‘कोरोना’च्या उपाययोजनांमध्ये हलगर्जीपणा नको ः छगन भुजबळ

does not want to be harassed in 'Corona' measures : Chaggan Bhujbal
does not want to be harassed in 'Corona' measures : Chaggan Bhujbal

नाशिक : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांमध्ये कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, अशा इशारा सर्व संबंधितांना दिल्याची माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

कोरोनाच्या वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाकडून कोरोना विषाणू संसर्ग व साथरोग नियंत्रण उपाययोजनांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (ता. १९) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 

या वेळी विभागीय आयुक्त राजाराम माने, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, विशेष पोलिस महानिरीक्षक पोलिस छेरिंग दोरजे, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलिस अधीक्षक डॉ. आरती सिंग, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, उपायुक्त रघुनाथ गावडे उपस्थित होते.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व यंत्रणांचे काम प्रशंसनीय असल्याच्याबाबत श्री. भुजबळ यांनी समाधान व्यक्त केले. 

या वेळी श्री. भुजबळ यांनी सांगितले की, जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची टोल नाका व बस स्थानकावर स्क्रींनिगची व्यवस्था करण्यात येणार आहे. कोरोनाच्या उपाययोजनांबाबत कुठल्याही प्रकारच्या निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. व्हॅटिंलेटर व मॉनिटर खरेदीसाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. मास्क व हॅण्ड सॅनिटायझरचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करण्यात आला आहे. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार व साठेबाजार केल्यास कारवाई करण्यात येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com