Agriculture news in marathi, The doors of the 'Koyna' are stable at three feet | Agrowon

‘कोयना’चे दरवाजे तीन फुटांवर स्थिर
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

सातारा  : गेल्या पंधरा दिवसांपासून कोयना धरणासह इतर प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने सर्वच धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयना धरणाचे दरवाजे चार फुटांवर आणण्यात आले आहेत. यातून धरणात २७ हजार १७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

सातारा  : गेल्या पंधरा दिवसांपासून कोयना धरणासह इतर प्रमुख धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली. गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरल्याने सर्वच धरणातील विसर्ग कमी करण्यात आला आहे. कोयना धरणाचे दरवाजे चार फुटांवर आणण्यात आले आहेत. यातून धरणात २७ हजार १७ क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. 

कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होती. धरणातील जलपातळी नियंत्रित राहण्यासाठी त्यातून पाण्याचा विसर्ग नदीपात्रात  करण्यात आला. पाण्याची आवकेत वाढ होत असल्याने धरणाचे दरवाजे १६ फुटांवर नेण्यात आले होते. यातून प्रतिसेकंद एक लाख २२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जाता होता. यामुळे कराड व पाटण तालुक्यांतील अनेक गावांत पाणी शिरल्याने मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.

सध्या कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. सध्या धरणात पाण्याची १६ हजार ९९८ क्युसेक आवक होत आहे. धरणाचे सहा वक्र दरवाजे तीन फुटांवर स्थिर ठेवण्यात आले आहेत. २७ हजार १७ क्युसेक विसर्ग केला जात आहे. कोयना धरणात बुधवारी (ता. १४) सकाळी आठपर्यंत १००.९३ टीएमसी म्हणजेच ९५.८९ टक्के पाणीसाठा झाला आहे.

धरणातील उपयुक्त पाणी (टीएमसी)

कोयना ९५.८१ 
धोम १०.७१ 
बलकवडी ३.६१ 
कण्हेर ८.७८
उरमोडी ९.२४ 
तारळी ४.९७

 
 

इतर बातम्या
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
अकोल्यातील प्रकल्पात अत्यल्पच साठाअकोला : यंदाच्या पावसाळ्याचे सुमारे अडीच महिने...
अकोला जिल्ह्यात ६० हजार हेक्टर क्षेत्र...अकोला ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात असमतोल...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
सिंधुदुर्गात कालव, जिताडा मस्त्यबीज...मुंबई : राज्यात सागरी उत्पादनवाढीस...
ठिबकला ८० टक्के अनुदान; आंदोलनाला...भोसे, जि. सोलापूर : राज्य शासनाने कोरडवाहू...
मांडाखळीत संत्रा बागांत फळगळपरभणी : कमी पाण्यामुळे जमिनीमध्ये ओलाव्याची...
रश्‍मी बागल यांचा शिवसेनेत प्रवेशसोलापूर : जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची...
मांजरपाड्याचे पाणी दरसवाडी धरणात पोचलेनाशिक : येवल्याच्या दुष्काळी भागात पाणी...
माशांच्या पाच नव्या जातींचा घेतला शोध अरुणाचल प्रदेश राज्यातील इटानगर येथील राजीव गांधी...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
कोल्हापुरात मोहीम स्वरूपात पंचनाम्यास...कोल्हापूर: महापुराच्या प्रलयानंतर आता...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
सांगली जिल्हा बॅंकेच्या १२ शाखांचे...सांगली   ः महापुराचा फटका शेती आणि...
एकात्मिक शेती पद्धत वापरासाठी ‘कृषी’...मुंबई  : पीक उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत पिके...कोल्हापूर   : पूरग्रस्तांसह अतिवृष्टीत...
युतीतील अनेक जण आमच्या संपर्कात ः अजित...यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि...