agriculture news in Marathi, Dr. Anil Bonde says, agriculture department will established Bhavan at village level, Maharashtra | Agrowon

कृषी विभाग उभारणार गाव पातळीवर शेतकरी भवनः डाॅ. अनिल बोंडे
टीम अॅग्रोवन
सोमवार, 16 सप्टेंबर 2019

ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांना बसण्यासाठी कार्यालयाचा अध्यादेश काढण्यात आला आहे. त्यानंतर आता गावपातळीवर प्रशिक्षण सभागृह, पिकाचे डेमो प्लॉट आणि कृषी सहायक कार्यालय यासाठी स्वतंत्र शेतकरी भवन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. २० लाख रुपयांची तरतूद याकरीता करण्यात आली असून ग्रामपंचायतींनी एक एकर जागेची उपलब्धता केल्यास हे काम त्या-त्या गावात सुरू होईल. यापूर्वी बांधकाम हेडच कृषी विभागाकडे नव्हते; शेतकरी भवनच्या निमित्ताने ते उपलब्ध करून देण्यात आले आहे. शेतकरी भवनचा उपयोग करून शेतमाल प्रक्रिया आणि विपणनालादेखील चालना देण्याचा प्रयत्न केला जाईल.
- डॉ. अनिल बोंडे, कृषिमंत्री

नागपूर ः ग्रामपंचायत कार्यालयात कृषी सहायकांकरिता बैठकीची व्यवस्था केल्यानंतर लवकरच गावपातळीवर शेतकरी प्रशिक्षणाकरिता शेतकरी भवन उभारण्यात येणार आहे. सुमारे एक एकर जागेवर हे भवन उभारण्याचे प्रस्तावित असून, याकरिता प्रत्येक ग्रामपंचायतीला तब्बल २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी दिली. 

गावस्तरावर कृषी सहायक उपलब्ध होत नाही, अशा तक्रारी वाढीस लागल्या होत्या. त्याची दखल घेत ग्रामपंचायत कार्यालयातच कृषी सहायकाकरिता बसण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले. कृषी व ग्रामविकास खात्याकडून त्यासंदर्भाने संयुक्‍त परिपत्रक काढण्यात आले. ग्रामपंचायत स्तरावरील या कृषी सहायक कक्षात आवश्‍यक फर्निचरचीदेखील व्यवस्था केली जाणार आहे.

कृषी सहायकाचे नाव, भेटीचा दिवस आणि वेळही त्या ठिकाणी नमूद राहणार आहे. या निर्णयाचे सर्वच स्तरावरून स्वागत झाले. त्यानंतर आता प्रत्येक गावस्तरावर शेतकरी भवन उभारण्याची प्रक्रिया राबविली जाणार आहे. सुमारे एक एकर जागा याकरीता प्रस्तावीत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

कृषिमंत्री बोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘सध्या शेतीशाळा तसेच गावपातळीवरील विविध प्रशिक्षण घेण्याकरिता जागाच उपलब्ध राहत नाही. त्यामुळे मंदिर, एखाद्या मोठ्या घराच्या ओसरीचा आधार प्रशिक्षणाकामी घ्यावा लागतो. ही अडचण शेतकरी भवनच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न होणार आहे. ग्रामपंचायतींना प्रस्तावित शेतकरी भवनासाठी एक एकर जागा द्यावी लागणार आहे. त्या ठिकाणी किमान ५० शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण सभागृह, लगतच कृषी सहायकांचे कार्यालय आणि डेमो प्लॉट राहणार आहेत.

कृषी विभाग तसेच कृषी विद्यापीठाच्या सहकार्याने या डेमो प्लॉटचे व्यवस्थापन केले जाईल. योग्य व्यवस्थापनाच्या माध्यमातून पीक vउत्पादकता वाढ कशी साधता येईल, हे त्या गावातील शेतकऱ्यांना प्रत्यक्ष अनुभवता येणार आहे.’’ ‘‘गाव स्तरावरील शेतकऱ्यांना कृषी विद्यापीठ तसेच केव्हीकेमध्ये जाऊन प्रात्यक्षिक प्लॉट नजरेखालून घालणे अनेकदा शक्‍य होत नाही. त्यांच्यासाठी गावातच ही सुविधा या माध्यमातून उपलब्ध होणार आहे.

