agriculture news in marathi, Dont touch our pilot warns India to pak | Agrowon

'आमच्या वैमानिकाच्या केसालाही धक्का लागता कामा नये'

वृत्तसेवा
बुधवार, 27 फेब्रुवारी 2019

नवी दिल्ली : भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला आमच्या ताब्यात द्यावे, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

नवी दिल्ली : भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमानला आमच्या ताब्यात द्यावे, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशारा भारताने पाकिस्तानला दिला आहे.

दहशतवादाविरोधात भारताने केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतर पाकिस्तानने आज (बुधवारी) भारताच्या लष्करी ठाण्यांना लक्ष्य करत बॉम्बहल्ला करण्याचा प्रयत्न केला; पण सुरक्षा यंत्रणा कमालीच्या दक्ष असल्याने हा हल्ला निष्फळ ठरला', असे परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले. या कारवाईमध्ये भारतीय हवाई दलाने पाकिस्तानचे एक विमान पाडले; पण याच कारवाईत आपलेही एक विमान पडले आणि त्यातील वैमानिक अद्याप बेपत्ता असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

पाकिस्तानच्या दिल्लीतील उच्चायुक्तांना भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून समन्स बजावण्यात आले होते. या बैठकीत भारताकडून पाकिस्तानला स्पष्ट शब्दात इशारा देण्यात आला आहे. भारतीय विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना आमच्या ताब्यात देण्यात यावे, त्यांच्या केसालाही धक्का लागता कामा नये, असा इशाराही भारताने दिला आहे. भारतीय वैमानिकाला सोडवण्यासाठी केंद्र सरकारनेही आता दबाव टाकला आहे.

दरम्यान, विमान कोसळल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी स्वतःची सुटका करून घेतली. परंतु, पाकिस्तानच्या नागिरकांनी त्यांना मारहाण सुरू केली. अभिनंदन यांना पकडल्यानंतर त्यांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. ज्यात त्यांचा चेहरा रक्ताने माखलेला होता. व्हिडीओत हात-पाय बांधलेले दिसत होते. डोळ्यांवर पट्टी बांधलेली होती. पाकिस्तानने अभिनंदन यांचा व्हिडिओ नुकताच प्रसिद्ध केला असून, त्यामध्ये त्यांनी पाकिस्तानी सैनिकांनी नागरिकांच्या तावडीतून वाचविल्याचे म्हटले आहे. यामध्ये ते चहा पित असताना पाकिस्तानी सैनिकांशी बोलत असल्याचे दिसत आहेत. पाकिस्तानचे सैनिक अभिनंदन यांना नाव-गाव-पत्ता विचारत आहेत. ज्यावर अभिनंदन यांनी केवळ नाव व मी दक्षिण भारतीय आहे एवढेच सांगितले आहे. 'मला खात्री आहे बाकी तुम्ही शोधून काढालंच...' असे म्हणत 'सॉरी मेजर मी तुम्हाला अधिक माहिती देऊ शकत नाही' असे म्हटले आहे.

युद्धबंदीसाठी काय आहे नियम?
पाकिस्तान आंतरराष्ट्रीय नियम पाळत असेल तर अभिनंदन यांच्या केसालाही धक्का लावता येणार नाही. कारण, युद्धबंदींसाठी खास करार आहे. जिनेव्हा करार असे याचे नाव आहे. या करारानुसार युद्धबंदींना भीती दाखवली जाऊ शकत नाही, किंवा त्यांचा अपमानही केला जाऊ शकत नाही. युद्धबंदींचा वापर करुन जनतेमध्ये उत्सुकता करण्यासाठीही बंदी आहे. जिनेव्हा करारानुसार, एकतर युद्धबंदीवर खटला चालवला जाऊ शकतो, किंवा संबंधित देशाकडे त्या युद्धबंदीचे हस्तांतरण करावे लागेल. युद्धबंदी पकडल्यानंतर नाव, सैन्यातील पद आणि नंबर सांगण्याची तरतूद आहे. त्यामुळे पाकिस्तानी लष्कराला अभिनंदन यांना एका सैनिकासारखीच वागणूक द्यावी लागेल.


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...