Agriculture news in Marathi Don't go for tours, panchnamas, help the victims immediately | Agrowon

दौरे, पंचनाम्यांचा फार्स नको, बाधितांना तत्काळ मदत करा : महाराष्ट्र राज्य किसान सभा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021

खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे दौरे, पंचनामे याचा फार्स न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेने केली आहे.

नगर : अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भासह राज्यातील १२ लाख हेक्‍टरवरील खरीप पिके नष्ट झाली आहेत. मराठवाडा व विदर्भातील ओढे, नदी-नाल्यांना पूर आल्याने काठालगतची शेती संपूर्णपणे वाहून गेली आहे. खरीप हंगामातील हातातोंडाशी आलेले सोयाबीन, कापूस व इतर पिके संपूर्णपणे नष्ट झाली आहेत. त्यामुळे दौरे, पंचनामे याचा फार्स न करता शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य किसान सभेने केली आहे.

गुलाब चक्रीवादळ महाराष्ट्रातून गुजरात राज्यात पोहोचले असले तरी अरबी समुद्रात चक्रीवादळाची निर्मिती नव्याने होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. अरबी समुद्रात जोरदार वाऱ्यासह उंच लाटा उठण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. झालेले नुकसान व हवामान खात्याने वर्तवलेले आगामी संकटाचे अंदाज पाहता राज्य व केंद्र सरकारने शेतकरी व आपद्‍ग्रस्तांना तातडीने साह्य करण्याची व आगामी संकटापासून बचावासाठी सावध करण्याची नितांत आवश्यकता आहे. आपत्तीच्या अशा भीषण कालावधीमध्ये राजकीय पाहणीचे दौरे व पंचनामे यांचा फार्स न करता राजकारण बाजूला ठेवत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करावी, असे आव्हान किसान सभा करत आहे. केंद्र व राज्य सरकारने मिळून तातडीची प्राथमिक मदत म्हणून प्रतिहेक्टर ५०००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत व त्यानंतर पीक व शेतजमीन नुकसानीचा योग्य अंदाज घेत शेतकऱ्यांचे उर्वरित संपूर्ण नुकसान भरून निघणारी ठोस मदत करावी.

पीकविमा योजनेअंतर्गत आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत आपत्तीची सूचना देणे बंधनकारक आहे. कृषी व महसूल विभागाने शेतकऱ्यांना सर्व ते सहकार्य करावे. विमा कंपन्यांनी आपली कार्यालये व हेल्पलाइन २४ तास सुरू राहतील, अशी व्यवस्था करावी. रेंज अभावी शेतकऱ्यांना आपत्तीची ऑनलाइन सूचना देण्यात अडथळे येत असल्याने ऑफलाइन सूचना स्वीकारण्याची सुद्धा संपूर्ण व्यवस्था महसूल विभाग, कृषी विभाग व पीकविमा कंपन्यांनी करावी, अशी मागणी नेते डॉ. अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी केली आहे.


इतर अॅग्रो विशेष
किमान तापमानात घट होण्याची शक्यतापुणे : राज्यात पावसाने उघडिप दिल्यानंतर किमान...
‘महाडीबीटी’च्या कामात अडथळाअकोला ः कृषी खात्याच्या विविध योजनांचा लाभ...
कृषी निविष्ठा केंद्रांचे परवाने आता...पुणे ः राज्यातील कृषी सेवा केंद्रांना परवान्याची...
आयातीमुळे कडधान्य दर दबावातपुणे ः तुरीचा हंगाम पुढील काही दिवसांत सुरू होईल...
...तर द्राक्षाचे नुकसान टळले असतेनाशिक : गेल्या तीन वर्षांपासून कसमादे भागातील...
साहित्य संमेलनाचे अनुदान शेतकरी,...नाशिक : वामनदादा कर्डक जन्मशताब्दी साहित्यनगरी...
देशी वाणाने सकस उत्पादन ः राहीबाई पोपेरेसांगली : पारंपरिक बियाणाला रासायनिक खताच्या...
शिवरायांच्या स्वराज्यापासून महात्मा...कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी...
मराठवाड्यात आंब्यावर संकटाचे ढगऔरंगाबाद : यंदा आंब्यावर संकटाचे ढग कायम आहेत....
पुन्हा उभा राहिलो अन् यशस्वीही झालो...दुग्ध व्यवसायात भरभराट येत असतानाच कुट्टी यंत्र...
पीकबदल, फळबागांसह पूरक उद्योगांची साथऔरंगाबाद जिल्ह्यातील जडगाव येथील भोसले कुटुंबाने...
डेअरी उद्योगातील खरेदीदराचा गोंधळ कायमपुणे ः राज्यातील दुधाच्या बाजारपेठेत विक्रीविषयक...
ऊस उत्पादकांचे अद्याप ४,४४५ कोटी थकीतकोल्हापूर : गेल्या हंगामात उत्तर प्रदेशातील साखर...
कोरड्या हवामानाचा अंदाज, गारठाही वाढणारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिली असून, आकाश...
लातूर जिल्ह्यात द्राक्ष बागांना पावसाचा...लातूर ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून...
पाकिस्तानमध्ये कापसाचे दर टिकूनपुणे ः पाकिस्तानमध्ये यंदा कापूस उत्पादनात वाढ...
‘पशुसंवर्धन’च्या योजनांसाठी अर्ज...पुणे ः जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सुशिक्षित व...
मनाच्या वेदना दूर करण्यासाठी संघर्ष ः...कुंडल, जि. सांगली : माणसाच्या अंगाला, कपड्याला...
शेती हा आर्थिक प्रश्‍न ः विलास शिंदेनाशिक : शेतीविषयी चर्चा राजकीय व सामाजिक अंगाने न...
उसाच्या पहिल्या पेमेंटकडे लागले लक्षपुणे ः राज्यातील साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांकडून...