विकासाची दारे यशवंतरावांंमुळे खुली : शरद पवार

महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून राज्याला विकासाकडे नेण्यात कै. यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा आहे, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. २२) येथे काढले.
‘विकासाची दारे यशवंतरावांंमुळे खुली’ 'Doors of development open due to Yashwantrao'
‘विकासाची दारे यशवंतरावांंमुळे खुली’ 'Doors of development open due to Yashwantrao'

कोल्हापूर : महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून राज्याला विकासाकडे नेण्यात कै. यशवंतराव चव्हाण यांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या प्रयत्नामुळे विकासाची दारे खुली झाली आहेत. राज्याची औद्योगिक प्रगतीत त्यांचे योगदान अविस्मरणीय असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी शुक्रवारी (ता. २२) येथे काढले. 

येथील जिल्हा परिषद प्रांगणामध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान तर्फे उभारलेल्या केलेल्या स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण, चौथा मजला बांधकामाचा प्रारंभ पवार यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ अध्यक्षस्थानी होते. माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

पवार म्हणाले, ‘‘सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असणाऱ्या चव्हाण यांचे काम हिमालयाएवढे मोठे आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकटीकरण झाले तरच विकासाची फळे राज्यातील सामान्य लोकांना मिळतील, या उद्देशाने पंचायत राज व्यवस्था निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. केंद्रित सत्ता केंव्हाही भ्रष्ट होते यासाठीच अनेक लोकांच्या हातात सत्ता असावी यासाठी सत्तेचे विकेंद्रीकरण करून पंचायत राजमधील सदस्यांना अधिकार देण्याचे महत्तम कार्य त्यांच्या काळात झाले. यातूनच राज्यातील पंचायत राज व्यवस्था बळकट झाल्या. जे काम अयोग्य आहे त्याला नाही म्हणायला शिका, जे योग्य आहे त्याला होय म्हणा ही भूमिका अधिकाऱ्यांनी घेतली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.’’

या वेळी ३९ रुग्णवाहिकांचे लोकार्पण, दिव्यांगांना सानुग्रह अनुदान वितरण, राजर्षी शाहू पुरस्कार वितरण तसेच आचार्य अत्रे सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्काराचेही वितरण झाले. जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पालकमंत्री सतेज पाटील, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार अरुण लाड, जयंत आसगावकर, प्रकाश आवाडे, पी. एन. पाटील, प्रकाश आबिटकर, राजेश पाटील, चंद्रकांत जाधव, राजू आवळे, ऋतुराज पाटील, जिल्हाधिकारी दौलत देसाई, मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, नवे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com