agriculture news in Marathi, door of agri service may be closed for diploma holder, Maharashtra | Agrowon

पदविकाधारकांना कृषिसेवेचे दरवाजे बंद होण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

 पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो युवक दहावीनंतर कृषी पदविका प्राप्त करतात. मात्र, ग्रामविकास विभागानंतर आता या पदविकाधारकांना कृषी खात्याचेदेखील दरवाजे बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

ग्रामविकास खात्याकडून २०१२ पर्यंत ग्रामसेवक भरतीसाठी कृषी पदविकाधारकांमधून भरले जात होते. मात्र, तत्कालीन सरकारने ग्रामसेवक पदासाठी बारावीच्या ६० टक्के गुणधारकांनादेखील संधी दिल्यामुळे ग्रामसेवकपदासाठी भरमसाट अर्ज येऊ लागले. त्यामुळे कृषी खात्यातील कृषिसेवक हे एकमेव पद पदविकाधारकांसाठी राखीव होते. 

 पुणे : राज्याच्या शेतकरी कुटुंबातील हजारो युवक दहावीनंतर कृषी पदविका प्राप्त करतात. मात्र, ग्रामविकास विभागानंतर आता या पदविकाधारकांना कृषी खात्याचेदेखील दरवाजे बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 

ग्रामविकास खात्याकडून २०१२ पर्यंत ग्रामसेवक भरतीसाठी कृषी पदविकाधारकांमधून भरले जात होते. मात्र, तत्कालीन सरकारने ग्रामसेवक पदासाठी बारावीच्या ६० टक्के गुणधारकांनादेखील संधी दिल्यामुळे ग्रामसेवकपदासाठी भरमसाट अर्ज येऊ लागले. त्यामुळे कृषी खात्यातील कृषिसेवक हे एकमेव पद पदविकाधारकांसाठी राखीव होते. 

कृषी खात्याने यंदा परिक्षेत ‘पदविके’च्या विद्यार्थ्यांना ‘पदव्युत्तर’चे प्रश्न विचारले आहेत. त्यामुळे हजारो विद्यार्थी नापास होण्याची शक्यता आहे. यातील चार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे (मॅट) दाद मागितली आहे.

“राज्य शासनाला मॅटने नोटिसा पाठविल्या आहेत. याच आठवड्यात शासनाकडून आपली भूमिका न्यायालयासमोर मांडली जाईल. २०० गुणांच्या या परीक्षेत १२० प्रश्न कृषी क्षेत्राशी निगडित होते. मात्र, त्यातही फक्त २५ टक्के प्रश्न हे पदविकाधारकांच्या स्तराचे होते. जाहिरातीमध्ये पदविकेचा उल्लेख असताना ७० टक्के प्रश्न पदवी व पदव्युत्तरचे का विचारण्यात आले, असा सवाल आम्ही याचिकेत केला आहे,’’ अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. 

पदविकाधारकांसाठी आता कृषी खात्याच्या सेवेचे मार्गदेखील बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पदविकाधारकांसाठी अभ्यासक्रमाची उपयुक्तता आहे काय, याचाही आढावा कृषी विद्यापीठांनी घ्यावा, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. 

गणिताचेही प्रश्‍न विचारले...
कृषी सेवक भरतीमध्ये बौद्धिक चाचणीऐवजी गणिताचे प्रश्न विचारण्यात आल्याचादेखील दावा विद्यार्थ्यांनी केला आहे. परीक्षेची काठिण्यपातळी वाढवून पदविकाधारकांना नापास करण्याच्या हेतूने ही परीक्षा घेण्यात आली. आमच्या भवितव्याशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे, असेही विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.


इतर अॅग्रो विशेष
जळगाव ः कापसाच्या खेडा खरेदीला कमी...जळगाव ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा...कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी...
चांगदेव यात्रेला प्रारंभ; दिंड्या दाखलचांगदेव, जि. जळगाव ः सिद्धेश्वर योगिराज चांगदेव...
सर्व्हर डाउनच्या गोंधळामुळे द्राक्ष...नाशिक : केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क...
विदर्भात पावसाला पोषक हवामान पुणे: राज्याच्या कमाल आणि किमान तापमानात वाढ...
चारशे अधिकाऱ्यांच्या कृषी विभागात...पुणे ः कृषी विभागात गेल्या दोन ते तीन दिवसांत ३९९...
परराज्यापर्यंत विस्तारला ऊसरोपे...मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण...
केळी ‘रायपनिंग चेंबर’चा यशस्वी केला...कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसबहुल क्षेत्रात केळी...
शेतकऱ्यांवर अन्यायकारक करार नकोचअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या...
ऐच्छिक पीकविम्याचे इंगितकें द्र सरकारने पीकविमा योजना शेतकऱ्यांसाठी...
नैसर्गिक नव्हे, सेंद्रिय शेतीची धरा काससुभाष पाळेकरांच्या पद्धतीनुसार बाह्य निविष्ठा...
जलयुक्त फेल, पुढे काय?उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती...
ऊस उत्पादकता २५० टनांपर्यंत न्यावीच...पुणे : देशातील ऊस उत्पादकता एकरी शंभर टन...
कर्जमाफीसाठी आकस्मिकता निधीतून दहा हजार...मुंबई : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य सरकारने...
पीकविमा हप्त्यापोटी पाचशे कोटी वितरणास...मुंबई ः पंतप्रधान पीकविमा योजना खरीप हंगाम २०१९...
मोसंबी क्लटरमध्ये शाश्‍वत उत्पादन,...औरंगाबाद : मोसंबी उत्पादकांसाठी उत्पन्नाची...
डाळिंब उत्पादनात ३० टक्के घटसांगली ः सुरुवातीला दुष्काळी परिस्थिती, त्यानंतर...
कोरोनाच्या अफवेमुळे पोल्ट्रीचे १५०...पुणे : कुक्कुट पक्षी व कुक्कुट उत्पादने यांचा...
प्रयोगशील शेतीच्या आधारे चिंचवलीने...पारंपरिक भातशेतीत बदल करून ऊसशेती व त्यास...
कहर ‘कोरोना’चाकोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाने जगभर दहशतीचे...