चहावाल्याच्या नादी लागू नका : मुख्यमंत्री

चहावाल्याच्या नादी लागू नका - मुख्यमंत्री
चहावाल्याच्या नादी लागू नका - मुख्यमंत्री

मुंबई - ""पवार साहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका. नाही तर पुन्हा एकदा आपली धूळधाण होईल,'' अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.७) केली.  भारतीय जनता पक्षाच्या स्थापनादिनानिमित्त येथे महामेळाव्याचे आयोजन केले होते. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांना वंदन करून फडणवीस यांनी भाषणास सुरवात केली. बाळासाहेब ठाकरे यांचाही त्यांनी उल्लेख केला. 

मुख्यमंत्री कार्यालयात होणाऱ्या चहापानाच्या खर्चावरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला लक्ष्य केले होते. त्याला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, ""आम्ही चहा पीत असल्याने आमच्याकडे येणाऱ्या लोकांनाही आम्ही चहाच पाजतो. पवार साहेबांचे कार्यकर्ते जे पितात, ते आम्ही जनतेला पाजू शकणार नाही. पवार साहेब, चहावाल्याच्या नादी लागू नका. गेल्या निवडणुकीत उडालेली धूळधाण लक्षात ठेवा.'' 

राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेचाही त्यांनी समाचार घेतला. ते म्हणाले, ""राज्याच्या तिजोरीवर डल्ला मारणारे आता हल्लाबोल यात्रा काढत आहेत. एकमेकांविरोधात लढलेले अनेक जण सध्या आता एकत्र येत आहेत. शिकार दिसल्यावर लांडगे एकत्र येतात. त्या प्रमाणे आता सत्ता दिसल्यावर लांडगे एकत्र येऊ लागले आहेत. आमचा पक्ष हा सिंहांचा आहे. आम्ही लांडग्यांना घाबरत नाही.'' 

मुख्यमंत्री वर्गातील मॉनिटरसारखे आहेत, अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. त्यावर फडणवीस म्हणाले, ""मी भरलेल्या वर्गाचा मॉनिटर आहे. आधे इधर जाओ, आधे उधर जाओ, अशी माझी स्थिती नाही.'' 

लांडग्यांना सत्ता देणार नाही  ""सत्तेसाठी एकत्र आलेले लांडगे भविष्यात दंगली घडवतील. सत्तेकरिता बुद्धिभेद करतील. माणसामाणसांत लढाई लावतील. समाजात तेढ निर्माण करतील. काहीही झाले तरी या लांडग्यांना सत्तेत येऊ देणार नाही. भाजपची सामाजिक न्यायाची भूमिका पक्की आहे. संविधानात बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण कोणीच हिरावणार नाही.'' असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com