जगात सर्वाधिक दूध उत्पादनाची टिमकी वाजविणाऱ्या आपल्या देशात मुळातच दुधाचे सेवन फारच कमी आहे.
ताज्या घडामोडी
खरेदी केंद्रात व्यापाऱ्यांचा कापूस घेऊ नका : कृषिमंत्री भुसे
नाशिक : ‘‘कापूस खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांव्यतिरीक्त इतर व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी होणार नाही, याची दक्षता घ्या’’, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
नाशिक : ‘‘मालेगाव तालुक्यात कापसाचे उत्पादन क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. कापूस खरेदी केंद्रामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम शासनामार्फत सुरू आहे. केंद्र वेळेवर सुरू होणे गरजेचे आहे. या केंद्रावर शेतकऱ्यांव्यतिरीक्त इतर व्यापाऱ्यांकडून कापूस खरेदी होणार नाही, याची दक्षता घ्या’’, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ मर्यादित यांच्या जळगाव विभागाअंतर्गत रविवारी (ता.२९) मालेगाव येथील शासकीय कापूस खरेदी केंद्राच्या प्रारंभाप्रसंगी भुसे बोलत होते. आमदार सुहास कांदे, पणन महासंघाचे विभागीय अध्यक्ष संजय पवार, नगरसेवक फकिरा शेख, माजी अध्यक्ष व संचालक उषा शिंदे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव, उपसभापती सुनील देवरे, तहसीलदार चंद्रजित राजपूत, मनोहर बच्छाव, संजय दुसाणे, महेश पटोडिया, युनायटेड कॉटन मिलचे संचालक अशोक बाफणा, उपेंद्र मेहता, नसिम अहमद उपस्थित होते.
गतवर्षी युनायटेड कॉटनमार्फत ६७ हजार क्विंटल कापसाची विक्रमी खरेदी केली. त्यासाठी ३६ कोटी २७ लाख रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. यंदाच्या हंगामात यापेक्षाही मोठ्या प्रमाणात कापूस खरेदी होईल, असा विश्वास भुसे यांनी व्यक्त केला.
कृषी विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांपैकी ३० टक्के योजना ह्या महिला शेतकऱ्यांसाठी राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिला शेतकऱ्यांचा सन्मान होणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. खरेदी केंद्रावर कोरडा व चांगल्या प्रतीचा कापूस आणण्याचे आवाहन पणन महासंघाचे विभागीय अध्यक्ष संजय पवार यांनी केले.
- 1 of 1022
- ››