पावसामुळे पुणे बाजार समितीत आवक मंदावली

पावसामुळे पुणे बाजार समितीत आवक मंदावली
पावसामुळे पुणे बाजार समितीत आवक मंदावली

पुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यात सर्वदूर सुरू असलेल्या पावसामुळे शेतमाल भिजला व ताेडणीदेखील कमी झाल्याने भाजीपाल्याची बाजारातील आवक मंदावली आहे.  रविवारी (ता. २६) गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १५० ट्रक शेतमालाची आवक झाली हाेती. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक सुमारे ५० ट्रकने घटली हाेती. परिणामी सिमला मिरची, फ्लॉवर, मटार, पावटा यांच्या दरात वाढ झाली हाेती. तर रविवारी राखीपाैर्णिमा असल्याने भाजीपाल्याला उठावदेखील कमी हाेता.

परराज्यांतून हाेणाऱ्या आवकेमध्ये कर्नाटक आणि गुजरात येथून ६ ट्रक कोबी, गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश येथून सुमारे २२ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून ३ टेम्पो शेवगा, इंदोर येथून ६ टेम्पो गाजर, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची सुमारे ५ हजार गोणी आवक झाली हाेती.

स्थानिक भागातून सातारी आले सुमारे २ हजार पोती, टॉमेटोे ४ हजार क्रेटस, फ्लॉवर १२ टेम्पो, कोबी ८ टेम्पो, गवार ६ टेम्पो, भेंडी १२ टेम्पो, शेवगा ४ टेम्पो, ढोबळी मिरची १० टेम्पो, हिरवी मिरची ६ टेम्पो, मटार सुमारे २५० गोणी, काकडी १० टेम्पो, कारली ८ टेम्पो, पावटा ४ टेम्पो, भुईमूग १२५ पोती, कांदा  सुमारे १०० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून बटाट्याची सुमारे ६० ट्रक आवक झाली हाेती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : ८०-११०, बटाटा : १३०-१७०, लसूण : १५०-३००, आले : सातारी : ४००-४८०, भेंडी : १५०-२५०, गवार : गावरान : ३००-३५०, सुरती : २००-३००, टोमॅटो : ६०-१००, दोडका : २००-२५० हिरवी मिरची : १५०-२००, दुधी भोपळा : ६०-१२०, चवळी : १५०-२०० काकडी : १४०-२००, कारली : हिरवी १८०-२२० पांढरी : १४०-१५०, पापडी : १८०-२००, पडवळ : १५०-१६०, फ्लॉवर : ६०-१००, कोबी : ४०-८०, वांगी : १५०-२५०, डिंगरी : १४०-१५०, नवलकोल : ८०-१०० ढोबळी मिरची : २५०-३००, तोंडली : कळी २००-२२०, जाड : १००-११०, शेवगा : ३००-३५०, गाजर : १२०-१६०, वालवर : २५०-३००, बीट : ८०-१००, घेवडा : १५०-२०० कोहळा : १००-१५०, आर्वी : २५०-३००, घोसावळे : १४०-१५०, ढेमसे : २००-२२०, भुईमूग : २५०-३५०, पावटा : २००-२२०, मटार : ४००-४५०, तांबडा भोपळा : 6६०-१०० सुरण : २५०-२६०, मका कणीस : ६०-१२० नारळ (शेकडा) : १०००-१६००.

पालेभाज्या पालेभांज्यामध्ये कोथिंबीर सुमारे दीड लाख, तर मेथी सुमारे ६० हजार जुड्या आवक झाली हाेती. पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ३००-६००, मेथी : ५००-९००, शेपू : ३००-५००, कांदापात : ५००-८०० चाकवत : ३०-५००, करडई : ४००-५००, पुदिना : २००-३०० अंबाडी : ४००-५००, मुळे : ५००-८००, राजगिरा : ४००-५००, चुका : ४००-६००, चवळई : ३००-५००, पालक : ४००-६००.

फुलांचे प्रति किलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ५-१५, गुलछडी : ६०-१००, बिजली : २०-४०, कापरी : १०-३०, शेवंती ४०-६०, ऑस्टर : ६-१२, गुलाबगड्डी (गड्डीचे भाव) : १०-२०, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ५०-१००, लिलिबंडल : ८-१२ जर्बेरा : ३०-६०, कार्नेशियन : १००-१८०, जुई ४००-७००.

रविवारी येथील फळबाजारात मोसंबी सुमारे ४० टन, संत्री अडीच टन, डाळिंब २०० टन, पपई २० टेम्पोे, लिंबे सुमारे  ३  हजार गोणी, चिक्कू ६०० डाग, पेरू ५०० क्रेटस्, कलिंगड २५ टेम्पो, खरबुज १० टेम्पो, सीताफळ १० ते १२ टन आवक झाली हाेती.

फळांचे दर पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रति गोणी) : १००-३५०, मोसंबी : (३ डझन) : ८०-२००, (४ डझन ) : ३०-७०, संत्रा : ( ३ डझन) १२०-३००, (४ डझन) : ६०-१२०, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा - २०-६०, गणेश ५-२० आरक्ता १०-३० कलिंगड : ५-१० खरबूज : १०-२०, पपई  : ५-२०, चिक्कू : १००-५००, पेरू (२० किलो) : ३००-४०० सीताफळ : २०-१८०.

मटण मासळी गणेश पेठेतील मासळीच्या घाऊक बाजारात रविवारी (ता. २६) खोल समुद्रातील मासळी सुमारे ८ टन, खाडीची सुमारे २०० किलो आणि नदीची सुमारे ४०० किलो आवक झाली हाेती. तर आंध्र प्रदेशातील रहू, कतला, सीलन आदी मासळीची सुमारे ८ टन आवक झाली हाेती.   भाव (प्रतिकिलो) : पापलेट : कापरी : १५००-१६००, मोठे : १५००, मध्यम : ८००-९००, लहान : ६००-७००, भिला : ५००-५५०, हलवा : ५५०-६००, सूरमई : लहान : ४८०, मोठी : ६५०, रावस : लहान : ६००, मोठा : ९७०, घोळ : ५५०, करली : ३००-३२०, भिंग : ३६०, पाला : ५५०-१०००, वाम : पिवळी : ४००, काळी : २४०-२८०, ओले बोंबील : लहान : ६०, मोठे : ८०, कोळंबी : लहान : ३००, मोठी : ४४०-४८०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००,  मोरी : १६०-२८०, मांदेली : १००, राणीमासा : १६०-२००, खेकडे : १८०-२००, चिंबोऱ्या : ३६०-४००, खाडीची मासळी : सौंदाळे : २८०, खापी : २४०, नगली : २८०-४८०, तांबोशी : ४००, पालू : २००, लेपा : १६०-२००, शेवटे : २४०, बांगडा : १६०-२००, पेडवी : ५०, बेळुंजी : १००, तिसऱ्या : १६०, खुबे : १२०, तारली : १०० नदीची मासळी : रहू : १२०-१४०, कतला : १४०-१६०, मरळ : २८०-३२०, शिवडा : १६०, चिलापी : ४०, मांगूर : ९०, खवली : १६०, आम्ळी : ६०, खेकडे : १२०, वाम : ४००. मटण : बोकड : ४८०, बोल्हाई : ४८०, खिमा : ४८०, कलेजी : ५२०. चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १६०, जिवंत कोंबडी : १००, बोनलेस : २४०, अंडी :  गावरान : शेकडा : ५८०, डझन : ७८, प्रति नग : ६.५०. इंग्लिश : शेकडा : ३४२, डझन : ४८, प्रतिनग : ४.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com