नाशिकमध्ये दोडका ३३३५ ते ४५८५ रुपये प्रतिक्विंटल

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवरी (ता.२) दोडक्याची आवक ५० क्विंटल झाली. त्यांना ३३३५ ते ४५८५ दर होता. सर्वसाधारण दर ३८३५ राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
 Dodka in Nashik at Rs. 3335 to 4585 per quintal
Dodka in Nashik at Rs. 3335 to 4585 per quintal

नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मंगळवरी (ता.२) दोडक्याची आवक ५० क्विंटल झाली. त्यांना ३३३५ ते ४५८५ दर होता. सर्वसाधारण दर ३८३५ राहिला, अशी माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली. 

बाजारात वांग्यांची २६० क्विंटल आवक झाली. त्यांना प्रतिक्विंटल २५०० ते ३५०० असा दर होता. त्यास सर्वसाधारण दर ३००० राहिला. फ्लॉवरची आवक ४०० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ५०० ते १११० दर होता. सर्वसाधारण दर ७२० राहिला. कोबीची आवक ७१० क्विंटल झाली. तिला सर्वसाधारण ३३५ ते १२५० असा दर होता. सर्वसाधारण दर ७५० राहिले. ढोबळ्या मिरचीची आवक २०० क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल २८१० ते ३७५० दर होता. सर्वसाधारण दर ३१२५ राहिला. 

भोपळ्याची आवक ३०० क्विंटल झाली. त्यांना ८३५ ते १८०० दर होता. सर्वसाधारण दर ११६५ राहिला. कारल्याची आवक २४५ क्विंटल झाली. त्यांना २५०० ते ३७५० दर होता. सर्वसाधारण दर ३१२५ राहिला. गिलक्याची आवक ३५ क्विंटल झाली. त्यांना १६७० ते २५०५ दर होता. सर्वसाधारण दर २०८५ राहिला. काकडीची आवक ६०० क्विंटल झाली. तिला १५०० ते २५०० दर होता. सर्वसाधारण दर २१२५ राहिला. 

कांद्याची आवक २६५१ क्विंटल झाली. त्यास ३५० ते ८५० दर होता. सर्वसाधारण दर ६०० रूपये राहिला. बटाट्याची आवक ९२० क्विंटल झाली. त्यांना १२०० ते २१०० दर होता. सर्वसाधारण दर १७०० राहिला. लसणाची आवक ८८ क्विंटल झाली. त्यास दर ३००० ते ११००० होता. सर्वसाधारण दर ८०० रूपये राहिला.  केळीला ५०० ते ११०० रूपये दर 

फळांमध्ये डाळिंबांची आवक २७८ क्विंटल झाली. त्यांना ५०० ते ७००० दर होता. सर्वसाधारण दर ५००० राहिला.  खरबुजाची आवक ६० क्विंटल झाली. त्यास ५०० ते ९०० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० राहिला. मोसंबीची आवक ३० क्विंटल झाली. त्यास ७०० ते २००० दर मिळाला. सर्वसाधारण दर १५०० राहिला. केळीची आवक १२० क्विंटल झाली. तिला ५०० ते ११०० रूपये दर होता. सर्वसाधारण दर ७५० राहिला. टरबुजांना ५०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७०० राहिला. हापूस आंब्याची आवक ७४८ क्विंटल झाली. त्यास ७००० ते १०००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ८५०० राहिला. ओल्या नारळाची आवक १३५ क्विंटल झाली. त्यास २३०० ते ३४०० दर मिळाला. सर्वसाधारण दर २७०० राहिला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com