कागल तालुक्‍यासाठी घरपडझडीच्या अनुदानवाटपास मिळेना मुहूर्त

अतिवृष्टी आणि महापुराने शेतकरी मोडकळीस आला आहे. घरांची पडझड होऊन शेतकरी उघड्यावर पडलेला असताना शासनाकडून मिळणाऱ्या तुटपुंज्या मदतीचीही वाट पाहावी लागणे शरमेची आणि दुर्दैवी बाब आहे. घरांच्या पडझडीची मदत तत्काळ लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग व्हावी.’’ - नितीन पाटील, ग्रामपंचायत सदस्य, म्हाकवे, ता. कागल अतिवृष्टी व महापुरामुळे पडझड झालेल्या घरांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. काही पात्र लाभार्थ्यांना अनुदानवाटप केले आहे. उर्वरित लाभार्थ्यांसाठी ४ कोटी ३४ लाख २३ हजार ८०० रुपयांच्या निधीचे बिल कोशागारात मंजूर झाले आहे. तरीही, अद्याप ५ लाख रुपये अनुदानाची आवश्‍यकता आहे.’’ - शिल्पा ठोकडे, तहसीलदार, कागल
Don't get share of the homeowner's aid distribution in Kagal taluka
Don't get share of the homeowner's aid distribution in Kagal taluka

म्हाकवे, जि. कोल्हापूर : ऑगस्टमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे अनेक शेतकऱ्यांच्या घरांची पडझड झाली. यामध्ये कागल तालुक्‍यातील ३ हजार ७७० शेतकऱ्यांच्या घरांचे नुकसान झाले. त्यांच्यासाठी शासनाकडून ४ कोटी ३४ लाख २३ हजार ८०० रुपयांचा निधी उपलब्ध झाला. परंतु, प्रशासनाने घरपडझड झालेल्या लाभार्थ्यांना अद्यापही अनुदान दिले नाही. त्यासाठी कधी मुहूर्त मिळणार असा प्रश्‍न आहे.

कागल तालुक्‍यातील अतिवृष्टीने पडझड झालेल्या घरांसाठी पहिल्या टप्प्यात चार लाख रुपयांचा निधी प्रशासनास मिळाला. या निधीतून ६७ लाभार्थ्यांना ३ लाख ९७ हजार २८७ रुपये निधीचे वाटप करण्यात आले. उर्वरित निधी २ हजार ७१३ रुपयांचा निधी शिल्लक आहे.

दुसऱ्या टप्प्यात ३७०३ लाभार्थ्यांसाठी ४ कोटी ३४ लाख २३ हजार ८०० रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. तरीही प्रशासनास ५ लाख रुपयांच्या निधीची आवश्‍यकता आहे. निधी उपलब्ध असतानाही पडझड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अद्यापही एक रुपया जमा झालेला नाही.

महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. शेतकरी उद्‌ध्वस्त झाला असताना शासनाकडून मिळणारी तुटपुंजी आर्थिक मदत ही वेळेवर मिळत नाही. शेती तसेच घराची पडझड झालेल्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यासाठी शासकीय पातळीवर बॅंकनिहाय याद्या तयार करण्याचे काम सुरू आहे.

याद्यांची पुन्हा तपासणी करून विशेष पथकाद्वारे देखील ऑडिट करण्यात येत असल्याने ही प्रक्रिया वेळखाऊ होत आहे. त्यामुळे सर्व प्रकारचे ऑडीट झाल्यानंतरच लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्यात येणार असल्याने निधी उपलब्ध होऊनही शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com