बाजार समित्या बंद ठेवू नका 

बाजार बंदचे आदेश देण्यात येऊ नयेत. याबाबतच्या सविस्तर सूचना शासनाकडून संबंधित स्थानिक प्रशासनाला देण्यात याव्यात, अशी मागणी पणन संचालक सतिश सोनी यांनी पणन विभागाच्या पणन सचिवांद्वारे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे केली आहे.
Don’t keep market committees closed
Don’t keep market committees closed

पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत राहावे यासाठी बाजार समित्या अत्यावश्‍यक सेवेत आहेत. मात्र असे असताना स्थानिक जिल्हाधिकारी, महानगरपालिका, पोलिस प्रशासन बाजार समित्या बंद ठेवण्याचे आदेश देतात. अशा प्रकारचे बाजार बंदचे आदेश देण्यात येऊ नयेत. याबाबतच्या सविस्तर सूचना शासनाकडून संबंधित स्थानिक प्रशासनाला देण्यात याव्यात, अशी मागणी पणन संचालक सतिश सोनी यांनी पणन विभागाच्या पणन सचिवांद्वारे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाकडे केली आहे. 

पणन संचालक सोनी यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की कोरोनाच्या टाळेबंदी आदेशामध्ये बाजार समित्यांमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भात उपाययोजना करून कामकाज सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र बाजार समित्या शिस्त पाळत नसतील, तर स्थानिक प्रशासनाने शासनाची परवानगी घेऊन, बाजार समित्या बंदचे अधिकार स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. मात्र पणन संचालनालय आणि सर्व जिल्हा उपनिबंधकांद्वारे सर्व बाजार समित्यांसाठी कोरोना प्रादुर्भाव रोखण्याबाबतच्या मार्गदर्शन सूचना पाठविण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी बाजार समित्या करत असून, अनेक बाजार समित्यांनी आपल्या कामकाजांच्या वेळेत बदल देखील केले असून, बाजार आवार निर्जतुंकीकरण करणे, गर्दीवर नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि सुरक्षारक्षकांसोबत पोलिसांची मदत घेत आहेत. 

तसेच बाजार घटकांसाठी मुखपट्टी आणि जंतुनाशकांचा वापरावर भर देण्यात आला आहे. अशा परिस्थितीत बाजार समित्या बंद ठेवणे म्हणजे शेतीमालाचे आणि शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होणारे ठरेल. म्हणून बाजार समित्या अत्यावश्‍यक सेवेत असताना त्या बंद करण्याचे आदेश न देण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाला द्याव्यात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com