परगावावरून आलेल्यांचे सरसकट होम क्वारंटाइन करू नका ः आयुष प्रसाद

पुणे : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपयोजना म्हणून, आजाराची लक्षणे असलेल्या नागरिकांनी घरातच राहायचे आहे. त्यांना होम क्वारंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा नागरिकांची चौकशी करून त्यांच्या हातावर होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात येतात. मात्र, या आजारीची लक्षणे दिसल्याशिवाय पुणे, मुंबईसह परगावावरून आलेल्या नागरिकांना सरसकट शिक्के मारू नये, असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले आहेत.
every person Don't Quarantine Home Alone: ​​Ayush Prasad

जगभरात ‘कोरोना’चे संसर्ग बाधित रुग्ण वाढत आहेत. पुणे, मुंबईसह विविध शहरातही बाधित रुग्णांची संख्या दिसून आली आहे. सध्या ग्रामीण आणि शहरी भागातील लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत होत आहेत. या स्थलांतरीत नागरिकांची वेळोवेळी तपासणी करता यावी, या उद्देशाने प्रशासनाने खबरदारी म्हणून काही आदेश दिले होते. सर्दी, ताप, खोकला, श्‍वसनास त्रास अशी लक्षणे असलेल्यांनी घरातच राहावे, यासाठी त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. ओळख पटावी म्हणून, त्यांच्या हातावर होम क्वारंटाइन असे शिक्के मारण्यात येत होते.       मात्र, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुणे, मुंबईसह परगावातून आलेल्या नागरिकांची सखोल चौकशी न करता सरसकटपणे होम क्वारंटाइनचे शिक्के मारण्यात येत आहेत. जुन्नर तालुक्यातील तब्बल १९ हजारांहून अधिक लोकांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याचे नुकतेच उघडकीस आले. यामुळे ग्रामीण भागात घबराटीचे वातावरण निर्माण होत आहे. काही भागात ‘शिक्का’ मारू नये, म्हणून शहरातून आलेले लोक इकडे तिकडे भटकत असल्याचे प्रकार दिसून येत आहेत. 

शिवाय नियमित वापराच्या शाई पॅड आणि शिक्क्यांचा यासाठी वापर होत आहे. एकच शिक्का अनेकांना वापरण्यात येत असल्याने कोरोना विषाणूचा आणखी प्रसार होईल, असे गैरसमजाचे वातावरण आहे. 

या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सरसकट होम क्वारंटाइन शिक्के मारू नयेत, ‘कोरोना’चा प्रसार टाळण्यासाठी नागरिकांनी घरात रहाण्याबरोबरच, सर्व बाबी पाळण्याच्या सूचना देण्यात याव्यात, वेळोवेळी वैद्यकीय पथकामार्फत तपासणी करण्यात यावी, असे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.  

सखोल चौकशी न करता सरसकट होम कोरंटाईन शिक्के मारून, घबराटीचे व गैरसमजुतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न काही असामाजिक घटक करत आहेत. परगावावरून आलेल्या स्थलांतरीत नागरिकांना होम क्वारंटाइनचे शिक्के मारू नयेत, असे आदेश देण्यात आले आहेत. - आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com