सांगली जिल्हा बँकेत महाविकास आघाडीचे वर्चस्व

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाआघाडीच्या पॅनेलने बाजी मारली. १८ जागांच्या लढतीत १४ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले. तर भाजपने चार जागा राखत ताकद दाखवून दिली.
Dominance of Mahavikas Aghadi in Sangli District Bank
Dominance of Mahavikas Aghadi in Sangli District Bank

सांगली : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे महाआघाडीच्या पॅनेलने बाजी मारली. १८ जागांच्या लढतीत १४ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले. तर भाजपने चार जागा राखत ताकद दाखवून दिली. यापूर्वी तीन जागा बिनविरोध झाल्यामुळे अंतिम बलाबल महाआघाडी १७ व भाजप ४ असे झाले आहे. महाआघाडीने गड राखला, तरी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत यांचा पराभव धक्कादायक ठरला. जतमध्ये ‘करेक्ट कार्यक्रम’ झाल्याचे सिद्ध झाले आहे. आटपाडीत भाजपचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचाही चुरशीच्या लढतीत पराभव झाला.

जिल्हा बँकेच्या २१ जागांपैकी तीन जागांवर शिवसेनेचे आमदार अनिल बाबर, राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, कॉंग्रेसचे महेंद्र लाड हे बिनविरोध झाल्यामुळे १८ जागांसाठी लढत लागली. महाआघाडीचे सहकार विकास पॅनेल विरुद्ध भाजपचे शेतकरी विकास पॅनेल यांच्यात थेट लढत झाली. सहकारचे १८ तर शेतकरी पॅनेलचे १६ उमेदवार आणि अपक्ष १२ उमेदवार रिंगणात होते. रविवारी (ता.२१) मतदान होऊन ८५ टक्के मतदानाची नोंद झाली.

महाआघाडीचे उमेदवार तथा कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी भाजपच्या उमेश पाटील यांचा ५२-१६ मतांनी पराभव केला. राष्ट्रवादीचे दुसऱ्या फळीतील नेते प्रकाश जमदाडे यांनी भाजपच्या पॅनेलमधून मिळवलेली उमेदवारी सार्थ ठरवली. त्यांनी आमदार सावंत यांचा ४५-४० असा पराभव केला.

आटपाडीत तानाजी पाटील यांनी राजेंद्र देशमुख यांचा ४०-२९ असा पराभव केला. कवठेमहांकाळमध्ये महाआघाडीतील माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी विठ्ठल पाटील यांचा ५४-१४ असा एकतर्फी पराभव केला. तासगावमध्ये तिरंगी लढतीत महाआघाडीच्या बाळासो पाटील यांनी भाजपच्या सुनील जाधव यांचा ४१-२३ असा पराभव केला. 

वाळव्यातून दिलीप पाटील यांनी भाजपचे भानुदास मोटे यांचा १०८-२३ असा, कडेगावमधून मोहनराव कदम यांनी भाजपच्या तुकाराम शिंदे यांचा ५३-११ असा पराभव केला.

महिला राखीव गटात कॉंग्रेसच्या जयश्री पाटील यांनी सर्वाधिक १६८६ मते मिळवली. या गटात त्यांच्याबरोबर महाआघाडीच्या अनिता सगरे या १४०८ मते मिळवून विजयी झाल्या. अनुसूचित जाती गटात विद्यमान संचालक बाळासो होनमोरे यांनी भाजपचे रमेश साबळे यांचा एकतर्फी पराभव केला. ओबीसी गटात महाआघाडीतील मन्सूर खतीब यांनी तम्मनगौडा रवी यांचा पराभव केला. विमुक्त जातीमध्ये ॲड. राजेंद्र ऊर्फ चिमण डांगे यांनीही भाजपच्या परशुराम नागरगोजे यांचा पराभव केला. 

दिवंगत आर.आर. आबांचे बंधू विद्यमान संचालक सुरेश पाटील यांनी प्रक्रिया संस्था गटात विद्यमान संचालक भाजपचे सी.बी. पाटील यांना पराभवाचा धक्का दिला. पतसंस्था व बँका गटात महाआघाडीचे पृथ्वीराज पाटील व भाजपचे राहुल महाडीक निवडून आले. तर महाआआघाडीचे किरण लाड व भाजपचे अजित चव्हाण यांना पराभव पत्करावा लागला.

मजूर सोसायटी गटात विद्यमान उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख व सत्यजित देशमुख यांनी एकतर्फी विजय खेचून आणला. या गटात महाआघाडीच्या हणमंतराव देशमुख व सुनील ताटे यांचा पराभव झाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com