Agriculture News in Marathi Double the farmer's income 23 MPs back to the meeting | Agrowon

शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३ खासदारांची पाठ

टीम अॅग्रोवन
रविवार, 28 नोव्हेंबर 2021

संसदेच्या कृषी विषयक स्थायी समितीची शनिवारी (ता. २७) होणारी बैठक गणसंख्येअभावी रद्द करावी लागली. बैठकीला २९ पैकी केवळ सहाच खासदार उपस्थित होते, २३ खासदारांनी दांडी मारली. बैठकीत शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याविषयी चर्चा होणार होती. 

 नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी समितीची शनिवारी (ता. २७) होणारी बैठक गणसंख्येअभावी रद्द करावी लागली. बैठकीला २९ पैकी केवळ सहाच खासदार उपस्थित होते, २३ खासदारांनी दांडी मारली. बैठकीत शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याविषयी चर्चा होणार होती. 

बैठकीला समितीचे अध्यक्ष पर्वतगौडा, प्रतापसिंग बाजवा, बी. बी. पाटील, अबू तहर खान, कैलाश सैनी, रामनाथ ठाकूर हे सहा खासदारच बैठकीला उपस्थित होते.  

बैठकीला उपस्‍थित असलेले एक सदस्य म्हणाले, ‘‘शेतकऱ्यांचे आर्थिक उत्‍पन्न दुप्पट करण्याच्या विषयावर होणारी ही महत्त्वाची बैठक पुरेशा गणसंख्येअभावी रद्द करावी लागल्यामुळे मी नाराज आहे. या बैठकीसाठी मी खास दिल्लीला आलो होतो.’’ पंतप्रधान मोदी यांनी तीन कृषी कायदे माघारी घेण्याचे जाहीर केले होते. कॅबिनेटमध्ये त्यावर शिक्कामोर्तबही झाले होते. त्या पार्श्‍वभूमीवर संसदेच्या या कृषी विषयक स्थायी समितीच्या बैठकीला विशेष महत्त्व होते.


इतर बातम्या
आकडेवारीची जबाबदारी राज्याचीपदोन्नतीतील आरक्षणाच्या मुद्द्यावर आज सर्वोच्च...
सोयाबीन आणि कापसाचे मराठवाडा,...विदर्भ सोयाबीन बाजारभाव (Vidarbha soybean market...
 सर्वोच्च न्यायालयाचा महाराष्ट्र...सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) अखेर...
उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात २९ टक्के...केंद्र सरकारने धान वगळता उन्हाळी पिकांखालील (...
वीज पुरवठा खंडित करणे हा अन्न सुरक्षा...शेतकर्‍यांकडील थकित विजबिल वसूल करण्यासाठी वीज...
Top 5 News: हरियाणाचं कापूस उत्पादन...1. गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
साखर उत्पादनात यंदा महाराष्ट्र अव्वल ऑल इंडिया शुगर ट्रेडर्स असोसिएशनच्या (AISTA) पीक...
उन्हाळी पिकांना केंद्र सरकार प्रोत्साहन...तेलबिया आणि कडधान्यांमध्ये आत्मनिर्भर (...
पावसामुळे रब्बी हंगामात बंपर उत्पादन...यंदाच्या हंगामात रब्बीच्या एकूण पेरणी क्षेत्रात...
येते दोन दिवस थंडीची लाट कायम राहणार?पुणे : गेल्या 24 जानेवारीच्या रात्रीपासून...
डीएपी खतांचा वापर कमी करा; एनपीके,...वृत्तसेवा - राज्यांनी एनपीके (NPK) आणि...
ओबीसींचा न्याय्य हक्क त्यांना देणारच ः...नागपूर : ‘डेटा देणार की नाही, देणार असतील तर...
एक लाख ६९ हजार शेतकरी कर्जमुक्त बुलडाणा : ‘‘महात्मा जोतीराव फुले शेतकरी...
कोल्हापूरसाठी ४०० कोटींचा निधी कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सर्वसाधारण वार्षिक...
मृत कर्जदारांची सुधारित माहितीसाठी २९...बुलडाणा : कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मृत कर्जदारांची...
धुळे जिल्ह्यात पारा २.८ अंशांवरपुणे : उत्तर भारतातील शीत वाऱ्यांमुळे महाराष्ट्र...
खतांची चढ्या दराने विक्री नाशिक : रब्बी हंगामातील पिके सध्या जोमात आहेत....
खांडसरी, गूळ उद्योगावर येणार कायद्याचा...पुणे ः राज्यातील गूळ उद्योगावर कायदेशीर नियंत्रण...
‘पोकरा’मधील घोटाळ्याचा अहवाल दडपलापुणे ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (...
खाद्यतेल आत्मनिर्भरतेची घोषणाचपुणे ः देशात खाद्यतेलाची जवळपास ६० टक्के गरज...