agriculture news in marathi Dont ignore PPR disease in goats and sheep | Agrowon

शेळ्या-मेंढ्यांतील पीपीआर आजाराकडे दुर्लक्ष नको

डॉ. मीरा साखरे
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

पीपीआर हा शेळ्या-मेंढ्यांतील अतिसंसर्गजन्य आजार आहे. या आजारात ताप येणे, सर्दी, खोकला, पातळ संडास लागणे, श्‍वास घेण्यासाठी त्रास होणे ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निरोगी शेळ्या-मेंढ्यांत लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे.

पीपीआर हा शेळ्या-मेंढ्यांतील अतिसंसर्गजन्य आजार आहे. या आजारात ताप येणे, सर्दी, खोकला, पातळ संडास लागणे, श्‍वास घेण्यासाठी त्रास होणे ही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निरोगी शेळ्या-मेंढ्यांत लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे.

शेळ्या-मेंढ्यांमध्ये प्रामुख्याने पीपीआर, आंत्रविषार, तोंडखुरी, देवी, मावा हे संसर्गजन्य आजार होतात. पीपीआर आजार जगात सर्वप्रथम पश्‍चिम आफ्रिकेमध्ये सन १९४२ मध्ये तर भारतात सन १९७७ मध्ये तामिळनाडू राज्यात आढळला. पीपीआर आजार मॉरबिली विषाणूमुळे होतो. प्रादुर्भाव झालेल्या शेळी-मेंढीच्या नाकातील-डोळ्यातील स्राव, शेणाद्वारे, दूषित चारा-पाणी याद्वारे पीपीआरचे विषाणू मोठ्या संख्येने रोगाचा प्रसार करतात. वातावरणातील झालेला अचानक बदल, पिल्लांना जन्म दिल्यानंतर येणारा शरीरावरील ताण, तसेच विक्रीसाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे वाहतूक झाल्यावर, जनावरांच्या बाजारात प्रादुर्भाव झालेल्या शेळ्या-मेंढ्यांच्या संपर्कात आल्यानंतर आणि जर जनावरांना पूर्वीच एखादा आजार (तोंडखुरी, देवी, मावा इ.) होऊन गेल्यावर पीपीआर आजाराचा प्रसार लवकर होऊ शकतो. पीपीआर आजार मेंढ्यापेक्षा शेळ्यांमध्ये आणि पाच ते आठ महिने वयोगटांच्या करडांमध्ये जास्त प्रमाणात होतो.

लक्षणे

 • अचानक भरपूर ताप येणे.
 • सतत शिंका येणे, नाकातून पाण्यासारखा स्राव येणे.
 • डोळे लाल होऊन डोळ्यातून घाण येणे.
 • तोंडातून लाळ येणे.
 • श्‍वास घेण्यास त्रास होणे.
 • जिभेवर, हिरड्यावर फोड किंवा चट्टे येतात. नंतर व्रण येऊन तोंडाचा दुर्गध येतो.
 • पातळ संडास लागते.
 • आजार वाढल्यास नाकातील स्राव चिकट, पिवळसर, घट्ट येतो.
 • डोळ्यातील घाण स्रावामुळे पापण्या बंद होतात.
 • चारा - पाणी खाणे कमी किंवा पूर्णपणे बंद होणे.
 • रवंथ करणे बंद होणे आणि अशक्तपणा येतो.
 • अंगावरील केस, लोकर निस्तेज होऊन नष्ट होते.
 • गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होऊ शकतो.
 • शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे मृत्यू होऊ शकतो.
 • वरील लक्षणे दाखविल्यानंतर पाच ते सात दिवसांत बाधित शेळ्यांचा मृत्यू होऊ शकतो.

औषधोपचार

 • पीपीआर अतिसंसर्ग आजार असल्यामुळे कळपातील इतर शेळ्या-मेंढ्यांमध्ये झपाट्याने प्रसार होतो.
   
 • अतितीव्र स्वरुपाची लक्षणे दाखवणारी जनावरे मरतात. हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे प्रभावी औषधोपचार नाही, पण लक्षणाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि जिवाणूंचे दुय्यम संक्रमण टाळण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैवके, वेदनाशामक इंजेक्‍शन तीन ते पाच दिवसांसाठी द्यावीत.
   
 • तोंडातील जखमा खाण्याच्या सोड्याच्या २ टक्के द्रावणाने किंवा १ टक्के पोटॅशियम परमॅग्नेटच्या द्रावणाने स्वच्छ धुवावी. आणि बोरोग्लिसरिन लावावे.

प्रतिबंधात्मक उपाययोजना

 • पीपीआर अतिसंसर्गजन्य विषाणूजन्य आजार असून, एकदा लागण झाल्यावर जवळपास ९० टक्क्यांपर्यंत मरतूक होऊ शकते. मरतूक ही लहान करडांत जास्त प्रमाणात होत असते.
   
 • आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी निरोगी शेळ्या-मेंढ्यांत लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. वयाची तीन महिने व त्यावरील वयाच्या सर्व निरोगी करडांना लसीकरण करावे.
   
 • पीपीआरची लस जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात घ्यावी. लसीकरणाच्या आठ दिवस अगोदर जंतनाशकाची मात्रा द्यावी. त्यामुळे शरीरातील आंतरपरजिवीचे निर्मूलन होऊन लसीकरण प्रभावी होते.
   
 • लसीकरण शक्‍यतो कळपातील सर्व शेळ्या-मेंढ्यांना एकदाच करावे.
   
 • प्रादुर्भाव झालेल्या भागापासून कळप दूर ठेवावा.
   
 • गोठा किंवा कळपाभोवती पाणी साठू देऊ नये. गोठा किंवा बांधण्याची जागा कोरडी ठेवावी.
   
 • गोठ्याभोवती चुना शिंपडावा किंवा पसरवावा, यामुळे लाळेतून, नाका-तोंडाच्या स्रावातून, शेणातून जमिनीवर पडणाऱ्या विषाणूचा प्रसार मंदावतो.
   
 • खाद्यातून ब जीवनसत्त्व, खनिज मिश्रणांचा पुरवठा करावा.
   
 • पीपीआर आजाराने दगावलेली शेळी-मेंढी उघड्यावर न टाकता खोल खड्डा करून पुरावी आणि त्यावर चुना टाकावा आणि मगच माती टाकून खड्डा बंद करावा.

संपर्कः डॉ. मीरा साखरे, ९४२३७५९४९०
(पशुवैद्यकीय रोगप्रतिबंधात्मक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)


इतर कृषिपूरक
असे करा जनावरांतील पोटफुगीला प्रतिबंधसर्वच मोसमामध्ये चांगल्या प्रतीचा चारा मिळेल अशी...
व्यवस्थापनाला मार्केटिंगची जोड देत...पॅालिहाउसमधील फूलशेतीसाठी एकेकाळी प्रसिद्ध असलेले...
आरोग्यदायी शेळीचे दूधशेळीच्या दुधाचे नियमित सेवन केल्याने आतड्यांवरील...
बहुगुणी कडुनिंबविविध प्रकारचे त्वचारोग जसे की, त्वचेवर खाज, पुरळ...
..अशी ओळखा दुधातील भेसळवाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांची काळजीसध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
मत्स्यपालन : तंत्र बायोफ्लॉक उत्पादनाचे...फ्लॉकची इष्टतम पातळी ही संवर्धनयोग्य माश्यांच्या...
थंडीमध्ये जपा जनावरांचे आरोग्य वातावरणातील अनपेक्षित बदल जनावरांच्या आरोग्यास...
मत्स्यशेतीमध्ये बायोफ्लाक तंत्रज्ञानाचे...टायगर कोळंबी, सफेद कोळंबी आणि व्हनामी कोळंबी...
संगोपनगृहातील रेशीम कीटकांचे थंडीपासून...सध्या थंडीमध्ये वाढ होत असून, विविध अवस्थेतील...
कोंबड्यांच्या योग्य व्यवस्थापनाकडे द्या... कुक्कुटपालन प्रक्षेत्राची जागा उंचावर असावी....
मत्स्यशेतीमधील बायोफ्लाक तंत्रज्ञानजैवपूंज (बायोफ्लाक) तंत्रज्ञानामध्ये जास्तीत...
जनावरांच्या आहारात करा योग्य वेळी बदलजनावरांच्या आहारात अचानक बदल केल्यामुळे पोटफुगी,...
शेळ्या-मेंढ्यांतील पीपीआर आजाराकडे...पीपीआर हा शेळ्या-मेंढ्यांतील अतिसंसर्गजन्य आजार...
जातीवंत मेंढ्याची निवड महत्त्वाचीमेंढीपासून मिळणाऱ्या मांस, दूध, लोकर आणि लेंडीखत...
लसीकरणाबाबत जागरूक राहा...आजारी जनावरे रोगवाहक म्हणूनही काम करू शकतात,...
जनावरांतील लसीकरणाचे महत्त्वजनावरांना आजार झाल्यास, अपुऱ्या पशुवैद्यकीय...
बैलातील आतडे बंद होण्याची समस्याउन्हाळ्यात तसेच इतर शेतीकामाच्या दिवसात जनावरांना...
पीक अवशेषातून अन्नद्रव्यांची उपलब्धता पीक अवशेषांमध्ये नत्राचे १.२५ ते ०.४० टक्के,...
लाळ्या-खुरकुत रोगावर प्रतिबंधात्मक...‘लाळ्या-खुरकुत’ हा रोग विषाणूजन्य असल्याने यावर...