Agriculture news in Marathi Don't rush to sell soybeans | Page 2 ||| Agrowon

सोयाबीन विक्रीची घाई नको

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

सोयाबीनला वाढीव दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई न करता टप्प्याटप्प्याने बाजारत आणण्याचे आवाहन बाजार विश्‍लेषकांकडून केले जात आहे.

नागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक आर्द्रता असलेले सोयाबीन विक्रीसाठी आणले जात आहे. मात्र सरसकट सोयाबीनला वाढीव दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीची घाई न करता टप्प्याटप्प्याने बाजारत आणण्याचे आवाहन बाजार विश्‍लेषकांकडून केले जात आहे.

राज्यातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची पहिल्यांदा आवक झाल्यानंतर मुहूर्ताच्या या शेतीमालाला नऊ हजार ते १० हजार रुपयांचा दर मिळाला. अनेक शेतकऱ्यांनी या लिलावाचे व्यवहार व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ते सोशल मीडियावर व्हायरल केले. त्यासोबतच विक्री पावतीचा फोटो देखील व्हायरल करण्यात आला. अनेक व्हॉट्सअॅप ग्रुपवर देखील हे फोटो आजही फिरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून अधिक आर्द्रता असलेले सोयाबीनच विक्रीसाठी आणले जात आहे. 

प्रक्रिया उद्योजकांकडून सरासरी १० टक्के आर्द्रता असलेले सोयाबीन खरेदी केली जाते. सध्या नव्या सोयाबीनमध्ये दुप्पट म्हणजे २० टक्के आर्द्रता आहे. त्यासोबतच काही भागात पाण्याने डागाळलेले सोयाबीन देखील बाजारात पोहोचत आहे. अशा वेळी शेतकऱ्यांनी विक्रीची घाई न करता चांगला दर पदरात पाडून घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री केली पाहिजे, असे आवाहन बाजार विश्‍लेषकांकडून केले जात आहे. 

वाशीम सोयाबीन खरेदी-विक्रीचे हब समजल्या जातो. याच जिल्ह्यातील कारंजा बाजार समितीमध्ये सोमवारी (ता. २०) ८०० क्विंटल सोयाबीनची आवक नोंदविण्यात आली. नागपूरच्या कळमणा बाजार रोज अवघी आठ क्विंटल आवक होत असून, दर ६३०० ते ७००० रुपये असा होता. पाच हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल असा दर मिळाला.

शेतकऱ्यांनी चांगले दर पदरात पाडून घेण्यासाठी एकाच वेळी सोयाबीन विक्रीसाठी न आणता टप्प्याटप्प्याने ते विक्रीसाठी आणले पाहिजे. 
- नीलेश भाकरे, सचिव, कारंजा बाजार समिती, वाशीम


इतर अॅग्रो विशेष
पूर्णाथडी म्हशीला राजमान्यतेचा प्रस्ताव...अकोला ः पूर्णा नदीच्या खोऱ्यात आढळणाऱ्या फिकट...
देशी गाईंच्या प्रजातींचे संवर्धन गरजेचेपुणे : देशात गाईच्या पारंपरिक जाती नष्ट...
पहिली उचल ३३०० द्यावी ः राजू शेट्टी...कोल्हापूर : यंदा तुटणाऱ्या उसाला पहिली उचल ३३००...
कृषी पदव्युत्तर प्रवेशासाठी १३...पुणे ः राज्यातील कृषी विद्यापीठांमधील पदव्युत्तर...
ट्रॅक्टरचलित विविध यंत्रांद्वारे वेळ,...ट्रॅक्टरचलित यंत्राच्या साह्याने पेरणी वा कोळपणी...
हमीभाव खरेदी केंद्राचा चेंडू राज्य...नागपूर ः भारतीय कापूस महामंडळाने खुल्या बाजारातून...
हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावलाअकोला ः मागील ४८ तासांत वऱ्हाडातील अकोला, वाशीम,...
हेकेखोर विमा कंपन्यांनी वेठीस धरलेपुणे ः शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळण्यासाठी...
खानदेशात केळीला ११८० रुपये दरजळगाव ः खानदेशात केळीचे दर कमी अधिक होत आहेत....
राज्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यतापुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या...
नगर जिल्ह्यात निम्म्या सोयाबीनची नासाडीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा सोयाबीनच्या क्षेत्रात...
मॉन्सूनोत्तर पावसाने पुन्हा दाणादाणनाशिक : जिल्ह्यात अतिवृष्टीच्या झळा शेतकरी सोसत...
वाहतुकदारांच्या समस्या सोडविणार :... मुंबई : कोविडमुळे आर्थिक संकटात असलेल्या...
दुग्धव्यवसायातून संयुक्त फोलाने...नगर जिल्ह्यात कुकाणे येथील संयुक्त फोलाने...
योग्य व्यवस्थापनातून वाढविला १९०...गोठा, म्हशींचे संगोपन व दूध विक्री या स्तरांवर...
संत्रा छाटणी यंत्र ‘पंदेकृवि’त दाखलअकोला : दिवसेंदिवस या भागात संत्र्याची लागवड वाढत...
‘टॅगिंग’ कपात उपक्रमाच्या यादीत ५३ साखर...पुणे ः थकीत देणी वसूल करण्यासाठी राज्य सरकारने...
शेळीमध्ये टेस्ट ट्यूब बेबीची निर्मितीअकोला ः महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ...
शेतीसाठी दिवसा बारा तास विद्युतपुरवठा...नागूपर : शेतकऱ्यांचे धानाचे पीक गर्भात आहे, ते...
द्राक्ष विमा परताव्यासाठी चकरा...नाशिक : मार्च २०२१ अखेरीस संपलेला द्राक्ष...