Agriculture news in marathi Double sowing of soybean seeds in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवण्याने दुबार पेरण्या

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

नाशिक जिल्ह्यात पेरणीनंतर सततचा पाऊस तसेच निकृष्ट बियाणे या दुहेरी समस्या उद्भवल्या. यासाठी पूर्वीच्या पेरण्या मोडून जिल्ह्यात आता पुन्हा बियाणे उपलब्ध करून दुबार पेरण्या सुरू आहेत.

नाशिक : खरिपाच्या सुरुवातीला चांगला पाऊस झाला. त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केल्या. मात्र, पेरणीनंतर सततचा पाऊस तसेच निकृष्ट बियाणे या दुहेरी समस्या उद्भवल्या. त्यामुळे उगवणक्षमतेच्या अडचणी आल्या आहेत. त्यामुळे हंगाम वाया जाऊ नये, यासाठी पूर्वीच्या पेरण्या मोडून जिल्ह्यात आता पुन्हा बियाणे उपलब्ध करून दुबार पेरण्या सुरू आहेत.

प्रामुख्याने निफाड, नाशिक, चांदवड व येवला तालुक्यातील अनेक गावांमधून या तक्रारी पुढे येत आहेत. अनेक प्रामुख्याने बियाणे उत्पादक कंपन्यांच्या तक्रारी पुढे येऊ लागल्या आहेत. काही शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी केले. मात्र, गोणी खोलल्यानंतर कुजलेले व बुरशी लागलेले बियाणे शेतकऱ्यांना मिळाले. यावर शेतकऱ्यांनी बियाणे विक्रेत्यांनी हात वर केले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.

नाशिक तालुक्याच्या दक्षिण भागात शेवगे दारणा, नानेगाव, पळसे या भागात दुबार पेरण्यांना वेग आला आहे. मात्र, अनेक ठिकाणी आता ओल कमी झाल्याने दुबार पेरणी करताना अडचणी येत आहेत. एकंदरीतच घरचे बियाणे उतरले. मात्र, विकत आणलेले बियाणे उतरलेले नाही, असा सूर शेतकऱ्यांमध्ये 
आहे.

बियाणे विक्रेत्यांचे हात वर 

बियाणे न उतरल्यावर जेंव्हा शेतकरी बियाणे विक्रेत्यांकडे धाव घेत आहेत. मात्र, काही बियाणे विक्रेते उडवाउडवीची उत्तरे देऊन शेतकऱ्यांना बाजूला करतात. आमचा काय दोष, असे त्यांच्या म्हणणे आहे. मात्र, जर बियाणे विक्रेत्यांचा दोष नाही, तर पुढच्या कंपनीला का जबाबदार धरत नाहीत. तसेच कृषी विभागाकडे तातडीने का तक्रार नाहीत, हा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.

प्रतिक्रिया...
चालू वर्षी विकत आणलेल्या सोयाबीन बियाण्यांचा अनुभव खराब आहे. बियाणे विक्रेत्याकडे तक्रार केल्यानंतर सकारात्मक उत्तरे देत नसल्याने शेतकरी नाडला जातो. आमचे शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान झाले आहे.
- ज्ञानेश्वर कासार, शेतकरी, शेवगे दारणा, जि. नाशिक

शासन फक्त जाहिरात व घोषणा करत आहे. कृषी विभागाकडून गुणवत्ता व नियंत्रण याबाबत दुर्लक्ष आहे. त्यामुळे ऐन हंगामात नुकसान झाले. विक्रेत्यांकडे तक्रार केल्यानंतर सर्व बियाणे असेच असल्याचे सांगत हात वर केले जात आहेत. शासनाने लक्ष घालावे.
- विलास गायधनी, शेतकरी, पळसे, जि. नाशिक


इतर ताज्या घडामोडी
नांदेड, परभणी, हिंगोलीत जून, जुलैमध्ये...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील ६९...
औरंगाबाद, जालन्यातील दोन मंडळांत...औरंगाबाद : औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील दोन...
नांदेडमधील आठ केंद्रांत अडीच लाख...नांदेड : जिल्ह्यातील सात केंद्रांवरील शेतकऱ्यांची...
सोयाबीनमध्ये एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा...अंबड, जि. जालना  ः ‘‘सर्व शेतकऱ्यांनी...
नगर जिल्ह्यात १३२ टक्के पेरणीनगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाला....
खानदेशात ‘किसान सन्मान’चे अर्ज प्रलंबित...जळगाव  ः खानदेशात सुमारे सव्वालाख शेतकरी...
शेतकऱ्यांची कृषिमंत्र्यांना दोन हजार...जळगाव : केंद्र सरकारच्या हवामानावर आधारित फळ...
खानदेशात हलक्या जमिनीतील पिके संकटातजळगाव  ः खानदेशात मागील आठ ते १० दिवसांपासून...
जळगाव जिल्ह्यातील मका, ज्वारीची खरेदी...जळगाव : शासकीय मका, ज्वारी खरेदी पुन्हा सुरू...
माळेगाव कारखान्याचे अकरा लाख टन ऊस...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
अकोला कृषी विद्यापीठातील क्वारंटाइन...अकोला ः डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील...
नाशिक जिल्ह्यात चार हजारांवर शेतकरी मका...नाशिक : बाजारात व्यापाऱ्यांकडे खरेदी होणाऱ्या...
वीज बिल माफीसाठी सोमवारी राज्यभर धरणेकोल्हापूर : दरमहा ३०० युनिटसच्या आत वीज वापर...
कोल्हापूर जिल्ह्यात पुरेशा पावसाअभावी...कोल्हापूर : जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांपासून...
पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढीची मागणीअकोला ः पीकविमा पोर्टल व्यवस्थित न चालल्याने अनेक...
पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये कृत्रिम...रत्नागिरी : उच्च प्रतीची वंशावळ तयार करण्यासाठी...
कपाशीवरील फुलकिडे, पांढऱ्या माशीचे...फुलकिडे : ही कीड फिकट पिवळसर रंगाची असून अत्यंत...
सेंद्रिय शेतीबाबत शरद पवार घेणार बैठकपुणे ः राज्यातील सेंद्रिय व रासायनिक अवशेषमुक्त...
यवतमाळ जिल्ह्यात चार लाख शेतकऱ्यांनी...यवतमाळ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीक विमा...
कपाशीवरील किडींचे कामगंध सापळ्याद्वारे...पिकातील किडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड...