Agriculture news in marathi down the 'Siddheshwar' chimney in three days: Dr. Bhosle | Page 2 ||| Agrowon

सिद्धेश्‍वर कारखान्याची चिमणी तीन दिवसांतच पाडा : डॉ. भोसले

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 डिसेंबर 2019

सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी हटविण्याचे काम सुरू झाल्यापासून १५ दिवसांत पूर्ण करू, अशी भूमिका ठेकेदाराने घेतली होती. परंतु, चिमणी हटविण्याचे काम तीन दिवसांमध्येच पूर्ण करावे लागेल, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ठेकेदाराला केली आहे. चिमणी हटविण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचनाही डॉ. भोसले यांनी ठेकेदाराला केली. 

सोलापूर : सिद्धेश्‍वर साखर कारखान्याची चिमणी हटविण्याचे काम सुरू झाल्यापासून १५ दिवसांत पूर्ण करू, अशी भूमिका ठेकेदाराने घेतली होती. परंतु, चिमणी हटविण्याचे काम तीन दिवसांमध्येच पूर्ण करावे लागेल, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ठेकेदाराला केली आहे. चिमणी हटविण्यासाठी आवश्‍यक असलेली सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याची सूचनाही डॉ. भोसले यांनी ठेकेदाराला केली. 

चिमणी हटविण्यासाठी आवश्‍यक असलेले कामगार हे उत्तर प्रदेशातील असून, त्यांचे २२ कामगारांचे पथक असणार आहे. सोलापूरच्या गड्डा यात्रेसाठी आपल्याकडे अद्यापपर्यंत मैदानाची मागणी झालेली नाही. मागणी झाल्यानंतर योग्य वेळी योग्य निर्णय घेतला जाईल, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनुदान मागणीचा प्रस्ताव राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. महसूल वसुलीचे दिलेले उद्दिष्ट डिसेंबरमध्येच पूर्ण करण्याची सूचनाही डॉ. भोसले यांनी महसूल प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना केली. 

पालखी मार्गाचे भूसंपादन अंतिम टप्प्यात असून, तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामांसाठी आवश्‍यक असलेली भूसंपादन प्रक्रिया तातडीने करण्याचीही सूचना डॉ. भोसले यांनी केली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला असल्याचेही डॉ. भोसले यांनी सांगितले. 

जिल्ह्यातील माळढोक अभयारण्याचे क्षेत्र कमी करण्यात आले असून, इको सेन्सिटिव्ह झोन तयार करण्यात आले आहेत. याबाबतची केंद्र सरकारची सुधारित अधिसूचना अद्यापही प्रसिद्ध न झाल्याने गौण खनिजासाठी मान्यता देता येत नाही. अनधिकृत गौणखनिज उपसा करणाऱ्यांवर पाचपट दंड आकारण्याची तरतूद असून, यानुसार कार्यवाही केली जात असल्याचे डॉ. भोसले यांनी सांगितले.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद ‘केव्हीके’चे शेतकरी जोडो अभियानऔरंगाबाद : शेतकऱ्यांना जोडण्याच्या कामाला गती...
वऱ्हाडात यंदा पांढरे सोने ठरले...अकोला ः यंदाच्या खरिपात लागवड केलेले कपाशीचे पीक...
चक्रिवादळाचा थंडीवर परिणामकोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे...
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गिरणारे मजूर बाजारामुळे मिळाला...गिरणारे, जि. नाशिक : पेठ, त्र्यंबकेश्‍वरसह...
वीजबिलांचा विषय मंत्रिमंडळाने सोडलेला...मुंबई : जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे...
नामपूर बाजार समिती संचालक मंडळाला...नाशिक : सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न...
आंदोलक शेतकरी दिल्लीत दाखलचंडीगड/ नवी दिल्ली  : केंद्राच्या कृषी...
महाराष्ट्राचा विकास हेच समान सूत्र : ...मुंबई ः ‘‘मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील...
मावा, तुडतुड्यांनी नुकसान केले पाच...भंडारा  : लाखनी तालुक्यात तुडतुडा, खोडकिडी,...
निर्यातवृद्धीसाठी पायाभूत सुविधा...रत्नागिरी  : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
भाताला प्रति क्विंटलला ७०० रुपये बोनस सिंधुदुर्ग : शासनाने भाताला प्रतिक्विंटलला...
लाळ्या खुरकूतच्या लसींची गरजसांगली :  जिल्ह्यात सुमारे १३ लाख १६...
साताऱ्यात अकरा लाख टन ऊसाचे गाळप सातारा : जिल्ह्यात ऊस गाळप हंगामास गती आली...
पदवीधरची निवडणूक प्रक्रिया सतर्कतेने...औरंगाबाद : ‘‘पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक...
केकत जळगावात बिबट्याची दहशतऔरंगाबाद : पैठण तालुक्यातील केकत जळगावात...
किनवटमध्ये किसान सभेचा रास्ता रोको नांदेड : कामगारांच्या राष्ट्रव्यापी संप तसेच...
खानदेशात ‘रब्बी’तील पीक कर्जवाटप सुरूजळगाव : खानदेशात खरिपातील पीक कर्ज वितरण ६०...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांच्या...नांदेड : जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी धडपड नाशिक : बियाण्यांची टंचाई, तसेच अतिवृष्टीमुळे...