पांगरी मंडलात उडदाच्या पीकविम्याबाबत दुजाभाव

पांगरी मंडलात उडदाच्या पीकविम्याबाबत दुजाभाव
पांगरी मंडलात उडदाच्या पीकविम्याबाबत दुजाभाव

पांगरी, जि. सोलापूर  : पांगरी मंडलातील पीकविम्याची रक्कम इतर मंडलच्या तुलनेत कमी आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. दुजाभावाची वागणूक मिळत असल्याचा आरोप परिसरातील शेतकऱ्यांनी केला आहे.

बार्शी तालुक्याचा पूर्व व उत्तर भाग हा पांगरी परिसरात येतो. हा भाग अवर्षण प्रवण क्षेत्रात येत असून दरवर्षीच या पट्ट्यात पावसाचे प्रमाण कमी असते. त्यामुळे खरीप व रब्बी हंगाम कधी हाती लागतो, तर कधी पूर्णपणे वाया जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक तोटा सहन करावा लागतो. पेरणीच्या वेळेस पडलेल्या अल्प पावसावरच शेतकरी पेरणी करतात. यंदा शेतकऱ्यांनी उडीद, मूग, सोयाबीन आदी पिकांचे विमा उतरविले. मात्र, समाधानकारक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. 

खरिपातील पेरणी झाल्यानंतर वेळेत पाऊस न झाल्याने उत्पादनात घट झाली. रब्बी पेरणीच्या वेळेसही पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पेरणी झाली नाही. सिंचनाची व्यवस्था असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पदरी काही अंशी उत्पादन पडले. पांगरी मंडलातील शेतकऱ्यांनी उडीद पिकाचा हेक्टरी ३६० रुपये विमा भरला. मात्र फक्त ८३१ रुपये विमा त्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मुगाचे हेक्टरी १० हजार ४६४ रुपये मिळाले. मात्र, जास्त क्षेत्र असलेल्या उडदाचा विमा कमी, तर अत्यल्प क्षेत्रावरील मुगाला अधिक अशी स्थिती आहे.

उडीद आणि मूग पिकांच्या पेरणीचा व काढणीचा कालवधी एक अाहे. तरीही या दोन्ही पिकांच्या विम्याच्या रकमेमध्ये तफावत का ठेवली, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com