Agriculture news in marathi Don't bring time to hit the leaves | Agrowon

पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका : राजू शेट्टी

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 जानेवारी 2021

 कृषी कायदे रद्द केले नाही, तर सरकारला सळो की पळो करून सोडू. सरकारला पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

सांगली : केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करीत आहे. हा प्रयत्न आम्ही उलटून लावू. राजकीय पक्षांना गुलाम केले आहे. कायदे रद्द करण्यासाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली पाहिजे. वेळ प्रसंगी बळीराजाची फौज घेऊन दिल्लीवर चाल करू. कृषी कायदे रद्द केले नाही, तर सरकारला सळो की पळो करून सोडू. सरकारला पत्र्या ठोकण्याची वेळ आणू नका, अशा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली.

 कृषी कायदे रद्द करावेत, वीजबिल माफ करा, यासाठी सोमवारी (ता. २५) येथील विश्रामबाग चौकातील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला हार घालून मोर्चा सुरू झाला. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मोर्चा सांगलीहून जयसिंगपूर, हातकणंगले या मार्गे कोल्हापूर येथील दसरा चौकात जाणार आहे. या मार्गे जाताना दोन्ही जिल्ह्यातील शेतकरी या मोर्चात सहभागी होणार आहे. सांगली जिल्ह्यातील सुमारे २८ हून अधिक ट्रॅक्टर मोर्चामध्ये सामील झाले आहेत.

 या वेळी माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, ‘‘दिल्लीत कृषी कायद्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी (ता. २६) शेतकरी ट्रॅक्टर परेड करणार आहेत. आम्हालाही दिल्लीला जायचे होते, पण रेल्वेचा मार्ग बंद केला आहे. त्याचप्रमाणे दक्षिणेकडील शेतकरी येऊ नयेत, यासाठी वाहने रोखून ठेवली आहेत. त्यामुळे आम्ही इथे ट्रॅक्टर मोर्चा काढला आहे. केंद्र सरकार कृषी कायदे शेतकऱ्यांवर लादू लागले आहे.

कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी मूठभर असल्याचे सरकार भासवीत आहे. राजकीय पक्षांना गुलाम केले आहे. हे कायदे रद्द करण्यासाठी शेतकरी आक्रमक भूमिका घेत आहेत. पूर्ण देशभरातील शेतकरी या कायद्यांना विरोध करीत आहेत. केंद्र सरकार बाजारपेठा उद्ध्वस्त करण्याचे काम करीत आहेत.’’

 गोऱ्या इंग्रजांप्रमाणे केंद्र सरकार वागू लागले आहे. आमच्याकडून कवडीमोलाने शेतीमाल खरेदी करून चौपट पटीने त्याची विक्री करणार आहे. शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, अन्यथा बळीराजाची फौज घेऊन दिल्लीवर चाल करून हे कायदे रद्द करण्यास केंद्र सरकारला भाग पाडू, असा इशाराही माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.


इतर ताज्या घडामोडी
पांडुरंग साखर कारखाना उताऱ्यात...सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याने २५ लाख ७७...
अकोला झेडपीच्या कृषी विभागाचे दहा...अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागाला आगामी आर्थिक...
नाशिक जिल्ह्यात अवकाळीचा दोन हजार...नाशिक : जिल्ह्यात अवकाळी व गारपिटीमुळे झालेल्या...
कपाशीचा उत्पादन खर्च कमी करण्याची गरज ः...नांदेड ः ‘‘जगाच्या तुलनेत आपल्या देशात कपाशीची...
खानदेशातील तुरीच्या आवकेत ४० टक्के घटजळगाव ः खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
कीटकनाशक फवारणीला अनुदान द्या : आंबा...मुंबई : कोकण किनारपट्टीच्या भागात १८ व १९...
पारनेर : महावितरणच्या विरोधात शेतकरी...निघोज, ता. पारनेर : विहिरीत पाणी असूनही पिकांना...
खानदेशात ऊसगाळप राहणार मार्चअखेरपर्यंत...जळगाव ः  खानदेशात सुमारे १६ लाख टन ऊस गाळप...
कोल्हापुरात आग्या मधमाशा जतन,...कोल्हापूर : आग्या मधमाशा जतन आणि संवर्धनासाठी...
शेतकऱ्यांना अडचणीत आणू नका ः डॉ. पवारनाशिक : ‘‘वीज महावितरणच्या मनमानी...
संभाव्य निर्बंध, लॉकडाउनमुळे द्राक्ष...नाशिक : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात...
सिंधुदुर्गमध्ये होणार ड्रोनद्वारे होणार...सिंधुदुर्गनगरी : शासनाच्या स्वामित्व योजनेतर्गत...
मराठीला अभिजात दर्जा मिळविणारच :...मुंबई : ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या या भाषेला,...
खामसवाडीत नुकसानग्रस्त पिकांची होणार...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : परिसरात १९ फेबुवारी...
किमान २५ टक्के शेतीमालावर प्रक्रिया...जालना : ‘‘उत्पादित केलेल्या किमान २५ टक्के...
नगर जिल्ह्यात पाच हजारांवर शेतकऱ्यांना...नगर ः जिल्ह्यातील २०१९ - २० चा खरीप व रब्बी हंगाम...
सोसायट्यांच्या वसुलीपूर्वी प्रोत्साहन...सातारा : आता मार्च महिन्यात सोसायट्यांची...
केळीसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनएकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनामुळे पिकास...
सकाळी थंड, तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब...
अकोला : अवकाळी, गारपीटग्रस्तांना १७...अकोला ः गेल्या वर्षात जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे...