Agriculture news in Marathi, door to door cotton purchase has less response | Agrowon

कापसाच्या खेडा खरेदीला अपेक्षित वेग नाहीच

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 26 नोव्हेंबर 2019

जळगाव ः खानदेश व पश्‍चिम विदर्भासह औरंगाबादमधील जळगावलगतच्या भागात कापसाच्या खेडा खरेदीला अजूनही अपेक्षित वेग आलेला नाही. जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्येही कापसाची आवक फारशी नाही. यातच कापसाला खरेदीदार, एजंट चार दर देत आहेत. कापसाला कमाल ५१०० रुपये क्विंटल असा दर आहे. 

जळगाव ः खानदेश व पश्‍चिम विदर्भासह औरंगाबादमधील जळगावलगतच्या भागात कापसाच्या खेडा खरेदीला अजूनही अपेक्षित वेग आलेला नाही. जिनिंग प्रेसिंग कारखान्यांमध्येही कापसाची आवक फारशी नाही. यातच कापसाला खरेदीदार, एजंट चार दर देत आहेत. कापसाला कमाल ५१०० रुपये क्विंटल असा दर आहे. 

७ नोव्हेंबरपर्यंत लांबलेल्या पावसामुळे कापसात आर्द्रता आहे. भारतीय कापूस महामंडळाने खानदेश व पश्‍चिम विदर्भातील काही केंद्रांवर कापूस खरेदी २१ नोव्हेंबरपासून सुरू केली. या केंद्रांमध्येही अधिक आर्द्रतेचा कापूस नाकारला जात आहे. याचा लाभ खासगी व्यापारी, त्यांचे मध्यस्थ घेत असून, कापसाला ४५००, ४६००, ४८०० व कमाल ५१०० रुपये क्विंटल दर देत आहेत. शेतकरी जिनिंग प्रेसिंग कारखान्यात आपला दर्जेदार कापूस विक्रीसाठी घेऊन गेल्यास तेथे ५१५० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळत आहे. 

खेडा खरेदी किंवा गावांमध्ये जावून व्यापारी, मध्यस्थ फारशी खरेदी करीत नसल्याचे चित्र आहे. काही लहान कारखानदार मध्यस्थांच्या माध्यमातून कमी प्रमाणात खरेदी करीत असून, ही मंडळी ४६०० रुपये क्विंटल दर १५ ते २० टक्के आर्द्रतेच्या कापसाला देत आहे. १२ टक्के आर्द्रतेच्या कापसाला ४८०० रुपये क्विंटलचा दर देत आहेत. खानदेशमधील जळगाव, चोपडा, धरणगाव, नंदुरबार, शहादा, शिरपूर या प्रमुख बाजारांसह औरंगाबादमधील सोयगाव, फुलंब्री भागातही कापसाचे दर स्थिर आहेत. 

‘पूर्वहंगामी’तून मिळतोय दर्जेदार कापूस

सध्या पूर्वहंगामी कापूस पिकात पुन्हा कापसाची बोंडे उमलली आहेत. त्यात दर्जेदार कापूस उपलब्ध होत आहे. त्यात आर्द्रता कमी असल्याने खेडा खरेदीत किमान पाच हजार रुपये क्विंटल दर त्यास देण्यास खरेदीदार तयार होत आहेत. आणखी एका वेचणीनंतर पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र रिकामे करण्यास शेतकरी सुरुवात करतील. साधारणतः पुढील १२ ते १५ दिवसांनंतर खानदेशातील या कापसाखालील क्षेत्र रिकामे होण्यास सुरुवात होईल. यामुळे पुढे पूर्वहंगामी कापूस पिकातून हवा तेवढा कापूस उपलब्ध होणार नाही. खरेदीदारांचे उत्पादनाचे अंदाज चुकण्याची शक्‍यता आहे. अशातच ज्या शेतकऱ्यांकडे एकाच वेळी ८० ते ८५ क्विंटल चांगला कापूस उपलब्ध होत आहे, त्यांना प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांवर दर देण्यास खरेदीदार तयार होत आहेत.

