कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांना सोनियांचे आदेश

काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लावावेत, यासाठी वेगळे पर्यायी कायदे तयार केले जावेत, राज्यघटनेतील कलम २५४ (२) चा आधार घेत तशी शक्यता पडताळून पाहण्यात यावी, या आधारे राज्ये केंद्राच्या कायद्याविरोधात पर्यायी कायदे तयार करू शकतात: सोनिया गांधी
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांना सोनियांचे आदेश
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांना सोनियांचे आदेश

नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी केंद्राचे वादग्रस्त कृषी सुधारणा कायदे झुगारून लावावेत, यासाठी वेगळे पर्यायी कायदे तयार केले जावेत, राज्यघटनेतील कलम २५४ (२) चा आधार घेत तशी शक्यता पडताळून पाहण्यात यावी, या आधारे राज्ये केंद्राच्या कायद्याविरोधात पर्यायी कायदे तयार करू शकतात, असे आदेश काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले आहेत. काँग्रेस हायकमांडच्या ताज्या आदेशांमुळे आता केंद्र विरुद्ध काँग्रेसशासित राज्ये असा संघर्ष भडकण्याची शक्यता आहे. सोनिया गांधींच्या आदेशानंतर पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांसह पुद्दुचेरीमध्ये कृषी कायद्यांची अंमलबजावणी संकटात सापडणार आहे. महाराष्ट्रातही या कायद्यांना विरोध होतो आहे. संसदेने मंजूर केलेल्या कृषी सुधारणा विधेयकांचे आता राष्ट्रपतींच्या औपचारिक संमतीनंतर कायद्यात रूपांतर झाले आहे. मात्र, या कायद्यांच्या विरोधात शेतकरी आणि विरोधी पक्ष आक्रमकपणे रस्त्यावर उतरले आहेत. शिवाय, सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्येही (एनडीए) याच मुद्यांवरून फाटाफूट झाली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे सध्या परदेशात असलेल्या सोनिया गांधींनी काँग्रेसशासित राज्यांना केंद्राचे कायदे झुगारण्याचे केलेली सूचना महत्त्वाची आहे. या मुद्द्यावर माजी केंद्रीय मंत्री व जयराम रमेश यांनी आज सकाळीच ट्विट करून, २५४ (२) कलमाचा वापर करून राज्यांनी २०१३ मध्ये भूसंपादन कायद्यातील तरतुदी झुगारल्याचा दाखला दिला होता. तसेच या कलमाचा वापर ताज्या कृषी सुधारणा कायद्यांबाबतही राज्यांना करता येईल, असे सुचविले होते.  वेणुगोपाल यांचे निर्देश काँग्रेसचे संघटना सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी काँग्रेसशासित राज्यांना पक्षाध्यक्षांच्या आदेशवजा सल्ल्याबाबत माहिती देताना केंद्राचे कृषीविरोधी कायदे झुगारण्यासाठी राज्य घटनेच्या २५४ (२) या कलमाचा वापर करण्यास सांगितले आहे. याद्वारे राज्यांना केंद्राच्या कृषीविरोधी कायद्यातील तरतुदी अमान्य करता येतील, असेही वेणुगोपाल यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com