Agriculture news in Marathi, Don't want to play Panchanama drama: Shetty | Agrowon

पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट विमा नुकसानभरपाई द्या
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

परभणी ः नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट विमा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मंजूर करावी. मागच्या वर्षीचा दुष्काळ आणि यंदा खरिपाच्या ऐन सुगीत झालेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे किमान एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

परभणी ः नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट विमा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मंजूर करावी. मागच्या वर्षीचा दुष्काळ आणि यंदा खरिपाच्या ऐन सुगीत झालेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे किमान एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

बुधवारी (ता. ६) येथे पत्रकार परिषदेत शेट्टी पुढे म्हणाले, की मराठवाड्यासह राज्यातील कुठलेली पीक पावसाच्या तडाख्यातून वाचलेले नाही. मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, द्राक्ष, डाळिंब आदि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत. मागच्या वर्षीचा दुष्काळ आणि यंदाची अतिवृष्टी यामुळे शेतकरी मोडून पडला आहे. राज्यातील काळजीवाहू सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही. 

या परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित आहे. परंतु केंद्राचे पथक अजून नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले नाही. केंद्राकडून सातत्याने महाराष्ट्राची उपेक्षा केली जात आहे. किमान एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय राज्यातील शेतकरी उभा राहणार नाही. विम्याचा पहिला हप्ता तत्काळ अदा करणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणा पंचनामे करतांना अनास्था दाखवत आहेत. 

आजवर कोट्यवधी रुपयांची लूट केलेल्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे गंडविण्याची भूमिका घेतली तर त्यांना वठणीवर आणू. सरकार कुणाचेही येवो शेतकऱ्यांचे प्रश्‍न गांभीर्याने घेतले नाही तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल. या वेळी वस्त्रोउद्योग महामंडळांचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ, भगवान शिंदे उपस्थित होते.

इतर ताज्या घडामोडी
संत नामदेव महाराजांच्या १७ व्या...पंढरपूर : पंढरपूर येथून आळंदीकडे निघालेल्या श्री...
फळपीक सल्लायावर्षी पावसाळी हंगाम अपेक्षेपेक्षा जास्त वाढला....
कळमणा बाजारात सोयाबीन दरात घसरणनागपूर : गेल्या आठवड्यात सुधारलेल्या सोयाबीनच्या...
नाशिकमध्ये हिरव्या मिरचीला १३०० ते २५००...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
हळद पिकातील प्रमुख रोगांचे नियंत्रणस ध्या हळद लागवड होऊन तीन ते चार महिन्यांचा...
सोयाबीन, मका, गव्हाचे दर स्थिर; बाजरीत...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
शिशुआहारातील शर्करेविषयी अधिक काळजी...माणसाच्या आरोग्याला हानिकारक खाद्यविषयक सवयी...
वऱ्हाडात जमिनीतील ओलीमुळे रब्बीची पेरणी...अकोला : मॉन्सूनोत्तर पावसाने मोठा...
'गडचिरोली जिल्ह्यात शासकीय धान खरेदी...गडचिरोली  ः आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने...
खानदेशात प्रकल्पांमधील साठा ७८ टक्‍क्‍...जळगाव  ः खानदेशात सर्वच भागांतील...
भामरागड तालुक्‍यातील पूरग्रस्त...गडचिरोली  ः उपविभागीय अधिकारी कार्यालय...
कापूस खरेदीसाठी आर्द्रतेची मर्यादा...वर्धा  ः संततधार पावसामुळे या वर्षी कापसात...
'शासकीय धान केंद्रावर जाचक अटींचे...भंडारा  ः शासकीय धान खरेदी केंद्रावर पाखड...
अमरावती विभागात विषबाधितांची संख्या...अमरावती ः राज्यात दोन वर्षांपूर्वी फवारणीदरम्यान...
देवळाली कॅम्प येथून ४८ हजार रुपयांच्या...नाशिक : नाशिक तालुक्यातील देवळाली कॅम्प येथील...
डाळिंब बागा वाचविण्यासाठी धडपडआटपाडी, जि. सांगली :  यंदा तालुक्यात रिमझिम...
सांगली जिल्ह्यात रब्बीतील पिकांची ६७...सांगली : ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत...
पुणे विभागात रब्बीसाठी अडीच लाख क्विंटल...पुणे  ः यंदा पाऊस उशिरा झाल्याने पुणे...
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...