मध्य प्रदेशातही दर ५३०० रुपयांपर्यंत

मध्य प्रदेशातील सेंधवा, बडवानी, खरगोन, बऱ्हाणपूर येथील बाजारातही कापसाची आवक कमी आहे. बडवानी व सेंधवा येथील बाजारात कापसाची खरेदी वाढली असून, चांगली उलाढाल होत आहे. खरगोन येथे दर्जेदार कापसाची गेल्या आठवड्यात कमाल ५३०० रुपये क्विंटल दराने खरेदी झाल्याचे सांगण्यात आले.

पणनची खरेदी अद्याप सुरू नाही

पणन महासंघाची खरेदी अद्याप विदर्भ, खानदेशात सुरू झालेली नाही. परंतु काही सहकारी सूतगिरण्यांकडून कापसाची खरेदी सुरू आहे. नंदुरबार जिल्ह्यात लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी (शहादा), धुळ्यात जवाहर सूतगिरणीत कापसाची खरेदी सुरू आहे, अशी माहिती मिळाली.


इतर ताज्या घडामोडी
कापूस दर ५१०० वर स्थिर, खेडा खरेदी वाढलीजळगाव  ः कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात...
पलटी नांगर योजनेसाठीचा निधी अपुरा जळगाव  ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे...
जळगाव जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बॅंकांचे...जळगाव  ः महाविकास आघाडीने जाहीर केलेली...
जामनेरातील टेक्स्टाइल पार्क रखडलेजळगाव ः खानदेशातील कापसावर अधिकाधिक प्रक्रिया...
पुणे जिल्हा परिषद कृषी सभापतिपदी...पुणे : जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य...
पुणे बाजार समितीत कांद्याची विक्रमी ३२५...पुणे ः नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय नागरिक...
नियोजनात हिवरे बाजार देशाचे मॉडेल ः डॉ...नगर ः हिवरे बाजार हे दूरदृष्टी नियोजनाचे देशाचे...
वऱ्हाडात रब्बीत हरभऱ्याचे क्षेत्र...अकोला  ः यंदा वऱ्हाडात रब्बीची लागवड बुलडाणा...
राज्यात आर. आर. पाटील स्मार्ट ग्राम...मुंबई : ग्रामविकास विभागामार्फत राज्यात कै. आर....
हृदयविकारामुळे होणारे मृत्यू...मुंबई : हृदयाला रक्तपुरवठा कमी झाल्याच्या...
दूधदरवाढीसाठी ‘स्वाभिमानी’चे परभणीत...परभणी ः मराठवाड्यात शासकीय दूध योजनेअंतर्गंत...
सोलापुरात कांद्यासह सर्व व्यवहार ठप्पसोलापूर : केंद्र सरकारने आणलेल्या सीएए आणि एनआरसी...
चार प्रकल्पातून मराठवाड्यात पावणेतीन...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, बीड,...
‘विठ्ठल’च्या कारभाराची स्वतंत्र चौकशी...पंढरपूर, जि. सोलापूर : विठ्ठल साखर कारखान्याच्या...
परभणीत फ्लॉवर ६०० ते १००० रुपये...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
आव्हानाला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी शेतकरी...
खानदेशात कमाल तापमानात ९ अश सेल्सिअसने...जळगाव  : भर दुपारीही अंगात हुडहुडी भरविणारी...
फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही;...नाशिक : ‘‘नाशिक शहराजवळील विविध गावांमध्ये...
'जलयुक्त शिवार' सामूहिक चळवळीतून...जळगाव : ‘महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली...
वाशीममध्ये मूग, उडीद नुकसानग्रस्तांना...वाशीम  ः जिल्ह्यात या खरीप हंगामात नुकसान...