना १६६५ ते २९१५, तर सर्वसाधारण दर २२५० रूपये राहिला. 

भेंडीची आवक ५० क्विंटल झाली. तिला १००० ते २०८० रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० रूपये राहिला.

हिरव्या मिरचीची आवक ३६२ क्विंटल झाली. तिला ३००० ते ४००० रूपये दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३५०० रूपये राहिला. काकडीची आवक ७७० क्विंटल झाली. तिला ७५० ते २५००, तर सर्वसाधारण दर १७५० रूपये राहिला.  कांद्यांची आवक ११८० क्विंटल झाली. त्यास २७५ ते ७७५ रूपये दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ६०० रूपये राहिला. बटाट्याची आवक ८१० क्विंटल झाली. त्यास १६०० ते २१००, तर सर्वसाधारण दर १८०० रूपये राहिला. लसणाची आवक ९० क्विंटल झाली. त्यास ३५०० ते १००००, तर सर्वसाधारण दर ६५०० रूपये मिळाला. 

डाळिंबांना ४२५० रूपये दर

फळांमध्ये डाळिंबांची आवक १४८९ क्विंटल झाली. त्यांना ५०० ते ६५०० रूपये दर होता. सर्वसाधारण दर ४२५० रूपये राहिला. आवक वाढल्याने दर कमी झाल्याचे पाहायला मिळाले. केळीची आवक १४० क्विंटल झाली. तिला ५०० ते १०००, तर सर्वसाधारण दर ७५० रूपये मिळाला. पपईची आवक २० क्विंटल झाली. तिला ८०० ते २००० रूपये दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० रूपये राहिला. आंब्यांची आवक ३६० क्विंटल झाली. त्यास २५०० ते ५००० रूपये दर होता. सर्वसाधारण दर ४००० रूपये राहिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com