Agriculture news in marathi Donations up to one and a half lakh to GI tagging hapus : Sunil Pawar | Agrowon

जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत अनुदान : सुनील पवार

टीम अॅग्रोवन
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून तो वाढविण्यासाठी जीआय मानांकन महत्त्वाचे ठरू शकते. त्यासाठी जीआय नोंदणीपासून ते जीआय टॅगिंग झालेला हापूस विक्री करण्यासाठी किंवा निर्यातीसाठी पणन मंडळाकडून आठशे रुपयांपासून दीड लाखापर्यंत विविध योजनांद्वारे अनुदान देण्याची तयारी केली आहे’’, असे प्रतिपादन ‘पणन’चे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले.

रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून तो वाढविण्यासाठी जीआय मानांकन महत्त्वाचे ठरू शकते. त्यासाठी जीआय नोंदणीपासून ते जीआय टॅगिंग झालेला हापूस विक्री करण्यासाठी किंवा निर्यातीसाठी पणन मंडळाकडून आठशे रुपयांपासून दीड लाखापर्यंत विविध योजनांद्वारे अनुदान देण्याची तयारी केली आहे’’, असे प्रतिपादन ‘पणन’चे कार्यकारी संचालक सुनील पवार यांनी केले.

आंबा उत्पादक संघ आणि पणन मंडळाने आयोजित केलेल्या ‘हापूस आंबा भौगोलिक मानांकन उपयुक्तता कार्यपद्धती यावरील कार्यशाळेत पवार बोलत होते. डॉ. विवेक भिडे, दापोली उद्यानविद्या महाविद्यालयाचे संचालक डॉ. बी. आर. साळवी, अभिलाष गोऱ्हे, डॉ. संजय भावे, ‘पणन’चे उपसरव्यवस्थापक डॉ. भास्कर पाटील, मिलिंद जोशी, बाजार समिती सभापती संजय आयरे आदी उपस्थित होते. या वेळी जीआय मानांकन घेतलेल्या १५० आंबा बागायतदारांना प्रमाणपत्र देण्यात आले. 

पवार म्हणाले, ‘‘एका आंब्याच्या निर्यातीचा खर्च दोनशे रुपये आहे. ७५ टक्के सबसिडी मिळाली, तर तो खर्च पन्नास रुपयांपर्यंत येतो. खर्च कमी करण्यासाठी गतवर्षी जहाजामार्गे आंबा पाठविण्यात आला. त्याचा खर्च एका नगाला २५ ते २६ रुपये इतका आला. निर्यातवाढीसाठी नवनवीन प्रयोग पणनामार्फत सुरू आहेत. शासन निर्यात धोरण तयार करत आहे. त्यासाठी आंबा, काजूचे क्लस्टर तयार करण्याचा मानस आहे.’’

‘‘जीआय देणाऱ्या संस्थांना पणनकडून प्रत्येक कार्यशाळेमागे दहा हजार रुपये आयोजनासाठी दिले जाणार आहेत. जेणेकरून जीआयचा प्रचार व प्रसार करणे शक्य होईल. जीआयला कमी प्रतिसाद मिळत आहे. तो वाढविण्यासाठी नोंदणीसाठी लागणाऱ्या १५०० रुपयांपैकी ८०० रुपये पणन देईल. तर, 
उर्वरित रक्कम बागायतदार भरेल. जीआयप्रमाणे पॅकेजिंग, लेवलिंग, मार्केटिंगसाठी वेबसाइट करणाऱ्या संबंधित संस्थेला तीन लाख रुपये दिले जातील,’’ असेही पवार यांनी सांगितले. 
 


इतर ताज्या घडामोडी
डॉक्टरांनाही आता कोरोनाचे भयनवी दिल्ली : कोरोनाचे भय सर्वसामान्यांबरोबरच...
डॉक्टरांचे निवृत्तीचे वय अठावन्नच; ...औरंगाबाद : आरोग्य विभागाअंतर्गत येणारे...
थेट कलिंगड विक्रीतून नुकसान टाळण्याचा...सिंधुदुर्ग : सूक्ष्म नियोजनातून जिल्ह्यातील गडमठ...
सव्वा लाख ‘आयुष’ डॉक्टरांना प्रशिक्षण...मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षित...
सरपंचासह सदस्यांना विमामसंरक्षण द्यानगर ः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
पुणे जिल्ह्यातील शेतकरी गटांकडून १२४...पुणे ः नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला...
पुणे बाजार समितीत भाजीपाल्याची ९ हजार...पुणे ः ‘कोरोना’ लॉकडाऊनमध्ये बाजार समितीमधील...
नांदेड जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदी...नांदेड ः किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
कोरोनास्थितीचा गैरफायदा : पुणे...पुणे ः ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग वाढत असल्याने...
पोल्ट्री उत्पादकांना वीज दरात सवलत...पुणे : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कोंबड्यांबाबत...
भंडाऱ्यातील दूध प्रक्रिया उद्योग सुरू...भंडारा ः भंडारा जिल्हा हा दूध उत्पादक जिल्हा आहे...
‘भुदरगड नॅचरल फार्मर्स’कडून ममता बाल...कोल्हापूर : भुदरगड नॅचरल फार्मस कंपनीच्या...
दर घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादकांचे नुकसानपरभणी ः टोमॅटोच्या दरात गेल्या महिनाभरापासून मोठी...
‘कोरोना’च्या चाचणी, रोगनिदानासाठी...परभणी ः परभणी येथील पशुवैद्यक व पशुविज्ञान...
बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे गहू...बाळापूर, जि. अकोला : तालुक्यात शनिवारी (ता. ४)...
अनुकूल हवामानात होते पिकांची चांगली वाढमागील भागात आपण गहू, हरभरा, रब्बी ज्वारी, कापूस,...
काय करावं ? दर, विक्रीव्यवस्था नसल्याने...अंतापूर, जि. नाशिक : सटाणा तालुक्यातील अंतापूर,...
शेतमाल वाहतुकीसाठी नगर जिल्ह्यात दोन...नगर ः लाॅकडाऊनच्या काळात भाजीपाला, फळे विक्रीसाठी...
पिंपळगांवला मागणी कमी झाल्याने दूध...पिंपळगांव बसवंत, जि. नाशिक ः लॉकडाऊनसह...
पोलीस बंदोबस्तात `माळेगाव`चा पदभार...माळेगाव, जि. पुणे : साखर आयुक्तांच्या आदेशान्वये...