पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ देऊ नका ः तुपकर

खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ आली तरी अद्यापही बॅंकेने पीककर्जाचे वाटप केले नाही. शेतकऱ्यांची पीककर्जाची प्रकरणे मोठ्या संख्येने प्रलंबित आहे. सदर प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावून पीककर्ज वाटप करा, अन्यथा पीककर्जाची प्रकरणे निकाली निघेपर्यंत बॅंकेतून हटणार नाही.
Don't let the bank stay time for crop loan: Tupkar
Don't let the bank stay time for crop loan: Tupkar

बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ आली तरी अद्यापही बॅंकेने पीककर्जाचे वाटप केले नाही. शेतकऱ्यांची पीककर्जाची प्रकरणे मोठ्या संख्येने प्रलंबित आहे. सदर प्रलंबित प्रकरणे तातडीने मार्गी लावून पीककर्ज वाटप करा, अन्यथा पीककर्जाची प्रकरणे निकाली निघेपर्यंत बॅंकेतून हटणार नाही. पीककर्जासाठी बॅंकेत मुक्काम करण्याची वेळ येऊ देऊ नका, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी दिला.

शेतकऱ्यांचे पीककर्ज पुर्नगठण व नवीन पीककर्जाची प्रकरणे प्रलंबित आहेत. बॅंकांकडून शेतकऱ्यांना नाहक त्रास दिला जात आहे. त्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारी पाहता श्री. तुपकर यांनी शनिवारी (ता. १९) मोताळा येथे स्टेट बॅंक शाखेत धडक दिली. या शाखेबाबत शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत होत्या. पुनर्गठन व नवीन पीक कर्जाची प्रकरणे गेल्या अनेक महिन्यापासून प्रलंबित आहेत.

या संदर्भात तुपकर यांनी मोताळा स्टेट बँके शाखेचे व्यवस्थापक सचिन कामठे यांची भेट घेऊन याबाबत जाब विचारला. सर्व प्रकरणे ही मान्यतेसाठी खामगावला जातात. त्यामुळे विलंब होत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे तुपकर यांनी बॅंकेचे विभागीय अधिकारी वाघ यांच्याशी देखील याविषयावर चर्चा केली. तेव्हा येत्या आठ दिवसांमध्ये सर्व प्रकरणे मार्गी लावण्याचे आश्वासन बँक प्रशासनाने दिले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com