Agriculture news in Marathi, Don't want to play Panchanama drama: Shetty | Page 2 ||| Agrowon

पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट विमा नुकसानभरपाई द्या

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 7 नोव्हेंबर 2019

परभणी ः नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट विमा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मंजूर करावी. मागच्या वर्षीचा दुष्काळ आणि यंदा खरिपाच्या ऐन सुगीत झालेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे किमान एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

परभणी ः नुकसानग्रस्त पिकांच्या पंचनाम्याचे नाटक न करता सरसकट विमा नुकसानभरपाई शेतकऱ्यांना मंजूर करावी. मागच्या वर्षीचा दुष्काळ आणि यंदा खरिपाच्या ऐन सुगीत झालेल्या पावसामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. शेतकऱ्यांचे किमान एक लाख रुपये मदत द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली.

बुधवारी (ता. ६) येथे पत्रकार परिषदेत शेट्टी पुढे म्हणाले, की मराठवाड्यासह राज्यातील कुठलेली पीक पावसाच्या तडाख्यातून वाचलेले नाही. मका, सोयाबीन, कापूस, ज्वारी, द्राक्ष, डाळिंब आदि पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जमिनी खरडून गेल्या आहेत. मागच्या वर्षीचा दुष्काळ आणि यंदाची अतिवृष्टी यामुळे शेतकरी मोडून पडला आहे. राज्यातील काळजीवाहू सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही. 

या परिस्थितीत केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदत करणे अपेक्षित आहे. परंतु केंद्राचे पथक अजून नुकसानीची पाहणी करण्यासाठी आलेले नाही. केंद्राकडून सातत्याने महाराष्ट्राची उपेक्षा केली जात आहे. किमान एक लाख रुपये नुकसानभरपाई मिळाल्याशिवाय राज्यातील शेतकरी उभा राहणार नाही. विम्याचा पहिला हप्ता तत्काळ अदा करणे आवश्यक आहे. सरकारी यंत्रणा पंचनामे करतांना अनास्था दाखवत आहेत. 

आजवर कोट्यवधी रुपयांची लूट केलेल्या विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांचे गंडविण्याची भूमिका घेतली तर त्यांना वठणीवर आणू. सरकार कुणाचेही येवो शेतकऱ्यांचे प्रश्‍न गांभीर्याने घेतले नाही तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी स्वाभिमानी रस्त्यावर उतरेल. या वेळी वस्त्रोउद्योग महामंडळांचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोपळे, जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, केशव आरमळ, भगवान शिंदे उपस्थित होते.


इतर ताज्या घडामोडी
अकोल्याचे अखर्चित कोट्यवधी रुपये परत...अकोला : कोरोनामुळे राज्याची आर्थिक घडी विस्कळीत...
उजनीतून आष्टी तलावामध्ये पाणी सोडा,...सोलापूर ः उजनी धरणातून सध्या कालवा आणि बोगद्यात...
सेंद्रिय शेती गटांसाठी वाशीममध्ये अर्ज...वाशीम : राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत...
नागपूर : दीड लाख रुपयांचा एचटीबीटी साठा...नागपूर ः मौदा तालुक्‍यातील अरोली पोलिस...
कृषी सेवा केंद्रधारकांकडून होणारी...अमरावती ः लॉकडाऊनच्या परिस्थितीचा फायदा घेत कृषी...
सातारा जिल्ह्यात साडेसात हजार...सातारा  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर...
पुणे जिल्ह्यात खरिपासाठी १ लाख १९ हजार...पुणे  ः खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतांचा...
नामंजूर वनहक्क दाव्यांसंदर्भात विभागीय...मुंबई  : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी...
प्रत्यक्ष खर्चाचे आणि कर्जाचे पॅकेज...मुंबई : पात्र नसणाऱ्या आणि उचल न घेतलेल्या...
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये १४...पुणे  : ‘कोरोना’चा प्रादुर्भाव झाल्यानंतर...
निशिगंध लागवडीचे नियोजनलागवड केल्यापासून निशिगंध पीक २ ते ३ वर्षे त्याच...
चिखलगावच्या जिनिंगमध्ये कापसाला भीषण आग...अकोला ः येथील पातूर मार्गावर चिखलगाव जवळ असलेल्या...
सांगा साहेब, खरीप कसा पेरू? शेतकऱ्याने...नाशिक : मागील खरिपाच्या हंगामात अतिवृष्टीची...
जैविक शेती मिशनद्वारे यूट्यूब चॅनलच्या...अमरावती ः कमी खर्चाच्या जैविक शेतीला प्रोत्साहन...
मका पिकाची हेक्टरी उत्पादकता वाढवा ः...बुलडाणा ः शासनाने यावर्षी पाऊस चांगला असताना...
समृद्धी महामार्गाच्या धुळीमुळे नुकसान...कारंजालाड, जि. वाशीम : समृद्धी महामार्गाच्या...
बुलडाण्यात पीकविमा बचत खात्यात जमा...बुलडाणा ः जिल्ह्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचा पीकविमा...
म्हैसाळ योजनेतून तलाव भरून देण्याची...सांगली ः म्हैसाळ उपसा योजना सुरू होऊन महिन्याचा...
शेतकऱ्यांनो पीक कर्जासाठी ऑनलाइन मागणी...औरंगाबाद : ‘‘कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर होणाऱ्या...
जळगावात ज्वारी खरेदीसाठी स्वस्त धान्य...जळगाव : जिल्ह्यात भरडधान्याच्या साठवणुकीसाठी...