शेतकरी भवनाला कृषी विभागाचे अधिकारी, कृषी विद्यापीठ तज्ज्ञ, केव्हीके विषयतज्ज्ञ यांच्यादेखील भेटी सातत्याने होतील, त्यामुळे गावपातळीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार होण्यासदेखील हा प्रकल्प साहाय्यभूत ठरणार आहे. त्या गावात पिकाचे क्‍लस्टर तयार करून शेतकरी कंपनीच्या माध्यमातून उत्पादित शेतमाल मार्केट लिंक करण्याकरितादेखील याद्वारे पुढाकार घेण्याचे प्रस्तावित आहे,’’ अशी माहिती कृषिमंत्र्यांनी दिली.

ठाण्यात शेतकऱ्यांकरिता निवासाची सोय
गावपातळीवर शेतकरी भवन उभारण्यासोबतच ठाणे कृषी कार्यालयाअंतर्गत ५० शेतकऱ्यांना राहता येईल, अशी डॉरमेट्री उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्याच ठिकाणी २५० शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची सोय होईल, असे प्रशिक्षणगृही उभारले जाणार आहे. या कामाची सुरवातदेखील झाली आहे. 

इतर अॅग्रो विशेष
पशुधनवाढीचे विश्लेषण कधी? आपल्या देशात पशुधन किती याची आकडेवारी वारंवार...
आरे कारशेड प्रकल्प ः पर्यावरण आणि...सुमारे आठ वर्षांपूर्वी मेट्रो-३ प्रकल्प हाती...
तळेगाव ढमढेरे, शेतकऱ्यांसाठी मुगाची...पुणे जिल्ह्यात शिरूर कृषी उत्पन्न बाजार...
जिद्द, चिकाटीतून यशस्वी केला...हिंगोली जिल्ह्यातील जडगाव (ता. औंढानागनाथ) येथील...
वादळी पावसाचा अंदाज कायमपुणे  : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
पावसाचा पुन्हा दणकापुणे  : मॉन्सूनोत्तर पावसाचा दणका सुरूच आहे...
सर्वसामान्यांची पद्धतशीर दिशाभूलजनतेच्या मूळ समस्या, अडीअडचणी, दुःख यांवरून लक्ष...
बहर तुडवत आला पाऊसराज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...
शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलापुणे  : राज्यात मॉन्सूनोत्तर पावसाने मुसळधार...
यंत्राद्वारे तयार करा हातसडीच्या...पुणे जिल्ह्यातील पाबळ (ता. शिरूर) येथील प्रसिद्ध...
वादळी पावसाचा इशारा कायमपुणे : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे...
‘महाराष्ट्रा’साठी आज मतदान ! तयारी पूर्णमुंबई : चौदाव्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी...
केंद्राने कांद्यावरील निर्यातबंदी...नाशिक : कांदा बाजारभावात होत असलेली घसरण...
आज, उद्या पावसाचा अंदाज कायमपुणे : अरबी समुद्रात कमी दाबाच्या क्षेत्राचे...
थंडीचे आगमन लांबणारपुणे   : राज्यात मॉन्सूनोत्तर पाऊस पडत...
राज्यात सुगीची वेळ, अन्‌ पावसाचा खेळपुणे  : अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र...
मराठवाड्यातील ३३५ मंडळांत पाऊस; खरीप...औरंगाबाद, परभणी : परतीच्या पावसाने मराठवाड्यातील...
फळबागांनी बहरलेला कॅलिफोर्नियाकोकणात जशा समुद्राच्या खाड्या आहेत तशाच पद्धतीने...
कांदळवन पर्यटन, संवर्धनातून ‘स्वामिनी’...वेंगुर्ला (जि. सिंधुदुर्ग) येथील स्वामिनी महिला...
दुष्काळग्रस्तांना सावरणारे धोरण हवेगेल्या दशकात सातत्याने दुष्काळाचे संकट ओढवताना...