परभणीत घरपोच भाजीपाला विक्री ठरतेय किफायतशीर

परभणी ःमिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील अल्पभूधारक भाजीपाला उत्पादक तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महिनाभरापूर्वी परभणी शहरातील विविध वसाहतीमधील नागरिकांना थेट शेतातून दररोज काढणी केलेला ताजा भाजीपाला घरपोच विक्रीचा प्रयोग सुरू केला. त्यास शहरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
door  to door vegetable sales are becoming Beneficial in Parbhani
door to door vegetable sales are becoming Beneficial in Parbhani

परभणी ः मिरखेल आणि देशमुख पिंपरी येथील अल्पभूधारक भाजीपाला उत्पादक तरुण शेतकऱ्यांनी एकत्र येऊन महिनाभरापूर्वी परभणी शहरातील विविध वसाहतीमधील नागरिकांना थेट शेतातून दररोज काढणी केलेला ताजा भाजीपाला घरपोच विक्रीचा प्रयोग सुरू केला. त्यास शहरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 

सध्या संचारबंदीच्या काळात थेट दारामध्येच ताजा भाजीपाला उपलब्ध होत असल्याने शहरातील नागरिकांची सोय झाली आहे. या तरुण शेतकऱ्यांनी स्वतःची विक्री व्यवस्था निर्माण केल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत अन्य शेतकऱ्यांसारखी भाजीपाला विक्रीसाठी गैरसोय होत नाही. तुलनेने अधिक चांगले दर मिळत असल्याने घरपोच भाजीपाला विक्रीचा हा प्रयोग किफायतशीर ठरत आहे.

परभणी शहरापासून १३ किलोमीटरवर असलेल्या मिरखेल (ता. परभणी) येथील संभाजी गायकवाड हे बारमाही अडीच ते तीन एकरवर विविध प्रकारचा भाजीपाला तसेच फुलांचे उत्पादन घेतात. गेल्या महिन्यापर्यंत गायकवाड परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रवेशव्दारसमोर भाजीपाला विक्री करत असत. परंतु या ठिकाणी शेतकरी तसेच व्यापाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे भाजीपाला विक्रीसाठी बसण्यास जागा देखील मिळत नाही.

दरम्यानच्या काळात संभाजी गायकवाड यांनी गावातून परभणी शहरात भाजीपाला वाहतूक करण्यासाठी अॅटोरिक्षा घेतला. या अॅटोरिक्षाव्दारे केवळ भाजीपाल्याची वाहतूक न करता घरपोच विक्री केली तरअधिक फायदा होईल, असे वाटत होते. परभणी शहरापासून २० किलोमीटरवरील पिंपरी देशमुख येथील अल्पभूधारक तरुण शेतकरी सुदाम माने हे देखील अनेक वर्षांपासून भाजीपाला उत्पादन घेतात. गायकवाड आणि माने यांनी एकत्र येऊन घरपोच भाजीपाला विक्रीचा प्रयोग सुरू केला. त्यात गावातील इच्छूक शेतकऱ्यांना सहभागी करुन घेतले.

गेल्या महिन्यात परभणी शहरातील वसमत रस्त्यावरील दत्तधाम परिसरातील शहरापासून तसेच भाजीपाला विकत मिळण्याची सुविधा नसलेल्या वसाहतीमध्ये घरपोच भाजीपाला विक्री सुरू केली. ताजा भाजीपाला मिळत असल्यामुळे शहरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अनेक वर्षांपासून भाजीपाला उत्पादक असलेल्या या शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्य दिवसभर शेतातील भाजीपाल्याची काढणी करतात.

दररोज सकाळी भाजीपाला अॅटोरिक्षामध्ये भरुन परभणी येथे आणला जातो. संभाजी गायकवाड आणि सुदाम माने यांच्यासह त्या -त्या दिवशी सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा भाजीपाला वेगवेगळा ठेवला जातो. शहरातील वसाहतीमध्ये प्रवेश केल्यानंतर लाऊड स्पिकरव्दारे भाजीपाला खरेदीचे आवाहन केले जाते. ग्राहकांनी भाजीपाल्याची खरेदी केल्यानंतर त्याचवेळी संबंधित शेतकऱ्यांस तत्काळ पैसे दिले जातात. 

इतर शेतकऱ्यांना करून घेतले सहभागी पूर्वी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी १२ वाजेपर्यंत भाजीपाल्याची विक्री केली जात असे. परंतु आता दुपारी तीन पर्यंत केली जात आहे. दररोजच्या खर्चाची विभागणी केली जाते. स्वतःची विक्री व्यवस्था निर्माण करुन अन्य शेतकऱ्यांना देखील यामध्ये सहभागी करुन घेतले आहे. त्यामुळे दररोजचा खर्च जाता प्रत्येकाला ८०० ते १००० रुपयांपर्यत उत्पन्न मिळते, असे माने आणि गायकवाड यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com