agriculture news in marathi Dont restrict farm products : Nagpur District collector | Agrowon

शेतमाल वाहतुकीस अडथळा नकाे; नागपूर जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 27 मार्च 2020

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतमाल वाहतुकीला आडकाठी न आणण्याबाबतचे निर्देश दिले आहेत.

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतमाल वाहतुकीला आडकाठी न आणण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. मात्र त्यानंतरही स्थानिकस्तरावर पोलिसांकडून शेतमालाची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्याची दखल घेत नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी संत्रा वाहतुकीत अडथळा न निर्माण करण्याच्या सूचना स्थानिकस्तरावर दिल्या आहेत. 

कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. परिणामी पोलिसांकडून रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना दंडुक्याचा मार दिला जात आहे. त्यामध्ये शेतमालाची वाहतूक करणारे वाहतूकदारही भरडल्या जात आहे. पोलिसांकडून त्यांनाही टार्गेट केले जात असल्याने तोडणीस आलेल्या संत्र्याचे करावे तरी काय ? अशा विवंचनेत संत्रा उत्पादक आहेत. त्याबाबतच्या तक्रारी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या. त्याची दखल घेत जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संत्रा वाहतुकीत अडथळे न आणण्याचे निर्देश दिले आहेत. 

काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्‍वर या भागात संत्रा लागवड आहे. संत्रा तोड करून त्याची वाहतूक शेतकरी करीत आहेत. त्याला अडथळा निर्माण करू नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे. ही अत्यावश्‍यक बाब असल्याने त्याला निर्बंध नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.


इतर ताज्या घडामोडी
कृषी विधेयकांस विरोधासाठी इंडिया...नवी दिल्ली : बहुचर्चित कृषी विधेयकांवर राष्ट्रपती...
निकोप स्पर्धेसाठी मोदी सरकारचा प्रयत्नशेती उत्पादन व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन आणि...
नगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून...नगर  ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या...
पुण्यात भाजीपाल्याची आवक घटली; दरात वाढपुणे  ः गुलटेकडी येथील पुणे कृषी उत्पन्न...
रत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत...रत्नागिरी  : हळवे भात पीक कापणी योग्य झाले...
औरंगाबादमध्ये थेट शेतीमाल विक्रीची ...औरंगाबाद  : औरंगाबाद शहरासह ग्रामीण भागात...
नांदेडमधील पीक नुकसानीची...नांदेड : नांदेड जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून...
हिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ...हिंगोली  ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
पूरस्थितीचा गडचिरोली जिल्ह्यातील २०...गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून पाणी...
निर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्याहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...
लातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊसपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण...
मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त...मराठवाड्यातील बहुतांश क्षेत्र कोरडवाहू असून...
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...