Agriculture news in marathi Don't rush to withdraw money in banks: Sonawne | Agrowon

बँकांमध्ये पैसे काढण्यासाठी गर्दी नको ः सोनवणे

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020


सोलापूर : केंद्र सरकारने अनुदानरूपी जनधन खात्यात जमा केलेले ५०० रुपये काढण्यासाठी विनाकारण बॅंकेत गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी केले आहे. 

सोलापूर : केंद्र सरकारने अनुदानरूपी जनधन खात्यात जमा केलेले ५०० रुपये कोणत्याही परिस्थितीत परत जाणार नाही, याची महिलांनी नोंद घ्यावी आणि रक्कम काढण्यासाठी विनाकारण बॅंकेत गर्दी करू नये, असे आवाहन जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक संतोष सोनवणे यांनी केले आहे. 

श्री. सोनवणे म्हणाले, की ग्राहकांनी अतिमहत्त्वाच्या कामासाठी पैशांची गरज असेल, तरच शाखेमध्ये यावे. ज्या ग्राहकांकडे एटीएम कार्ड उपलब्ध आहे, अशा ग्राहकांनी एटीएम केंद्रावरून पैसे काढावेत. भारतीय रिझर्व्ह बॅंकेच्या सूचनेनुसार इतर बॅंकांच्या एटीएम केंद्रावरून पैसे काढण्याची मर्यादा ही सदर संचारबंदीच्या काळासाठी शिथिल करण्यात आली आहे. यासाठी ग्राहकांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार नाही.

केंद्र सरकारने नुकतेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भावामध्ये समाजातील गरीब जनतेला आर्थिक मदत म्हणून जनधन योजनेत खाते असणा-या महिलांच्या खात्यांमध्ये ५०० रुपये प्रति महिना अनुदानरूपी जमा करण्याचे जाहीर केले आहे. ही जमा झालेली रक्कम काढण्यासाठी महिलांची झुंबड सर्व बॅंकांच्या शाखांसमोर दिसून येत आहे.

बॅंकांसमोर ग्राहकांना अनुदान देण्यासोबतच, शासकीय/निमशासकीय, खाजगी कर्मचा-यांचे पगार, सेवानिवृत्त कर्मचा-यांचे सेवानिवृत्ती वेतन देण्याचे सुद्धा आव्हान आहे. सेवा देण्यासाठी शहरातील तसेच जिल्ह्यातील सर्व बॅंकांच्या शाखेच्या कामकाजाची वेळ राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या सूचनेनुसार नियमित वेळेनुसार राहील, तरी गरजेशिवाय बँकेत पैसे काढण्यासाठी गर्दी करू नये, असे आवाहन श्री. सोनवणे यांनी केले आहे.


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
भूसंपादनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करा...सोलापूर : ‘‘उजनीच्या पाण्याचा विषय हा...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
कृषी विधेयकांमध्ये मोठा विरोधाभास ः शरद...मुंबई : कृषी विधेयकांवर राज्यसभेत दोन ते तीन दिवस...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...