Agriculture news in marathi At the door of farmers lenders deprived of crop loans | Agrowon

पीककर्जापासून वंचित शेतकरी सावकारांच्या दारात 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 16 जानेवारी 2021

वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्यांत सावकारी कर्जाची उलाढाल सुरू आहे. शासनाकडून पीककर्ज तसेच बिगर कृषी कर्ज वाटपासाठी दर वर्षी कोट्यवधींचे नियोजन होऊनही काही जण निकषांमुळे अशा कर्जांपासून वंचित असतात.

अकोला : वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्यांत सावकारी कर्जाची उलाढाल सुरू आहे. शासनाकडून पीककर्ज तसेच बिगर कृषी कर्ज वाटपासाठी दर वर्षी कोट्यवधींचे नियोजन होऊनही काही जण निकषांमुळे अशा कर्जांपासून वंचित असतात. त्यांना सावकारांसमोर हात पसल्याशिवाय पर्याय नाही हे यातून स्पष्ट झाले आहे. वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांत तब्बल ५० कोटी रुपयांचे कर्ज परवानाधारक सावकारांनी वाटप केले आहे. 

अकोल्यात सावकारीची पाळेमुळे खोलवर पसरलेली आहेत. परवानाधारकांसह अवैध सावकारीही वाढलेली आहे. गेल्या वर्षात अनधिकृत सावकारांविरुद्ध सहकार खात्याने छापेमारी केली होती. यात संशयास्पद व्यवहाराची कागदपत्रे मिळून आली होती. 

अकोल्यात सर्वाधिक सावकारी 
अकोला जिल्ह्यात १४८ परवानाधारक सावकार असून, त्यांच्या माध्यमातून ३६ कोटी ३५ लाख रुपये कर्जवाटप झाले. ४५ हजार ७७७ शेतकऱ्यांनी हे कर्ज घेतले आहे. या कर्जापैकी ३६ कोटी २० लाख रुपये हे तारणावर तर फक्त १२ लाख रुपये बिगरतारण स्वरूपाचे कर्ज आहे. 

बुलडाण्यात १२ कोटी ३० लाखांचे वाटप 
बुलडाणा जिल्ह्यात १२२ परवानाधारक सावकार आहेत. या सावकारांच्या माध्यमातून जिल्ह्यात १२ कोटी ३० लाख रुपये वितरित झाले आहेत. तब्बल १४ हजार २६१ जणांनी सावकारांकडून कर्ज काढले. यामध्ये ३६ शेतकऱ्यांनी ५ लाख ६६ हजार रुपये कृषी कर्ज सुद्धा घेतले आहे. बिगर कृषी क्षेत्रात १२ कोटी २४ लाख रुपये वाटप झाले आहेत. 

वाशीम जिल्ह्यात १.२७ कोटी कर्ज 
वाशीम जिल्ह्यात ३९ परवानाधारक सावकार आहेत. त्यांच्या माध्यमातून ५८८ जणांनी घेतले १.२७ कोटींचे कर्ज घेतले आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ११ सावकार रिसोड तालुक्यात आहेत. 

असे असतात सावकारीचे दर 
अधिकृत सावकारांकडून तारण कृषी कर्ज काढल्यास या कर्जासाठी ९ टक्के, बिगर तारण कर्जासाठी १२ टक्के, बिगर कृषी तारण कर्जासाठी १५ टक्के आणि बिगर कृषी तारणासाठी १८ टक्के व्याजदर आकारला जातो. हे परवानाधारकांचे दर आहेत. मात्र, अवैध सावकारांकडून छुप्या मार्गाने होणाऱ्या व्यवहारात याहीपेक्षा अधिक दर आकारला जातो, असे बोलले जाते. 
 


इतर ताज्या घडामोडी
बीड जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा पेच बीड : जिल्हा बँकेच्या १९ संचालक मंडळाच्या होऊ...
 खानदेशात केळीच्या दरात सुधारणा जळगाव : खानदेशात केळीच्या किमान दरात सुधारणा झाली...
‘सोलापूर, पुण्यात वन्यप्राणी हल्ला...सोलापूर ः ‘‘पुणे आणि सोलापूर वनविभागांतर्गत...
अनवलीतील नीरा भाटघरच्या कॅनॉलची...सोलापूर ः ‘‘पंढरपूर तालुक्यातील अनवली येथील नीरा...
‘पोकरा’तंर्गत योजनेत भाग घ्या ः देशमुखनांदेड : ‘‘नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेतंर्गत...
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने...
रखडलेल्या सूक्ष्म सिंचन फायलींचा मार्ग...अकोला ः गेल्या तीन वर्षांमध्ये प्रलंबित असलेले...
जवसाचे आरोग्यदायी महत्त्व जाणावे ः डॉ....अकोला ः शेतकऱ्यांनी जवसाचे उत्पन्न घेताना तेलाचा...
नांदेडमध्ये हरभऱ्याला सर्वसाधारण ४५००...नांदेड : नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीतंर्गत...
बुलडाणा : दूध उत्पादक, विक्रेत्यांना...बुलडाणा : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी...
शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी नवरदेवाची...नाशिक खामखेडा ता. देवळा : देवळा तालुक्यातील...
आमदारांच्या कुटुंबीयांसाठीच जिल्हा...नगर : जिल्हा बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत...
नविन विहीर योजनेतून सोडतीद्वारे...औरंगाबाद: राष्ट्रीय कृषी विकास योजनेतंर्गत अनु....
पंढरपुरात माघवारीनिमित्त श्री विठ्ठल-...पंढरपूर, जि. सोलापूर : माघवारी जया शुद्ध...
सीताफळ निर्यात वाढण्यासाठी तज्ज्ञांचे...बीड : केंद्र सरकारने डिसेंबर २०१८ कृषी निर्यात...
पुसदमध्ये ‘पणन’ची कापूस खरेदी बंदआरेगाव, जि. यवतमाळ : पुसद तालुक्यात सोमवार (ता....
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेत...पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेच्या प्रभावी...
काँग्रेस-राष्ट्रवादीचा सांगलीत ‘...सांगली : सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेचे...
नियमित कांदा निर्यात सुरू राहण्यासाठी...नाशिक : जिल्ह्यात कांदा महत्त्वाचे पीक आहे. मात्र...
गारपीटग्रस्तांचे पंचनामे करा ः...नागपूर : कुही तालुक्यात पाऊस व गारपिटीमुळे मिरची...